टीप :- हा धागा वाचण्या पुर्वी आयला या बायका म्हणजे......हुS श हा धागा वाचावा.
"चल गं मी गेलो " असे म्हणाले आणि हे दार लावुन ऑफिसला निघुन गेले. जरा वेळाने स्वंयपाक घरातुन बाहेर आले. म्ह्टंल सकाळपासुन नुसतं काम काम. चला आता जरा कालच्या मालिका बघायच्या राहिल्या होत्या त्या पाहुया म्हणुन सोफ्यावर बसले, तर समोर टीपॉय वर हे पाकिट तसेच विसरुन गेलेले.
" कप्पाळ , किती हा विसराळुपणा" आता टी.सी ने पकडले म्हणजे गे S ली यांची १२ डब्यांची लोकलगाडी कारशेड मध्ये.
किती हा धांदरटपणा, जर आपण ऑफिसला जाणारे कपडे रोज नवे घालतो तर जुन्या कपड्यातील पाकीट, मोबाईल , रुमाल या वस्तु स्वःताच्या स्व:तहा नको का व्यवस्थित घ्यायला, का ते पण बायकोनेच आठवणीत ठेवायचे. लग्न झाल्यापासुन पाहतेय हे, मी म्हणुन सांभाळुन घेते.
लग्नात पाहायला आले होते तेव्हा कांदेपोहे खाताना( हो कांदेपोहेच मग काय सागुती पाहिजे होती, अजुन कशात काय नाय नी) तर एवढा जोरात ठसका लागला की तोंडातुन.... जावुदे. नंतर चहा पिताना ईSS ई ती सगळी मिशी त्या चहात न्हावुन निघालेली पाहिली मी.
मग घरी सगळ्यांनी आग्रह केला म्हणुन बाईकवरुन(ते पण मित्राच्या) लॉग ड्राईव्हला नेले तर बसल्यावर एक हात खांद्यावर तर, एक मांडी वर ठेवला (कसलं रोमँटीक वाटंत होतं) तर हा Sहा Sहा S ही S ही S ही हु S हु S झाली "ह" ची बाराखडी चालु, म्ह्टलं "काय झालं?" तर " काही नाही पहिल्यांदाच एक पोरगी ( अॅ हे S हेS हे S कोणाला सांगताय, मी काय पाळण्यात आहे ) मला हात लावतेय ना! गुदगुल्या होतायत तिथे. मग त्या भेटीत तेव्हाच सांगुन टाकलं हे ओठांवरचं मैदान साफ करायचं, नाहीतर कातरुन ठेवायची तर म्हणाले "हॅ हॅ मुछें तो मर्दो की शान है." कप्पाळ माझं. लग्न झाल्यावर अमोल पालेकरचा गोलमाल चांगली झीट येई पर्यंत दाखवला पाहिजे.
आता परवाचीच गोष्ट यांना म्हटलं शुक्रावारी नविन पिक्चर लागलाय तर आपण फर्स्ट डे फर्स्टच्याच पण लास्ट शो ला रात्री ९-१२ ला जाऊया का? तर म्हणतात "तुला माहिती आहे ना हल्लीचे दिवस कसे खराब आहेत. रात्री उशिरा बाहेर थांबणे बरे नव्हे." आता कुठे गेला हो तो मर्दपणा.
हेरवी माझ्या बरोबर रस्त्याने फुटपट्टी सारखे सरळ (खीSक *lol* सरळ म्हणे. मेली सगळी पुरुषजात लो**) चालल्याचा आंव आणतात पण नजर कुठे? तर समोर येणार्या जाणार्या इतर बालिकांकडे.(मला माहिती आहे सगळे पुरुष त्यांच्या भाषेत हिरवळ म्हणतात) डोळे फाडून बघातात.
