✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माहेरचा अव्हेर!

आ
आजानुकर्ण यांनी
Tue, 03/12/2013 - 20:26  ·  लेख
लेख
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे. नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे. मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे. मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे. जय सोनियाजी! http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to-india-for-trial/article4500009.ece?homepage=true -हुय्या
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45522 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

राजा परवेझ ह्यांची भेट खाजगी

निनाद मुक्काम …
Sun, 03/24/2013 - 21:05 नवीन
राजा परवेझ ह्यांची भेट खाजगी होती , ती पाकिस्तानी सरकार तर्फे काश्मीर व इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी झाली नव्हती ,जशी रेहमान ह्यांची होती ,तेथे त्यांनी मुक्ताफळे उधळली होती. भारतातून नुकतेच गुलझार सुद्धा तेथे जाऊन आले , माझ्या मते मनमोहन सिंग ह्यांना त्यांच्या गावी भेट देण्यासाठी रेहेमान ह्यांनी आमंत्रण दिले होते , भारत पाकिस्तान ह्यांच्यात वाद होत राहतात पण त्याच दरम्यान पाकिस्तानी सरकारने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताला अफगाणिस्तानात व्यापार करण्यासाठी पाकिस्तानी मार्ग मोकळा दिला आहे , ह्यावर त्यांच्या कट्टर पंथीयांनी गदारोळ माजवला होता. तुर्कमेनिस्तान मधून येणारा नैसर्गिक वायू भारतात येण्यासाठी पाकिस्तान च्या ह्याच सरकारने भारताला मार्ग दिला आहे , पंजाबी वंशांच्या बहुसंख्य पाकिस्तानी लष्करात शरीफ हा त्यांच्या जवळचा मानला जातो , मुशरफ वर विश्वास टाकता येत नाही तर इम्रान खान लबाड कोल्हा आहे , अश्यावेळी भष्टाचारी राजा परवेझ व झरदारी ह्यांची पी पी पी चे सरकार भारताच्या दृष्टीने कमी त्रासदायक आहे. तेव्हा दगडापेक्षा वीट मऊ ह्या नात्याने त्यांच्या खाजगी भेटीचे उगाच राजकारण करू नये , आपले अडवाणी व सिंग हे भाजपचे मोठे नेते अश्याच खाजगी भेटीवर पाकिस्तानात गेले होते , तेव्हा पाकिस्तान पेक्षा भारतात त्यांच्याविषयी शिमगा झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

मानले तुम्हाला

क्लिंटन
Sun, 03/17/2013 - 08:30 नवीन
मानले तुम्हाला श्रीगुरूजी.झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+ २^१०००००

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/17/2013 - 10:48 नवीन
+ २^१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१११११११११

मैत्र
Sun, 03/17/2013 - 13:08 नवीन
इतकं खुलं सोंग तरी घेऊ नये.. किंवा मुद्देसूद प्रतिवाद करावा.. असो.. पण हे नेहमीचंच आहे. श्रीगुरुजी तुम्ही पूर्वीचे प्रतिसाद वाचले असते तर इतके उत्तम मुद्दे मांडण्याचे कष्टही घेतले नसते. असो पण त्यामुळे चांगली चर्चा झाली. तुमच्या उत्तम माहितीबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१०००००००००००००००००००००००००००००००००

sagarparadkar
Sun, 03/17/2013 - 14:42 नवीन
श्रीगुरुजींची जिद्द आणि मुद्देसूद प्रतिवाद करण्याचे कौशल्य मानले __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

श्रीगुरुजी मुद्देसुद प्रतिसाद

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 18:25 नवीन
श्रीगुरुजी मुद्देसुद प्रतिसाद देतात ह्यात काही वादच नाही. पण भाजपाच्या बाबतीत त्यांनीही थोडे झोपेचे सोंग घेतले आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

सहमत.

मोदक
Sun, 03/17/2013 - 15:01 नवीन
सहमत!! या कारवाईची रशियाने जबरदस्त किंमत मोजलेली आहे. नाट्यगृहातल्या अतिरेक्यांना रशियन कमांडोंनी ठार केले पण त्या धुमश्चक्रीत २०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. अशी किंमत मोजण्यासाठी आपण तयार आहोत का..? मॉस्को मधली घटना असो वा बेसलान मधील ही घटना.. Beslan school siege took place in early September 2004 lasted three days and involved the capture of over 1,100 people as hostages (including 777 children) ending with the death of over 380 people (including 156 children) It was claimed by the locals that over 200 of those killed were found with burns, and 100 or more of them were burned alive. The last reported fatality was 33-year-old librarian Yelena Avdonina, who succumbed to her wounds on 8 December 2006. (विकीच्या सहाय्याने!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

किंमत

श्रावण मोडक
Sun, 03/17/2013 - 16:46 नवीन
किंमत मोजणे वगैरे मला कळत नाही. अशा घटनांमध्ये आपला हेतू, उद्देश काय असतो हे आधी पाहिले पाहिजे. शत्रूला संपवणे हा असतो की 'आपल्यांना' वाचवणे हा असतो? मला वाटतं, हेतू पहिला असेल तर किंमत मोजण्याचा मुद्दा येतो. आणि किंमत मोजल्यानंतर ती किंमत आहे हे स्वीकारून पुढे जाण्याची तयारी हा भाग येतो. आपल्या हेतूंचीच पंचाईत असते. पहिला हेतू वरकरणी गर्जनांसाठी असतो. आतमध्ये पोटात गोळा आलेला असतो किंमत मोजावी लागणार म्हणून. किंमत मोजण्याची तयारी नसतेच. किंमत का मोजली हे विचारायची मात्र तयारी असतेच म्हणा. कंदाहारनंतर अपहरण वगैरे झालेले आठवत नाही. नाही तर, त्या काळात 'अपहरणकर्त्यांशी चर्चा नाही', असे राष्ट्रीय धोरण ठरवण्याच्या वगैरे गोष्टी झालेल्या आठवतात (गुगलवर कळेलच म्हणा...). तेव्हाच्या एकमेकांच्या भूमिका पाहिल्या पाहिजेत. पण नको... तसं केलं तर, गावाकडच्या भाषेतला, 'शेपूट तुटक्या माकडांचा मेळावा' आणखी जास्त दिसायचा. तर, एकूण वर्तुळ-कोन सिद्धांताचे काही प्रयोग सुरू आहेत इथे. ते तसेच चालू ठेवले जावेत, यासाठी(ही) ही काडी टाकली आहे. त्यामुळे मोदक यांच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद दिला असला तरी तो केवळ एक मुद्दा पकडण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वाजपेयी सरकार कंदहार प्रकरणी

