आयला या बायका म्हणजे......हुS श
चांगला रविवार होता. सकळाच्या भरपेट नाश्तायानंतर आरामात सोफ्यावर पेपर वाचत पडलो होतो. ही खाली बाजारात १० मीनटात जावुन येते (खीक *lol* १० मी ) असे सांगुन गेलेली तो १/२ तास झाला तरी पत्ता नव्हाता. एवढ्यात बेल वाजली म्हणुन दरवाजा उघडला तर कोपर्यात चप्पल भिरकावत, माझ्याकडे रागाने बघत, फणकार्याने, तरातरा चालत आतमध्ये गेली. आयला जाताना तर "राजा! मी बाजारात जातेय तुला काही हवंय का?" म्हणणारी (कसं मोराचं पीस फिरवल्यागत वाटत होतं हो.