अरे बघायचे आहे ना तर बिंधास्त बघा ना, नाही कोण म्हणतंय?. एखादी सुंदर वाटली तर तारिफ पण करा की . "सौंदर्याची मुक्तपणे स्तुती करावी" मी काय नाही म्हणते आहे?" पण नाही फक्त वरवर बघत असल्यचा आंव आणायचा आणि नजर तर पार आरपार गेलेली ( शोधुन काढलं की नाही ढॅSण्टSण्टॅSटॅSण ) मला अंधुकस आठवतय या विषयावर मागे एकदा मित्राने यांना छेडलं होतं तर त्याला टाळी देत काही तरी कोटी केली होती, काय तर म्हणे " हॉटेलात गेलो आणि पोट भरलेलं असलं तरी काय झालं, मेनु कार्ड तर बघु शकतो ना." जळ्लं मेलं लक्षण ते.
बरं आता रस्त्याने चालताना कधी नव्हे ती चांगली साडी दिसली, म्हणुन दुकानात शिरले तर कपाळावर कोळ्याचं जाळं. दुकानात गेल्यावर आटप लवकरची भुणभुण, साडीचा पदर अंगावर लेवुन "कशी दिसते" सल्ला मागितला तर "जातीच्या सौंदर्याला.. म्हणत हीच साडी सुंदर आहे असा निर्णयच देतात, आणि चल आटपलं ना म्हणत पाकिटाला हात घालतात. किती घाई ही.
बरं यांना कामावरुन आल्यावर दिवसभरातलं काय घडलं म्हणुन सांगाव तर ती पण सोय नाही. शेजारच्यांचा भारी पुळका. त्या वागळ्यांच्या मीना विषयी सांगीतलं, तर काय म्हणे "बसेस वेळेवर मिळत नाहीत म्हणुन एखादे वेळेस आली असेल कोणाच्या ना कोणाच्या तरी बाईक वरुन घरी त्यात काय एवढं". हंम्म कथा कोणाची व्यथा कोणाला! अरे काय अलिबागवरुन आले काय मी? दिसत नाही मला बेस्टच्या गाड्या दर दोन मीनटाला धावत असतात रस्त्यावर ते. नट मोगरी मेली , नुसतं मिरवायला पाहिजे दुसरं काय?
ती जाडी नमिता लग्न जमत नाही म्हणुन जीमला जाते असं सांगितलं तर मलाही तिच्याबरोबर जीमला जायला सांगतात. मी जाडी वाटते तर मग होकार कसा दिलात हो ?. आणि लग्नाआधी काय मी चवळीची शेंग होते?. पहिल्यापासुन मिडीयम तर आहे माझी पर्सनालीटी.
दुसरं म्हणजे लग्ना आधी बरं लाडं लाडं वागत होतात रिक्षामध्ये चिकटून बसत होता आणि आता मी या टोकाला तुम्ही त्या टोकाला. बागेत माझ्याकडेच बघत बोलायचात; भान नसायचं आता बागेत गेलं की पक्षी, फुलं, बागकाम हे विषयावर गाडी घसरते. त्याहुन कहर म्हणजे मी राहते बाकड्यावर बसुन हे त्या माळ्याशी हे फुलझाड कोणते ते कोणते, ते कधी फुलतं अशा गप्प मारता.
घरात मी काही केलं की कधी कौतुकाचे चार शब्द कानावर पडतील तर शपथ. आज काय पोळीच्या कडा जाड झाल्यात , उद्या काय तर भाजी अळणी झाली, परवा काय तर शिजली नव्हती. मग त्या पोंक्षीणीची, काटेवहिनींची एखादी डीश आली की तीची कशीही चव असो, मग कशी यांची रसवंती पाझरयला लागते.
घरी हातात रिमोट असला तरी चुळबुळ चालू, एक धड चॅनल नीटपणे पाहतील तर शपथ, सारखं इकडे काही पहायला मिळतंय का? तिकडे काही पहायला मिळतंय का? असं करत "एम. टी.व्ही", "व्ही टी.व्ही", "एफ. टी.व्ही", "रॉक संगीत" असं सर्फिंग करायचं. खरं तर या नट्यांनी "तुम्हाला हवं ते(अंगाच्या बाबतीत) का दाखवावं, त्यांना येतय ते (अभिनयाच्या बाबतीत) का दाखवु नये म्हणते मी" बरं काहीच नाही मिळालं म्हणजे मग निराशेने गाडी इंग्रजी सिनेमाच्या चॅनेलवर येवुन थांबते. आता ते " वS गाS वS", "णॉ S ओS ओ Sव", "यॉ S व S" हे असले हेल काढत बोललेली भाषा काय ऐकायची? काय कळतंय का नुसताच मुका मुकपट बघायचा.