निनाद मुक्काम …
Sun, 03/17/2013 - 22:35 नवीन
वाजपेयी सरकार कंदहार प्रकरणी सर्वच आघाडीवर अपयशी ठरले , विमान भारतातून दुबई मध्ये असेपर्यंत करण्यासारखे खूप होते. मात्र ते अफगाणिस्तान मध्ये जाऊ दिले येथेच अर्धी लढाई हरली , दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा कि दोन्ही प्रकरणात अपहरणकर्त्याने विमाने अनुक्रमे युगांडा व अफगाण येथे का नेली , ह्याचे सरळ उत्तर असे आहे , की ह्या देशातील राज्यकर्ते अपहरणकर्त्याने सोयीचे होते , हे सांगण्याचा उद्देश एवढाच की दोन्ही वेळेला परिस्थिती समान होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अफगाण वरून भारतात येतांना मध्ये पाक लागते पण आपल्या विमानांना रशिया किंवा इराण हे दोन पर्याय उपलब्ध होते , रशियात पुतीन ह्यांनी दहशतवाद्यांच्या पुढे नामायचे नाही हे ठरवले व सरळ कारवाई केली ह्यात सारे दहशतवादी मेले मात्र ह्या कारवाईत सामान्य निर्दोष नागरिक सुद्धा मारल्या गेले ,मात्र पुतीन ह्यांना एक पक्की खात्री होती की एकदा दहशतवाद्यांच्या पुढे लोटांगण घातले की प्रत्येकवेळी खावे लागेल , आपण शाळेत एक गाणे शिकलो होतो विजयी विश्व ,तिरंगा प्यारा , झंडा उंचा रहे हमारा ह्यात एक ओळ अशी होती शान न इसकी जाने पाये , चाहे जान भलेही जाये. पण भारतात स्वातंत्र्य पूर्व काळात देशासाठी सामान्य जनता जीवावर उदार झाली कारण त्याकाळी तसे नेते होते. आताचे नेते विरोधी बाकावर बसून शेरो शायरी ,कविता करतात , पल्लेदार भाषणे ठोकतात. मात्र सत्ता हातात आली की काटेरी मुकुट सांभाळता येत नाही , त्यापेक्षा कम्युनिस्ट परवडले , आपल्या तत्वांना चिटकून असतात , त्यासाठी वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडतात. म्युनिक मध्ये आपले खेळाडू सोडवताना झालेल्या चकमकीत त्यांचे सारे खेळाडू मारल्या गेले , म्हणून काही त्याच्या सरकारला लोकांनी राजीनामा द्यायला लावला नाही ,उलट त्याच्या सरकारने न भूतो न भविष्यती असा सूड ,उगवला. सध्या स्वराज बाई विरोधी बाकावरून हेच करत आहेत , पण त्यांच्या भाषणामुळे सरकारचे काडीचे सुद्धा नुकसान होत नाही , त्यांना करायचे तेच ते करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

विमान भारतातून दुबई मध्ये

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 21:48 नवीन
विमान भारतातून दुबई मध्ये असेपर्यंत करण्यासारखे खूप होते. मात्र ते अफगाणिस्तान मध्ये जाऊ दिले येथेच अर्धी लढाई हरली
अहो दुबईपर्यंतही जायची गरज नाहित. विमान आपल्या हद्दीत पंजाबात उतरले होते, तेव्हा तर सुवर्णसंधी होती. तिथे जो गोंधळ घालण्यात आला त्यातच पूर्ण लढाई हरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

विमान पळविल्यानंतर काही

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 12:47 नवीन
विमान पळविल्यानंतर काही वेळातच अमृतसरला उतरविले होते व ते तिथे फक्त ४०-४५ मिनिटे होते. त्यानंतर लगेच ते दुबईला नेण्यात आले. फक्त ४०-४५ मिनिटे मिळाली आणि ते सुद्धा विमान पळविल्याचे समजल्यानंतर काही योजना आखण्याच्या आतच आणि लष्कर किंवा कमांडो अशा कोणाशीही विचारविनिमय करून योजना ठरविण्याच्या आतच. इतक्या कमी वेळात तिथे काय करता आले असते? अमृतसरला नक्की काय गोंधळ घालण्यात आला? २६/११/२००८ ला संध्याकाळी ८ च्या सुमारास मुम्बईवर हल्ला झाल्यावर दिल्लीहून मुम्बईला कमांडो पोचायला १४ तास लागले होते. हे लक्षात घेता १९९९ मध्ये दिल्लीहून कमांडो पोचायलाच किमान २-३ तास तरी लागले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

हे वाचा:

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 17:54 नवीन
हे वाचा: At Amritsar, Captain Sharan requested refuelling the aircraft. However, the Crisis Management Group in Delhi directed Amritsar Airport authorities to ensure that the plane was immobilised, which armed personnel of the Punjab police were already in position to try to do. They did not receive approval from New Delhi. Eventually, a fuel tanker was dispatched and instructed to block the approach of the aircraft. As the tanker sped towards the aircraft, air traffic control radioed the pilot to slow down, and the tanker immediately came to a stop. This sudden stop aroused the hijackers' suspicion and they forced the aircraft to take off immediately, without clearance from air traffic control. The aircraft missed the tanker by only a few feet. अतिरेक्यांनी हायजॅक केलेले विमान कुठल्याही देशाने आपल्या हद्दीत असताना आधी जॅम केले असते. इथे दिल्लीने केलेला सावळा गोंधळ पाहा. अर्थात वरती क्लिंट्न म्ह्णतात तसे झोपेचे सोंग घेतले असेल तर ह्यातही काहीच ढिसाळ्पणा दिसणार नाही. हेच काँग्रेस सरकारने केले असते तर ते सरकार किती षंढ आहे वगैरे लेख आले असते. म्हणूनच मी म्हणतो कोणत्याही एका पक्षाची तळी उचलण्यात काहीच अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गोंधळ

प्रदीप
Sun, 03/24/2013 - 18:34 नवीन
त्यावेळी सावळा गोंध़ळ झाला हे कबूल आहे. पण असाच व बहुधा ह्याहीपे़क्षा गोंधळ २६/११ च्या वेळेस झाला. मला वाटते, इतके होऊनही उद्या पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली, तर असाच गोधळ भारतात अनुभवावयास मिळेल. हे आपक्ले स्थायी वैशिष्ट्य आहे, त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी फारसा संबंध नाही. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 18:58 नवीन
धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे. कुठल्याही एका पक्षाची तळी उचलण्यात काहीच हशील नाही. पण श्रीगुरुजी, क्लिंटन वगैरेना कंदाहार प्रकरणातला तेवढाच गलथानपणा मान्य नाही कारण ते प्रकरण भाजपाने हाताळले. श्रीगुरुजी एका ठिकाणी म्हणतात मुशर्र्फना बोलावणे ही चूक होती, नंतर म्हणतात अधिकृत भेट होती, मानदंड होते वगैरे. कारण पुन्हा भाजपाचे सरकार होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