पण तोंडातुन मिठासवाणी आली की समजायचं काहीतरी करुन हवं असणार आज. मग कसं लाडात "ए, बर्याच दिवसात तु दुधी हलवा नाही हां केलेला. या रविवारी कर ना!" "माझ्या तोंडाला पाणी सुटलंय लाल भोपळ्याचे, घारगे कर ना " एक ना दोन. यांचा स्तुतीचा वारु चौफेर उधळलेला.
बरं केलं तर खाणार कितीसं हे एवढंस. मग शेजारच्यांची भांडी परत रिकामी देवु नयेत म्हणून तिकडे थोडं पाठवायचं.
जावु दे किती म्हणुन, अन काय काय सांगाव, फुकटचा डोक्याला चाप, मेली ती टी.व्ही ची मालिका संपुन जायची.
आता दिवसभर निदान हे येईपर्यंत तरी शांतता राहुदे रे बाबा.
हु S S श
प्रतिक्रिया
6 Mar 2014 - 5:11 pm | जेपी
मी पयला .
6 Mar 2014 - 5:54 pm | सूड
चिंच अंमळ जास्त झाली.
6 Mar 2014 - 6:32 pm | प्यारे१
>>>हु S S श
झाल्या का दोन्ही बाजू? का तिसरी पण आहे?
'तो' फळा, 'ती' शाळा, 'ते' मास्तर! ;)
6 Mar 2014 - 6:56 pm | साती
नवरा बायको यांचं इतकं स्टिरीयोटायपिंग आपल्या आईबाबांच्या काळात शोभून दिसलं असतं कदाचित.
ये दोनो लेख इस जमाने के नही बाबूमोशाय!
7 Mar 2014 - 10:01 am | शैलेन्द्र
+१११
बैलाचा डोळा..
6 Mar 2014 - 6:58 pm | रेवती
काय (मनास) पटले नाय ब्वॉ!
अजून लगीन ठरलं नै म्हणून फक्त कांदेपोहे वगैरे ठीक आहे मग गाडीवरून जाताना इतकी जवळीक? अजून काही ठरलं नाही ना? मग?
6 Mar 2014 - 7:00 pm | पैसा
तुम्हाला दोन्ही टिपिकल प्रकार माहिती आहेत तर!
6 Mar 2014 - 7:14 pm | जेपी
अवांतर - आं चिं
सदस्यकाळ 6 महिण्यापेक्षा कमी .
भरपुर स्मायल्या .
.
.
.
कुणाचा डुआयडी हाय .
सांगा सांगा लवकर सांगा ,
कोरा कागद निळी शाई आमी कुणाला भित नाई . :-)
6 Mar 2014 - 8:18 pm | भाते
जेपी,
यांच्या दोन्ही धाग्यांवर पहिला प्रतिसाद तुमचाच आहे. योगायोग? :) ह.घ्या.
आत्मशून्य - नाही तर तुमचे लेखन मिठाई होउन जाईल. +१
आंबट चिंच,
तुम्ही डुआयडी आहात हे आम्ही मिपाकरांनी शोधले आहेच. इतक्या स्मायल्या नविन मिपाकर टाकुच शकत नाही.
स्वत:हुन कबुल करा ना मग आता! मिपाकरांना हे शोधायला जास्त वेळ लागणार नाही हेवेसांनल.
27 Mar 2014 - 5:47 pm | जेपी
काल अचानक आमची ट्युबलाईट पेटली आणी लक्षात आल आंचि कुणाचा डुआयडी आहे .
धत्तड तत्तड धत्तड तत्तड .