१-२-३

क्लिंटन
Sun, 03/24/2013 - 20:08 नवीन
पण श्रीगुरुजी, क्लिंटन वगैरेना कंदाहार प्रकरणातला तेवढाच गलथानपणा मान्य नाही कारण ते प्रकरण भाजपाने हाताळले.
१. वर लिहिलेल्या या प्रतिसादात लिहिलेले एक वाक्य परत एकदा उधृत करतो: "सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा जास्त दोष या प्रकरणी आहेच पण सगळा दोष केवळ भाजपवर ढकलायचा प्रयत्न करत असेल तर तो पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आहे हे स्पष्ट आहे." २. मागे राजीव गांधींवर मिसळपाववर चर्चा झाली होती त्या चर्चेत माझ्या एका प्रतिसादात कंदाहार प्रकरणाचा एका वाक्यात उल्लेख आहे.पण त्याविषयी मला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट आहे. ३. २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर विकास यांचा लोकशाही-२००९ हा लेख आला होता.त्यात मी एक प्रतिसाद लिहिला होता.तो काही कारणाने सध्या दिसत नाही (कोणी तो प्रतिसाद उडविला की काय याची कल्पना नाही) पण मी तोच प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर लिहिला आहे. तेव्हा भाजपचे सरकार होते या कारणावरून गलथानपणा मान्य नसल्याच्या मुद्द्याला फारसा अर्थ नाही हे कळेलच. माझा मुद्दा एकच की एखाद्या घटनेवर/व्यक्तीवर मते बनविताना एखाद्या पक्षाचे सरकार होते/अमुक एका अडनावाचा नेता आहे/ अमुक एका संस्थेचा सदस्य असलेला तो नेता आहे इत्यादी गोष्टी बाजूला ठेऊन मते बनवावित.यातून होते असे की मी विविध प्रतिसादांमधून भाजपच्या अनेक, काँग्रेसच्या अनेक (आणि कम्युनिस्टांच्या जवळपास सगळ्या) गोष्टींवर टिका करतो आणि त्याचबरोबर माझ्या मते ज्या चांगल्या गोष्टी भाजपने केल्या (पोखरण चाचण्या,भारतात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर भर देणे इत्यादी) आणि काँग्रेस पक्षाच्या काही धोरणांचे (१९९१ चे आर्थिक धोरण,नरसिंह रावांनी इतर काही केलेल्या चांगल्या गोष्टी,राजीव गांधींचे संगणिकीकरणाला चालना द्यायचे धोरण) समर्थन करतो. त्यातूनच काही वेळा प्रतिसादांच्या context वरून काहींना मी अगदी कट्टर भाजपवाला किंवा कट्टर काँग्रेसवाला वाटत असेनही पण परिस्थिती तशी नक्कीच नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

तुम्हाला दोन्ही पक्षांच्या

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 20:24 नवीन
तुम्हाला दोन्ही पक्षांच्या सुधारणा आणि चुका मान्य आहेत ह्या खुलाशा बद्दल धन्यवाद. मुळात ही उपचर्चा त्यावरुनच सुरू झाली होती. अमोल उद्गिरकरांनी तोच मुद्दा मांडला होता. माझेही मत तेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

खर तर मला क्लिंटन

पिंपातला उंदीर
Sun, 03/24/2013 - 20:58 नवीन
खर तर मला क्लिंटन यांच्याबद्दल आणि त्यांच्या संतुलित असणार्‍या प्रतिसादाबद्दल खूप आदर आहे. पण त्यानी माझे प्रतिसाद वाचून माझयाबद्दल काय पूर्वग्रह करून घेतले ते कळायला काही मार्ग नाही. मला पंतप्रधान करायला पाहिजे आइयी. प्रतिसाद त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. वैचारिक वादविवाद प्रतिवाद त्यांच्याकडून अपेक्षित होते आणि आहेत. बाकी बंडा मामा यांचे आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

कंदाहारप्रकरणी भाजपच्या

नितिन थत्ते
Mon, 03/25/2013 - 12:58 नवीन
कंदाहारप्रकरणी भाजपच्या सरकारने परिस्थिती पाहून योग्य तेच निर्णय घेतले असतील असे मलाही व्यक्तिशः वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मुशर्रफला बोलाविणे ही चूकच

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 20:51 नवीन
मुशर्रफला बोलाविणे ही चूकच होती. पण एकदा अधिकृत भेटीसाठी बोलाविल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे दोन्ही देशांनी वागणे हे बंधनकारक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

असे कसे .? अशी बालिश विधान?

पिंपातला उंदीर
Sun, 03/24/2013 - 21:06 नवीन
असे कसे .? अशी बालिश विधान? मुशराफ्फ ने हजारो भारतीय जवानचा बळी घेतला आणि अजुन एक महत्वाचे शिखर वाजपेयी सरकारने गमावले. मूशी मोठा शत्रू का ते राजा बुजगावनं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

विमान हायजॅक केल्याचे

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 20:48 नवीन
विमान हायजॅक केल्याचे समजल्यानंतर पुढच्या केवळ तासाभरात घडलेल्या या घटना आहेत. इतक्या कमी वेळात कोणत्याही सुसूत्र व योजनाबद्ध कारवाईची योजना बनविणे व ती कार्यवाहीत आणणे अत्यंत अवघड असते. नक्की काय करावे, कसे करावे, कोणी करावे, त्यात कोणते धोके आहेत इ. विचार करायला या प्रकरणात फारच कमी वेळ मिळाला. अमृतसरला नक्की काय घडले याविषयी खूप गोंधळ आहे. अनेक वृत्तपत्रातून वेगवेगळ्या कहाण्या छापून आलेल्या आहेत. त्यामुळे तिथे नक्की काय घडले हे सांगता येणे अवघड आहे. मी असेही वाचले होते की त्या ऑईल टँकरमधून कर्मचार्‍यांच्या वेषातले सैनिक पाठविले होते व त्यांना विमानाच्या जवळ पोचल्यावर विमानाच्या टायरवर गोळ्या घालून टायर फोडण्यास सांगितले होते. पण जसा तो टँकर जवळ येऊ लागला, चाच्यांना संशय आल्याने त्यांनी वैमानिकाला तातडीने उड्डाण करावयास सांगितले व विमान भारतीय हद्दीतून बाहेर पडले. अमृतसरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर, पंजाबचे पोलिस, टँकरचे कर्मचारी, दिल्लीचे अधिकारी व मंत्री इ. मध्ये इतक्या कमी वेळात समन्वय आणणे व सुसूत्रता आणणे खूप अवघड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

हे वाचा

पिशी अबोली
Sun, 03/24/2013 - 22:46 नवीन
हे वाचा
याचा संपूर्ण संदर्भ देता का बंडामामा? संदर्भ सोडून दिलेले वाक्य कुठलेही असू शकते. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरविण्यासाठी त्याचा आगापिछा कळला तर बरं होईल..अन्य कुठे दिलेला असेल आधीच तर माफ करा.अजून सगळी चर्चा वाचतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

या विमानात शस्त्रे, बॉम्ब व

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 19:13 नवीन
या विमानात शस्त्रे, बॉम्ब व कमांडो आहेत हे लक्षात आल्यावर इतर कोणताही देश अशा सशस्त्र विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाऊन देणार नाही. अशा परिस्थितीत तिथे पोचणार कसे?
अहो श्रीगुरुजी अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लै भारी..

चिगो
Sat, 03/23/2013 - 19:42 नवीन
अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही.
ह्हांगाशी.. पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची? "बेगर्स आर नॉट चुजर्स" असं काहीतरी म्हण्तात बघा.. आणि विमान हवाई क्षेत्रातून जात असतांना त्या त्या देशाला ते कशाकरीता जात आहे, ह्याची माहिती द्यावी लागत असेल, असे वाटते.. आणि अंतरराष्ट्रीय संबंधांत "खोटे बोलणे" योग्य मानले जात नसावे, असा एक समज आहे ब्वॉ माझा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

पाकिस्तानची टाप आहे का हो,

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 21:42 नवीन
पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची? अहो पण तरीही ते हो म्हणतात की नाही हे विचारयच्या भानगडीतच पडले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

"अशा वेळेस विमानात काय आहे

श्रीगुरुजी
Sat, 03/23/2013 - 19:56 नवीन
"अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " कोणतेही प्रवासी विमान ज्या देशाच्या हवाई हद्दीतून जात असते, त्या देशाच्या संपर्क यंत्रणेबरोबर त्या विमानाचा सतत संपर्क असतो व देशाच्या हद्दीत प्रवेश करताना विमानाने आपली ओळख पटवून द्यायची असते. विमाने रडारवर दिसत असतात व एखाद्या विमानाने आपली ओळख दिली नाही तर संशय येऊन तो देश ते विमान क्षेपणास्त्र डागून पाडू शकतो. हेच जर लष्करी विमान असेल तर इतर कोणताही देश आपल्या हवाई हद्दीतून दुसर्‍या देशाचे लष्करी विमान जाउ देत नाही. प्रवासी विमानाची व लष्करी विमानाची ओळख वेगवेगळी असल्याने एखाद्या लष्करी विमानाने दुसर्‍या देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आपण प्रवासी विमान असण्याची बतावणी केली तरी ते जमिनीवरील संपर्क यंत्रणेला लगेच लक्षात येते व अशा परिस्थितीत तो देश त्या विमानावर क्षेपणास्त्र डागू शकतो. तुमच्या म्हणण्यानुसार भारताने एखाद्या प्रवासी विमानातून कमांडो व शस्त्र पाठवायची होती किंवा एखादे लष्करी विमान हे प्रवासी विमान असल्याची बतावणी करून त्यातून कमांडो व शस्त्र पाठवायची होती. मी वर लिहिल्याप्रमाणे जमिनीवरील संपर्क यंत्रणेला अशी बतावणी करून फसविणे अशक्य आहे. आणि समजा तसे विमान व कमांडो पाठविले असते, तरी ते कंदाहार मध्ये उतरणार कोठे? कंदाहार विमानतळावर पळविलेले भारताचे विमान तालिबानच्या सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते. विमानतळावर विमानवेधी तोफा आणून ठेवलेल्या होत्या व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तालिबानी सैनिकांनी तिथे कोणतेही विमान उतरू नये यासाठी धावपट्टीवर अडथळे आणून ठेवलेले होते. त्यामुळे बाहेरील कोणतेही विमान तिथे उतरणे अशक्य होते. किंबहुना विमान विमानतळाच्या जवळ आल्यावर त्याला तोफांचा सामना करावा लागला असता व विमान उतरवताच आले नसते. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची कमांडो कारवाई करणे भारताला अशक्य होते. पाकिस्तानमधली परिस्थिती वेगळी होती. अमेरिकेने ओसामाला पकडताना पाकिस्तानची परवानगी मागण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ओसामाला पाकिस्ताननेच गुपचूप लपवून ठेवले आहे याची अमेरिकेने खात्री करून घेतलेली होती व आपण ओसामाला पकडणार याची बातमी पाकिस्तानला लागली तर काही वेळातच पाकिस्तान त्याला दुसरीकडे हलवेल याची अमेरिकेला खात्री होती. ही मुत्सद्देगिरी नसून अत्यंत सावध व गुप्त लष्करी डावपेच होता. अमेरिकेने ओसामाला पकडण्यासाठी "स्टील्थ" प्रकारची हेलिकॉप्टर्स वापरली होती. ही हेलिकॉप्टर्स रडारवर सहजासहजी दिसत नाहीत व त्यांचा आवाजही खूप कमी असतो. त्यामुळे पाकिस्तानी रडारयंत्रणेला ही हेलिकॉप्टर्स आपल्या हद्दीत घुसल्याचे समजले नाही. ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेने अफगाणिस्तानमधून अबोटाबादमध्ये (जिथे ओसामाला लपविले होते) पाठविली होती. त्यामुळे पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशाच्या हवाईहद्दीतून जाण्याचा प्रश्नच नव्हता. या हेलिकॉप्टरविषयी अधिक माहिती खालील ठिकाणी मिळेल. http://www.nytimes.com/2011/05/06/world/asia/06helicopter.html?_r=0 "मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

वरील प्रतिसादात चुकीची लिंक

श्रीगुरुजी
Sat, 03/23/2013 - 20:02 नवीन
वरील प्रतिसादात चुकीची लिंक दिली. खालील लिंक पहा. http://www.nytimes.com/2011/05/06/world/asia/06helicopter.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

विमान किंवा हेलिकोप्टर कमी उंचीवरुन

वेताळ
Sat, 03/23/2013 - 20:08 नवीन
नेल्यास त्याचा पत्ता रडार ला लगु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अहो गुरुजी जरा डोके लढावा

निनाद मुक्काम …
Sun, 03/24/2013 - 05:08 नवीन
भारताला आपले विमान पाकिस्तानच्या हद्दीतून न्यायची काय गरज आहे अफगाण ला लागून तालिबान चा कट्टर शत्रू व भारताचा परम मित्र रशिया मध्ये विमान नेता आले असते , व सुन्नी तालिबानचे विरोधक व भारताचे मित्र इराण हा सुद्धा अजून एक उत्तम पर्याय होता , पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे लष्कराच्या हातात आहे , हे एखादा शेंबडा पोरगा देखील सांगेन वाजपेयी शरीफ ह्यांना मैत्रीची भेट द्यायला आले ,तेव्हा मुशर्रफ त्यांना सलामी द्यायला आला नाही , ह्यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट झाली होती , तरी सुद्धा बेसावध पणे मैत्रीचे तुणतुणे गात बसले. वाजपेयी सरकारची दुसरी मोठी घोडचूक म्हणजे ९८ ला अण्वस्त्र चाचणी करणे , ह्या चाचणी मुळे आपली हायड्रोजन बॉंब बनविण्याची शमता सिद्ध झाली , जी झाली नसती तरीही काहीही बिघडले नसते. नरसिंह राव ह्यांनी आपल्या काळात ही चाचणी होऊ दिली नाही , कारण भारताने एकजरी चाचणी केली तर पाकिस्तान सुद्धा करेल व पाकिस्तान कडे ही शमत १९८५ साली आली होती. भारताला हि चाचणी करून काही विशेष उपयोग झाला नाही , चीन ने तर अजिबात आपले धोरण बदलले नाही , मात्र पाकिस्तानने लहेच हि चाचणी केली , हा बॉंब इस्लामिक बॉंब घोषित करून जगातील पहिले व एकुलते एक अण्वस्त्र धारी राष्ट्र घ्षित केले , ह्यामुळे जिहादी कारवायांच्या साठी त्यांना निधी मोठ्या प्रमाणात मिळाला , त्यांच्या अण्वस्त्र शमतेवर अधिकृत मोहर लागली , व भारताचा पारंपारिक युद्धाचा मार्ग कायमचा बंद झाला , व ह्यापुढे काहीही झाले तरी भारत पाकिस्तानात सैन्य आणू शकत नाही. कारण अण्वस्त्र युद्धाचा बागुल बुआ प्रगत राष्ट्रांच्या पुढे आला असता. ह्या एकमेव निकषावर मुशरफ ने कारगील घडवले , त्याचे भारतीय प्रतिकार शामातेचे अंदाज चुकले मात्र भारतीय सैन्य पाकिस्तानची वेस पार करणार नाही हे मत मात्र खरे ठरले , व आजतागायत त्या ९८ च्या चाचणीमुळे आपले पारंपारिक सैन्य आता लोणच्यासारखे मुरत ठेवायला लागत आहे जो पक्ष चाणक्यांच्या हुशारीचा वारसा सांगतो त्यांनी एकामागोमाग घोडचुका कराव्यात हे पटले नाही , मी कोणत्याही पक्षाची भाटगिरी करत नाही , मोदी पंतप्रधान व्हावे असे जरूर वाटते , म्हणून काही त्यांच्या पक्षांचे मंगळसूत्र गळ्यात बांधल्यासारखे त्यांच्या प्रत्येक कृतीचे वृथा समर्थन सुद्धा करत नाही ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"अहो गुरुजी जरा डोके लढावा