6 Mar 2014 - 8:25 pm | आदूबाळ
भरपूर स्मायल्या वापरणारं तुमच्या माहितीत कोणी आहे का? ;)
6 Mar 2014 - 9:16 pm | सूड
स्मायल्या ठीक आहेत हो. पण शुद्धलेखन त्या मानाने बर्यापैकी बरं दिसतंय. आंबट चिंचेचं झाड निराळं दिसतंय हे. *JOKINGLY*
6 Mar 2014 - 7:14 pm | आत्मशून्य
आज ना उद्या. पण इतुकी घाई नको. धाग्यांची. नाही तर तुमचे लेखन मिठाई होउन जाईल.
7 Mar 2014 - 9:00 am | आंबट चिंच
@ जेपी :- अवांतर - आं चिं
सदस्यकाळ 6 महिण्यापेक्षा कमी .
भरपुर स्मायल्या कुणाचा डुआयडी हाय .सांगा सांगा लवकर सांगा ,जेपी :- जुना आयडी :- तथास्तु
@ भाते :- तुम्ही डु आयडी आहात हे आम्ही मिपाकरांनी शोधले आहेच. इतक्या स्मायल्या नविन मिपाकर टाकुच शकत नाही.
@ सुडः- स्मायल्या ठीक आहेत हो. पण शुद्धलेखन त्या मानाने बर्यापैकी बरं दिसतंय.
किती हास्यास्पद , आपल्याकडे संगणक येवुन किमान २० वर्ष होवुन गेली की, आता काय नविन राहले काय सगळं
मराठी शुद्धलेखन म्हणाल तर आपण आपली भाषा कशी हो अशुध्द लिहु शकतो. त्यातुन कळफलकावर चुकी होवु शकत नाही कारण सगळी कडे गमभनच चालतं (मि. पा वर येण्या आधी सुध्दा ते होतंच की), आणि गुगल ट्रांस्लेटर (http://www.google.com/intl/mr/inputtools/try) वापरा आपल्या काहीच करावं लागत नाही.
आता स्म्याईल्या, ह्म्म अहो त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात. आम्ही त्यांचे चेले आहोत. त्यातुन जो माणुस आयटी क्षेत्रातला आहे त्याला काय html, dhtml, माहिती नसणार काय? जरा गुगला तुम्हाला पण सापडतील. नाहीतर मी विरोपी पत्ता देतो. राग नसावा.
7 Mar 2014 - 4:48 pm | सूड
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात.
आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का?
7 Mar 2014 - 4:50 pm | जेपी
>>त्या स्म्याईल्या जर आत्मुगुर्जींना सुध्दा वश झाल्या त्यात आमचं काय घेवुन बसला आहात.
*biggrin* :-D :D +D =D :biggrin:आत्मुगुर्जींचं आम्ही नाव तरी घेतलंय का?
7 Mar 2014 - 11:43 am | एकुजाधव
दोन्ही भाग वाचले, मजा आली. गुगल इनपुट बद्दल सांगितल्या बद्दल धन्यवाद
7 Mar 2014 - 4:07 pm | कोकणी पुणेकर
लेखन आवडले आणि स्मायल्या पण मस्त.
नवरा असो वा बायको, आतुन कसेही असले तरी बाहेरुन सभ्यतचे कपडे घालावेच लागतात.
लेखनीच्या तलवारीने नवर्याच्या या कपड्यांची पार लक्तर केलीत हो.
27 Mar 2014 - 8:56 pm | सोत्रि
दोन्ही भाग मस्त जमलेत! झक्कास!!
बाकी रेवतीआज्जीशी १००% सहमत. तेवढा भाग जरा खटकला!
- (जातीचा पुरुष) सोकाजी
27 Mar 2014 - 9:29 pm | विवेकपटाईत
स सॉ सॉरी...*secret* :-X :-x X: x: :-# :# :secret:
मजा आली पण
डोळे फाडून बघातात = अश्या वेळी मला चष्मा लावावा लागतो (+३)
मिडीयम चा अर्थ काय घ्यायचा = चवळीची शेंग भोपळा झाली. (सौ. मिसळपाव वाचायसाठी टाईम मिळत नाही, म्हणून बर आहे)
27 Mar 2014 - 9:35 pm | गणपा
स्मायली अंमळ अश्लील वाटली.
बाकी सातीतैंशी सहमत.