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 13:03 नवीन
"भारताला आपले विमान पाकिस्तानच्या हद्दीतून न्यायची काय गरज आहे अफगाण ला लागून तालिबान चा कट्टर शत्रू व भारताचा परम मित्र रशिया मध्ये विमान नेता आले असते , व सुन्नी तालिबानचे विरोधक व भारताचे मित्र इराण हा सुद्धा अजून एक उत्तम पर्याय होता ," बापरे! आता मात्र हद्द झाली. तुम्ही हे जे वर लिहिले आहे ते पर्याय भारताने विचारात घेतले नसतील का? का ते फक्त तुम्हालाच सुचलेत व तत्कालीन सरकारला सुचलेच नसणार? आणि पार अगदी कोठूनही विमान नेऊन कमांडो पाठविले तरी ते विमान कंदाहारमध्ये उतरणार कोठे? कंदाहारची धावपट्टी तर बंद होती व विमानतळावर तालिबानी सैनिक होते. मग तिथे कमांडो पोचणार कसे? "पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे लष्कराच्या हातात आहे , हे एखादा शेंबडा पोरगा देखील सांगेन" हे काय वाजपेयींना माहित नव्हते का? "वाजपेयी शरीफ ह्यांना मैत्रीची भेट द्यायला आले ,तेव्हा मुशर्रफ त्यांना सलामी द्यायला आला नाही , ह्यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट झाली होती ," हे सुद्धा वाजपेयींना माहित नव्हते का? "तरी सुद्धा बेसावध पणे मैत्रीचे तुणतुणे गात बसले." मुशर्रफला २००१ मध्ये आग्र्याला बोलाविणे ही चूकच होती. "वाजपेयी सरकारची दुसरी मोठी घोडचूक म्हणजे ९८ ला अण्वस्त्र चाचणी करणे , ह्या चाचणी मुळे आपली हायड्रोजन बॉंब बनविण्याची शमता सिद्ध झाली ,जी झाली नसती तरीही काहीही बिघडले नसते." अण्वस्त्र चाचणी करण्याची मागणी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून करत होते. प्रगत देश अधूनमधून चाचणी करून नव्याने डाटा गोळा करत असतात. फ्रान्स, चीन इ. देशांनी एका चाचणीवर समाधान न मानता अनेकवेळा चाचणी केली आहे. "नरसिंह राव ह्यांनी आपल्या काळात ही चाचणी होऊ दिली नाही ,कारण भारताने एकजरी चाचणी केली तर पाकिस्तान सुद्धा करेल व पाकिस्तान कडे ही शमत १९८५ साली आली होती." नरसिंहरावांनी जानेवारी १९९६ मध्ये चाचणीची पूर्वतयारी केली होती. पण ऐनवेळी अमेरिकेच्या उपग्रहांमुळे अमेरिकेला सुगावा लागला व त्यामुळे अमेरिकेने दबाव आणून चाचणी रद्द करायला लावली होती. "भारताला हि चाचणी करून काही विशेष उपयोग झाला नाही , चीन ने तर अजिबात आपले धोरण बदलले नाही , मात्र पाकिस्तानने लहेच हि चाचणी केली , हा बॉंब इस्लामिक बॉंब घोषित करून जगातील पहिले व एकुलते एक अण्वस्त्र धारी राष्ट्र घ्षित केले , ह्यामुळे जिहादी कारवायांच्या साठी त्यांना निधी मोठ्या प्रमाणात मिळाला , त्यांच्या अण्वस्त्र शमतेवर अधिकृत मोहर लागली , व भारताचा पारंपारिक युद्धाचा मार्ग कायमचा बंद झाला ," ही अत्यंत अतर्क्य वाक्ये आहेत. पाकिस्तानला जिहादी कारवायांचा निधी अणुचाचणीपूर्वीही मिळत होता. कारगिल युद्ध हे अणुचाचणीनंतरच झाले व त्यात कोणतीही अण्वस्त्रे न वापरता ते पारंपारिक पद्धतीनेच झाले हे आपण विसरलेले दिसता. "व ह्यापुढे काहीही झाले तरी भारत पाकिस्तानात सैन्य आणू शकत नाही. कारण अण्वस्त्र युद्धाचा बागुल बुआ प्रगत राष्ट्रांच्या पुढे आला असता." भारत स्वतःहून कधीच दुसर्‍या देशात सैन्य पाठवित नाही. १९४८ असो वा १९६५ वा १९९९ भारत फक्त स्वत:च्या सीमांचे रक्षण करतो पण दुसर्‍या देशात सैन्य पाठवित नाही. "ह्या एकमेव निकषावर मुशरफ ने कारगील घडवले , त्याचे भारतीय प्रतिकार शामातेचे अंदाज चुकले मात्रभारतीय सैन्य पाकिस्तानची वेस पार करणार नाही हे मत मात्र खरे ठरले , व आजतागायत त्या ९८ च्या चाचणीमुळे आपले पारंपारिक सैन्य आता लोणच्यासारखे मुरत ठेवायला लागत आहे" तुमची नक्की काय अपेक्षा आहे? अजून १-२ युद्धे व्हावीत असे तुम्हाला वाटते का? तुमच्या या वाक्यांचा अर्थच समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

गुरुजी तुम्ही जे पर्याय

निनाद मुक्काम …
Sun, 03/24/2013 - 19:46 नवीन
गुरुजी तुम्ही जे पर्याय मी दिले ते सरकारला नक्कीच माहिती होते , पण तुम्ही ह्या सर्व प्रकरणातील मूळ मुद्दा समजून घेत नाही आहेत. जो मोदक ह्यांनी रशियाचे उदाहरण देऊन मोजक्या शब्दात समर्पक मांडला आहे अश्या प्रकारच्या अपहरण नाट्यात परिस्थिती बिकट असते , व त्यासाठी कमांडो ह्यांना खास प्रशिक्षण दिले असते. मूळ मुद्दा असा होता की जगभर अश्या अपहरण कृत्यांत जेव्हा लष्करी कारवाई होते , तेव्हा एकतर ती पूर्ण फसते व ओलिस धरलेले मारले जातात ,उदा म्युनिक ऑलिम्पिक, तर काही प्रकरणात काही ओलिस धरलेले मारले जातात पण सारे अपहरणकर्ते मारले जातात ,प्रकरण त्वरीत निकालात निघते, उदा रशिया येथे पुतीन ह्यांनी केलेली कारवाई ,पण कधी कधी कधी कधी सर्व ओलिस ठेवलेले बंधक सुरक्षित ठेवले जाऊन दहशतवादी मारले जातात. 24–25 April 1993: NSG Commandos storm a hijacked Indian Airlines Boeing 737 with 141 passengers on board at Amritsar airport during Operation Ashwamedh. Two hijackers, including their leader, Mohammed Yousuf Shah, are killed and one is disarmed before. No hostages are harmed. ह्या घटनेवरून स्पष्ट कळून येते आपले कमांडो काय ताकदीचे आहेत , जगात ते चौथ्या क्रमांकात येतात , पण कंधार प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा नडला हे अनेकांनी येथे सांगितले आहे , व पुरावे सुद्धा दिले आहेत , त्यात ही एक भर December 1999: Terrorists hijacked Indian Airlines flight IC814 from Nepal, and landed in Amritsar, Punjab. Within minutes of landing, the Crisis Management Group (CMG), which authorised the use of the NSG, was informed. But the CMG wasted precious hours and by the time the go-ahead was issued, it is too late. On the other hand, the NSG team on alert was elsewhere and no other team was raised during the delay. The hijacked plane took off before the NSG reached Amritsar Airport. The plane landed in Kandahar, Afghanistan where one hostage was killed. Finally, the Indian Government agrees to the terrorists' demands to release three jailed terrorists. The hostages are released and the terrorists escaped to Pakistan. आणि आता मोदक ह्यांनी मांडलेला मुद्दा परत मांडतो , सरकार पुढे लष्करी कारवाई करावी का हा मोठा प्रश्न होता , कशी करावी हा नव्हता. पुतीन ह्यांनी केलेल्या कारवाईत किंवा म्युनिक मधील कारवाईत निरपराध नागरिक मारल्या गेले म्हणून जनता त्यांच्या विरोधात गेली नाही , देशाची इज्जत व जगभरात ह्या संबंधी ह्या देशातून संदेश गेला. भारतात आपल्या तत्त्वासाठी कम्युनिस्ट पक्षाने नुकतेच सरकारच्या मंत्रीमंडळातून राजीनामे दिले , सत्तेसाठी चिटकून बसले नाही ,वाजपेयी ह्याना संघात देश मोठा मग व्यक्ती नाही हि शिकवण दिली होती. ह्यांचा त्यांना विसर पडला असावा. बाबरी मशीद च्यावेळी त्यांचा जो अजेंडा होता तो पूर्ण होण्यासाठी होणार्‍या संभाव्य परिणामाची पर्वा न करता कृती केली गेली ,रथयात्रा निघाल्या , मात्र सत्ता मिळताच मूळ अजेंडा बासनात बांधून आहे ती सत्ता टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड केली. ह्यापुढे गुरुजी तुम्हाला वाजपेयी सरकारचे काहीच चुकीचे दिसत नसेल तर अश्या आंधळे समर्थनार्थ शायनिंग इंडिया चे पितळ उघडे पडले हे खेदाने म्हणावे लागेल , विरोधी बाके बडवून कविता करून ,थोडक्यात नुसती टीका करून देश किंवा राज्य चालवता येत नाही , त्यासाठी मोदी सारखे कर्तुत्व लागते , ज्या प्रगत देशांनी त्याच्यावर बंदी घातली अश्या आमच्या देशाला झकत मोदींना युरोपियन युनियन मध्ये आमंत्रण द्यावे लागले , तेव्हा मोदी म्हणाले , देर आये , दुरुस्त आये , खरे तर त्यांनी म्हणायला हवे होते , मुझ मे हे दम , मे हु सिंघम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"पण कंधार प्रकरणात सरकारचा

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 21:05 नवीन
"पण कंधार प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा नडला हे अनेकांनी येथे सांगितले आहे , व पुरावे सुद्धा दिले आहेत ," कंदाहार प्रकरणात हुकुमाचे सर्व पत्ते अतिरेक्यांच्या हातात होते. कंदाहार येथे कारवाईसाठी कमांडो पाठविणे अशक्य होते. अशा वेळी १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा योग्य तोच निर्णय सरकारने घेतला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल

पिंपातला उंदीर
Sun, 03/24/2013 - 21:09 नवीन
अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल आणि त्यांच्या ऑपरेशन एटांबी चे गोडवे गात असतात. मग स्वताहाआची सत्ता आल्यावर मात्र धिसाळ धोरण अवलांबायची तर सत्ता का पाहिजे मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इतक्या वेळा सविस्तर

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 21:15 नवीन
इतक्या वेळा सविस्तर लिहूनसुद्धा यांचा हा प्रतिसाद वाचल्यानंतर मराठीतली, गीता व गोंधळ यांचा संदर्भ असलेली, एक म्हण आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

माझे पण तुमच्या

पिंपातला उंदीर
Sun, 03/24/2013 - 22:07 नवीन
माझे पण तुमच्या प्रतिसादाबद्दल हेच मत आहे. बाकी २००४ ला लोकानि सत्ते बाहेर हाकलून कौल दिलाच. २००९ तर अजुन्च दुरगती zआलि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल

मोदक
Sun, 03/24/2013 - 22:53 नवीन
ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल आपले (आणि इथे वाद घालणार्‍या सर्वांचे) मत काय..? December 20, 1978: Devendra Nath Pandey and Bhola Nath Pandey hijacked Indian Airlines flight IC-410. They demanded the immediate release of Indian National Congress party leader Indira Gandhi who was imprisoned at that time on the charges of fraud and misconduct. Later, they were awarded with party tickets for this act by the Indira Gandhi government in 1980 such that Devendra Nath Pandey rose to become a minister in the government of most populous state of India, Uttar Pradesh. This case was also mentioned by Jarnail Singh Bhindrawale to justify his claim regarding the hypocrisy of the Indian government
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

हे आणखी एक उदाहरण...

मोदक
Sun, 03/24/2013 - 23:18 नवीन
हे आणखी एक उदाहरण... On Jan 22, 1993, a Patna-Lucknow-Delhi Indian Airlines Flight IC-810 was hijacked by Satish Chandra Pandey shortly after take-off. Pandey demanded immediate construction of Ayodhya Ram Temple, lifting ban on RSS, the Bajrang Dal, and undertaking that the BJP would not be derecognized. He later surrendered at the insistence of senior BJP leader Atal Bihari Vajpayee.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अहो गुरुजी ह्या आधी १९९३

निनाद मुक्काम …
Sun, 03/24/2013 - 21:30 नवीन
अहो गुरुजी ह्या आधी १९९३ साली अमृतसर येथे एका विमान अपहरण सफलतेने मोडून काढल्याचे इंग्रजी वृत्त मी दिले होते ते तुम्ही वाचलेले दिसत नाही , तुमची रेकोर्ड अजूनही कंधार मध्ये अडकली आहे , तुमच्यापुढे हात टेकले. ह्यापुढे ह्या विषयावर बंडूमामा ह्यांनी व इतरांनी फारसे लिहू नये अशी मी त्यांना विनंती करतो. विरोधी बाकावर बसून सभात्याग करणे एवढेच तत्परतेने व सुनियोजित रित्या ह्यांना जमते ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कारगील

विकास
Fri, 03/29/2013 - 23:06 नवीन
आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचून मला माझी भुमिका बदलायला हवी का असे वाटले. ;) 'भारताचा पाकवर लष्करी, राजनैतिक विजय' आधी वाटले असे अडवाणीजी अथवा स्वराजबाई म्हणत असतील. पण वाचले तर काय, भलतेच! "लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळविला आहे , असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केले आहे. " असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दुसर्‍या देशाच्या हवाई

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 21:45 नवीन
दुसर्‍या देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आपण प्रवासी विमान असण्याची बतावणी केली तरी ते जमिनीवरील संपर्क यंत्रणेला लगेच लक्षात येते व अशा परिस्थितीत तो देश त्या विमानावर क्षेपणास्त्र डागू शकतो.
प्रवासी विमानाच्या आत काय आहे हे संपर्क यंत्रणेला कसे काय कळू शकते?
आणि समजा तसे विमान व कमांडो पाठविले असते, तरी ते कंदाहार मध्ये उतरणार कोठे? कंदाहार विमानतळावर पळविलेले भारताचे विमान तालिबानच्या सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते.
तसे असेल तर विमान नेण्याचा मुद्दा चर्चेत येण्याचेच कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कंदाहर मधे कारवाई करायला

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 22:17 नवीन
कंदाहर मधे कारवाई करायला विमान न्यायला हवे होते असे माझे म्हणणे नाही. (वर लिहिल्याप्रमाणे हे आपल्या हद्दीतच करणे शक्य होते) पण असे न्यायचेच असते तर हवाई हद्द क्रॉस करणे हे कारण मामुली आहे. कमांडो भरलेले एयर इंडीयाचे एखादे नियमीत प्रवासी विमान कुठल्याही हद्दीतुन नेणे शक्य होते. युरोपला जाणारी सर्व विमाने पाकिस्तान वरुन जातात. हा खूप कॉमन रुट आहे. भारताने त्याकाळात हवाई वाहतुन बंद केल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या

निनाद मुक्काम …
Sun, 03/24/2013 - 05:36 नवीन
गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या लोकांना एकच प्रश्न विचारतो समजा ताज मधील अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार न करता सुसूत्र व नियोजन बध्दरीत्या जर किमान २०० लोकांना हॉटेल च्या एका मोठ्या हॉल मध्ये बंदी बनवले असते , व आझाद काश्मीर साठी हे अपहरण रचले असून आम्हाला आता पकडलेला आमचा साथीदार कसाब, येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कराची मधून त्यांना बाहेर घडणाऱ्या घडामोडींची कल्पना होती , व अफजल गुरु व तिसरा अजून एक साथीदार सोडून द्या व आम्हाला हि जाऊ द्या अशी मागणी केली असती ,तर २०० निर्दोष लोकांसाठी आपल्या सरकारने तसे करावे का आणि समजा तसे केले तर ह्या लोकांनी नुकतेच बाहेर मारलेल्या निर्दोष लोकांचे काय असा प्रश्न उपस्थित होणार नाही का ती निर्भया स्वतःची इज्जत वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंज देत वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळते, आणि आम्ही हीच इज्जत अफगाण मध्ये सोडून येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

"तर २०० निर्दोष लोकांसाठी

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 13:17 नवीन
"तर २०० निर्दोष लोकांसाठी आपल्या सरकारने तसे करावे का" हा हायपोथेटिकल प्रश्न आहे. तरी माझ्या अल्पमतीनुसार याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. वरील काल्पनिक प्रसंगात अतिरेकी हे भारतातच आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करायला भारताला पूर्ण मुभा आहे. भारत आपल्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून कितीही कमांडो मुम्बईला आणू शकतो, पाहिजे ती शस्त्रे आणू शकतो व सुटकेची कोणतीही योजना आखायला भारताकडे भरपूर वेळ आहे, साधने आहेत, मनुष्यबळ आहे व स्वातंत्र्य पण आहे. त्यामुळे भारत प्रथम कारवाईचीच योजना आखणार. त्यात कमीतकमी त्रुटी राहण्याच्या दृष्टीने व कमीतकमी मनुष्यहानी होण्याच्या दृष्टीने योजना आखणार. वरील प्रसंगात भारत असेच करेल. कोणताही देश अतिरेक्यांच्या अटी केव्हा मान्य करतो, जेव्हा नागरिकांना सोडविण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट झाली असेल तेव्हाच. नागरिकांना सोडविण्याची थोडीफार शक्यता असेल तर कोणताही देश सर्वात आधी त्या सर्व शक्यता पडताळून पाहतो. जेव्हा नागरिकांना सोडविण्याच्या इतर सर्व शक्यता संपतात तेव्हा कोणत्याही देशापुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात - नागरिकांच्या प्राणांची पर्वा न करता अतिरेक्यांच्या मागण्या मान्य न करणे किंवा अतिरेक्यांच्या कमीतकमी मागण्या मान्य करून नागरिकांचे प्राण सोडविणे. कोणताही देश नागरिकांचे प्राण वाचविण्याला अधिक प्राधान्य देतो व भारताने तेच केले. सुरवातीला अतिरेक्यांनी भारतीय तुरूंगातील ४० अतिरेक्यांना सोडण्याची व २० कोटी डॉलर्स इतक्या खंडणीची मागणी केली होती. बर्‍याच वाटाघाटीनंतर शेवटी भारताने ३ अतिरेकी सोडले व त्या बदल्यात १६० नागरिकांचे प्राण वाचविले. मागील वर्षी ओरिसातल्या एका जिल्हाधिकार्‍याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर ओरिसा सरकारने त्याच्या सुटकेच्या बदल्यात नक्षलवाद्यांना तुरूंगातून सोडले होते हे लक्षात घेतले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अति होते आहे..

मैत्र
Sun, 03/24/2013 - 22:26 नवीन
श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या शांत प्रतिसादांचे कौतुक वाटते आहे.. निर्भया आणि कंदाहार याचा काय संबंध.. तुलना करण्यासाठी पण नाही.. "इज्जत वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंज देत वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळते," हाही एक बळंच मुद्दा.. शायनिंग इंडिया हाही असंबंद्ध मुद्दा.. कविता / विरोधी पक्षाची बाके बडवणे.. काहिच्या काही विधाने.. मागे एक धागा होता.. भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण .. त्यात अतिशय उत्तम मुद्देसूद चर्चा झाली होती आणि मिपावरच्या धुरंधरानी अप्रतिम माहीती मांडली होती.. शिवाय मागे क्लिंटन व इतर काहींनी २००४ च्या पराभवाची उत्तम मीमांसा केली होती.. ती पहावी.. कंदाहार या मुद्द्यावर राहून चर्चा व्हावी.. मुळात त्याचा या धाग्याशी थेट संबंध नव्हताच.. पण असो.. १६० जणांचा जीव वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे.. रुपेन कट्याल याला अतिरेक्यांनी ठार मारले.. त्या जागी तुमची जवळची व्यक्ती किंवा स्वत: असा विचार करा.. समजा कमांडो कारवाई फसली असती आणि बहुसंख्य प्रवासी मारले गेले असते.. किंवा अतिरेक्यांनी कमांडो कारवाई होते आहे लक्षात येताच कंदाहारमध्ये आय सी ८१४ बाँबने उडवून दिले असते तरी बोलणार्‍यांनी वाजपेयी सरकारलाच बोल लावला असता.. राजकारणात समोरच्याला चूक ठरवायचे असले की हवा फिरेल तसा मुद्दा मांडता येतो... जसवंतसिंग कंदाहारला जाण्यापूर्वी प्रमुख पक्षांशी बोलले होते असं अंधुकसं आठवतंय.. चूक असल्यास सांगावे.. हे असले मुत्सद्दीपणाचे तारे तोडलेले पाहिले की नेहमी त्या काश्मीरच्या मंत्र्याच्या मुलीसाठी सोडलेले अतिरेकी आठवतात.. तिथे ती एक मुलगी होती.. http://en.wikipedia.org/wiki/1989_kidnapping_of_Rubaiya_Sayeed आजवर हे कधीच चूक समजले गेले नाही ? आय सी ८१४ तर पूर्ण विमान आणि १६० प्रवासी होते... त्या ४५ मिनिटात निर्णय झाला नाही किंवा टँकर मधून हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्यावर काय योग्य उपाय होता -- सर्व वाटाघाटी बंद करून विमान उडवून द्या आणि आमची सर्व माणसे मारा असा निरोप द्यायचा? unclassified जेवढी माहिती मीडियातून येते त्याच्या आधारावर इतक्या वर्षांनी आपण एखाद्या critical situation ला इतकं काळ्यापांढर्‍या स्वरुपात कसं पाहू शकतो.. इथे तर फक्त करड्याच्याच छटा दिसत असताना.. वाजपेयी / बीजेपी वादी किंवा विरोधी हे चष्मे बाजुला ठेवल्याशिवाय मधल्या छटा मनातही येणार नाहीत.. गेल्या काहि दिवसातले निनाद जर्मनी यांचे प्रतिसाद पाहून आयडी हायजॅक झाल्यासारखे वाटते आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या

पिंपातला उंदीर
Sun, 03/24/2013 - 22:42 नवीन
श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या शांत प्रतिसादांचे कौतुक वाटते आहे.. बाकी लोकाणी काय अशांत प्रतिसाद दिले ते कळले तर फार बरे होईल. का ते तुम्हाला रुचातील असे प्रतिसाद देत आहेत म्हणून असे म्हणट आहात? मागे एक धागा होता.. भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण .. त्यात अतिशय उत्तम मुद्देसूद चर्चा झाली होती आणि मिपावरच्या धुरंधरानी अप्रतिम माहीती मांडली होती.. शिवाय मागे क्लिंटन व इतर काहींनी २००४ च्या पराभवाची उत्तम मीमांसा केली होती.. ती पहावी.. यावर वेगवेगळी मत असु शकतात. काही लोकाणा चंद्रशेखर हे खूप चांगले पंतप्रधान वाटतात. आता बोला. कंदाहार या मुद्द्यावर राहून चर्चा व्हावी.. मुळात त्याचा या धाग्याशी थेट संबंध नव्हताच.. पण असो.. तो मुद्दा तुम्ही ज्याना शानतीपूर्ण प्रतिसादाचे प्रमाणपत्र दिले त्यानी सुरू केला आहे. नीट धागा वाचले तर कळेल. समजा कमांडो कारवाई फसली असती आणि बहुसंख्य प्रवासी मारले गेले असते.. किंवा अतिरेक्यांनी कमांडो कारवाई होते आहे लक्षात येताच कंदाहारमध्ये आय सी ८१४ बाँबने उडवून दिले असते तरी बोलणार्‍यांनी वाजपेयी सरकारलाच बोल लावला असता.. राजकारणात समोरच्याला चूक ठरवायचे असले की हवा फिरेल तसा मुद्दा मांडता येतो... जसवंतसिंग कंदाहारला जाण्यापूर्वी प्रमुख पक्षांशी बोलले होते असं अंधुकसं आठवतंय.. चूक असल्यास सांगावे.. हे असले मुत्सद्दीपणाचे तारे तोडलेले पाहिले की नेहमी त्या काश्मीरच्या मंत्र्याच्या मुलीसाठी सोडलेले अतिरेकी आठवतात.. तिथे ती एक मुलगी होती.. हत्तप://एन.विकिपेडिया.ऑर्ग/विकी/1989_किडनॅपिंग_ऑफ_रुबैईया_सेयिड आजवर हे कधीच चूक समजले गेले नाही ? आय सी ८१४ तर पूर्ण विमान आणि १६० प्रवासी होते... त्या ४५ मिनिटात निर्णय झाला नाही किंवा टँकर मधून हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्यावर काय योग्य उपाय होता -- सर्व वाटाघाटी बंद करून विमान उडवून द्या आणि आमची सर्व माणसे मारा असा निरोप द्यायचा? हे असले घाबरत विचार कट्टर राष्ट्रवादी पक्ष करणार असतील तर मग कॉंग्रेस ला नेभलत पणा वरुन का शिव्या घाळयच्या गेल्या काहि दिवसातले निनाद जर्मनी यांचे प्रतिसाद पाहून आयडी हायजॅक झाल्यासारखे वाटते आहे.. पुन्हा तेच. तुम्हाला असे का वाटत आहे? तुम्हाला आवडतात ते मत ते मांडत नाही आहेत म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

स्वतःच सिद्ध केल्याबद्दल आभार..

मैत्र
Sun, 03/24/2013 - 22:49 नवीन
तुमच्या एकावर वैयक्तिक रोख नव्हता.. पण माझ्या एकाही वाक्याचे उत्तर न देता ज्या उद्धटपणे लिहिले आहे त्यातच सर्व आले.. "मला असं वाटतं किंवा माझं हे मत आहे" - इतक्या बिनबुडाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नसते.. जरा सभ्यपणे आणि मुद्द्याला उत्तर द्या.. प्रत्येक ओळीवर असंबद्ध प्रतिसाद देऊन ते भाजप वगैरेवर ढकलू नका.. थोडे संयमित आणि तर्कशुद्ध प्रतिसाद अपेक्षित आहेत.. बळंचे केलेले बालिश आरोप आणि संदर्भहीन वाक्ये नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

""मुत्सद्देगिरी ह्यालाच

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 20:57 नवीन
""मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे." मी वरील वाक्य एक सर्वसाधारण मत म्हणून समजलो होतो. बंडा मामांनी ते फक्त कंदाहार प्रकरणासंबंधात लिहिले होते हे माझ्या लक्षात आले नव्हते. हे लक्षात न आल्यामुळेच मी सहमत झालो होतो. भारत सरकार सर्वसाधारणपणे मुत्सद्देगिरीत नेहमीच कमी पडते. १९४७ पासून २०१३ पर्यंत हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मी सहमत झालो होतो. भारताचे विमान पळविणे ही चक्क गुंडगिरी होती व या प्रकरणात सर्व हुकुमाचे पत्ते हे अतिरेक्यांच्या हातात होते. त्यामुळे कंदाहार प्रकरणात मुत्सद्देगिरीला वावच नव्हता व मुत्सद्देगिरीत भारत कमी पडण्याची शक्यताच उद्भवत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझ्या प्रतिसादात ते वाक्य

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 22:22 नवीन
माझ्या प्रतिसादात ते वाक्य माझे सर्वसाधारण मत म्हणून दिले असे म्हणण्यास काहीही जागा नाही. मी ते कंदाहार प्रकरणाच्या संदर्भात लिहिले होते हे स्पष्ट आहे. पण ते असो. एकदा का विमान पळवले की हुकमाचे पत्ते अतिरेक्यांकडेच असतात पण म्हणून आपण काय खेळ सोडूनच द्यायचा नसतो. अमृतसरला ४० मिनिटे विमान होते तो वेळ विमान इममोबिलाइज करण्यास पुरेसा होता असे तिथल्याच सुरक्षा रक्षकांनी म्हंटले आहे. एकदा का विमान जॅम केले कमांडो वगैरे आणायला चिक्कर वेळ मिळाला असता. पण आपण तेवढेही करू शकलो नाहीत ही नामुष्की आहे. तुम्हाला पटो न पटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जसवंतसिंगा नीच ओलिस म्हणुन रहायला पाहिजे होते

प्रसाद१९७१
गुरुवार, 03/21/2013 - 14:13 नवीन
१६० भारतीयांची जर एव्हडी काळजी होती तर १६० खासदारांना कंदहार ला पाठवुन विमानप्रवाश्यांऐवजी ओलिस ठेवायचे. तालीबान्यांनी इतक्या नीच आणि भ्रष्ट खासदारांना ओलिस म्हणुन ठेवुन घेतले नसते ही गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

>>> प्रखर राष्ट्रवादाचा

श्रीगुरुजी
Sat, 03/16/2013 - 12:05 नवीन
>>> प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा करणार्‍या एका पक्षाच्या सत्ता काळात पण कमी अधिक फरकाने हे प्रकार घडल्याचे स्मरते या सर्व घटना २००५ ते २०१३ या कालावधीत घडलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा