हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास

वैनतेय's picture
वैनतेय in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:30 pm
गाभा: 

समस्त मिपाकार मंडळी,

राम राम!

बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न...

१. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात?
२. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात?

वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा. किंवा तत्सम संघटना या अनुषंगाने अपेक्षित आहेत.

मिपा सर्वे म्हणुयात का याला?

तळटिप:
कुठलाही वाद/प्रतिवाद (मिपाच्या terminology मध्ये काश्मीर) होऊ / करु नये हि विनंती...

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Feb 2014 - 12:39 pm | मुक्त विहारि

मस्त.

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 12:45 pm | आत्मशून्य

गवींच्या *प्रतिक्षेत. (गहन वीचारी लोकांच्या प्रतिक्षेत)

ह्याचा संदर्भ / दुवा देऊ शकलात तर चर्चा पुढे जाऊ शकते.
अवांतर : संदर्भ नाही दिला तरी ती पुढे जाणारच आहे.

बाकीच्यांचे प्रतिसाद पाहून माझे उत्तर देतो

सर्वे म्हणून घेण्यात इन प्रिंसीपल काहीच हरकत नाही.

१) पण व्यक्ती एकदा हिंदूंच्या बद्दल लिहिते मग नंतर मर्यादा स्पष्ट करणारे लिहिते तर आधी हिंदुत्ववादी होती आणि मग हिंदुत्वविरोधी झाली अशी शिक्का किंवा लेबल देण्याची घाई नाहीना ?

२) जटील समस्या सोडवण्यातील मोठ्या अडथळ्यातील एक म्हणजे, समस्यांकडे केवळ काळ्या किंवा पांढर्‍या या दोन रंगांशिवाय पहाण्याची तयारी नसणे. अधिक पर्याय उपलब्ध असतांना देखील त्यातील खरे तर आपल्याला हवा असलेला एकच पर्याय पाहू इच्छिणे. दुसरा पर्यायाचा एकच गट केलेला असतो तो म्हणजे अस्विकार्ह पर्यायांचा. हे उपलब्ध पर्यांयांना चुकीच्या पद्धतीने दुभागणे नाहीना ? अशा विभागणीत तार्किक उणीवा नाहीत ना ?

Black and white

काळा आणि पांढरा, आयुष्यात केवळ दोनच रंग?

निदान मला तरी...
तुम्ही म्हणता तसे काळे पांढरे केवळ या धाग्याच्या सोयीसाठी...

मग ठिक आणि (आपल्या उद्देशास धरून कदाचित योग्यही) आहे. मी सर्वांच्या बाजूने आणि सर्वांच्या मर्यादा आणि एका पेक्षा अधिक छटा आणि रंग बघतो असा आमचा कुरुंदकरी खाक्या म्हणून सध्या आमचा पास.

आनन्दा's picture

26 Feb 2014 - 1:27 pm | आनन्दा

बरोबर आहे.. सर्वजणा>चे परिवर्तन हिंदुत्ववादीपासून हिन्दुत्वविरोधक्पर्यन्त झाले असेलच असे नाही, पण मवाल्/जहाल नक्कीच झाले असतील.
असो. सविस्तर प्रतिसाद रात्री देइन.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2014 - 6:48 pm | अत्रुप्त आत्मा

आंम्हाला मुस्लिम प्रश्न कळल्यामुळे आंम्ही हिन्दुत्ववादी झालो. फक्त आमचा हा हिन्दुत्ववाद प्रचलित/नवा/जुना असा कोणताच नसून तो आहे फक्त हिन्दू-हितवाद! त्याचा जगातल्या कुठल्याच धर्माशी संबंध नाही! :)

प्रसाद गोडबोले's picture

26 Feb 2014 - 6:53 pm | प्रसाद गोडबोले

मी आधी कट्टर हिंदुत्ववादी होतो , मग सऊदी अरेबियाला जाण्याचा योग आला त्या निमित्ताने त्या धर्माचा/पंथाचा थोडाफार अभ्यास करण्याचा आणि हिंदु धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा योग आला .... मग इंडिया सरकारने हिंदुंवर लादलेल्या बावळट कायद्यांचा वीट आला ....मग मी कट्टर हिंदुविरोधक झालो ....

वैनतेय's picture

26 Feb 2014 - 7:04 pm | वैनतेय

१. आपण आधी हिंदुत्ववादी कसे झालात?
२. "मग इंडिया सरकारने हिंदुंवर लादलेल्या बावळट कायद्यांचा वीट आला ...." याने हिन्दुत्व विरोधक कसे झालात?
क्रुपया स्पष्ट कराल?

प्रसाद गोडबोले's picture

26 Feb 2014 - 7:11 pm | प्रसाद गोडबोले

१. आपण आधी हिंदुत्ववादी कसे झालात?
>>> कॉलेजात असताना सकाळी अभ्यासाला उठायचो सकाळी म्हणजे ४-५ च्या सुमारास , तेव्हा सेहर ची अझान ऐकु यायची ...ती ऐकताना एके दिवशी विचार आला की आपल्याकडे अशी श्रध्दा का नाही , एकद आपण आपल्या धर्मावर विश्वास ठेवुन तरी पाहु ! मग पुढे वाचन वाढल्यावर हिंदुत्ववादी झालो .

२. "मग इंडिया सरकारने हिंदुंवर लादलेल्या बावळट कायद्यांचा वीट आला ...." याने हिन्दुत्व विरोधक कसे झालात?
क्रुपया स्पष्ट कराल?

सऊदी मधे गेल्यावर लक्षात आले की हिंदु धर्मही तसा काही वाईट नाहीये , फक्त उगाचच कैच्याकै कायदे करुन भारतात हिंदुंचे खच्चीकरण चालु आहे ...हग हिंदु धर्माचा त्याग केला .... सध्या रॅशनॅलिस्ट आहे .... तर्काने जे रॅशनल वाटते ते करतो ... हिंदु धर्मात कधीच नसलेले आणि इतरांनी लादलेले सगळे कमांडमेन्ट फाट्यावर मारतो ...

बॅटमॅन's picture

26 Feb 2014 - 7:17 pm | बॅटमॅन

सध्या रॅशनॅलिस्ट आहे .... तर्काने जे रॅशनल वाटते ते करतो

सेम हिअर ऑल दो नॉट कंप्लीटलि. बहुतेकदा

"श्रुतिस्मृतिविरोधे तु श्रुतिरेव बलीयसी |
श्रुतिश्रुतिविरोधे तु युक्तिरेव बलीयसी ||"

याचा अवलंब केला की मनाचे समाधान होते, मात्र बाकी लोकांना समजावता येत नाही- ते औघड काम आहे खरेच.

आदूबाळ's picture

26 Feb 2014 - 7:41 pm | आदूबाळ

पण ते नेमके कायदे कुठले? कुठल्या सरकारने केलेले? की "कमांडमेंट" याअर्थी कायदे म्हणताय?

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2014 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले

हिंदु वारसा कायदा
हिंदु विवाह कायदा
पंढरपुरचे मंदिर ताब्यात घेतले तो कायदा
जादुटोणा विरोधी कायदा
.
.

खरतर ह्या सगळ्या गोष्टी धर्माच्या डोमेन मधे येतात ,त्यात राजसत्तेने ढवळाढवळ करायची गरज नव्हती

माहितगार's picture

27 Feb 2014 - 12:33 pm | माहितगार

आपला तर्क ग्राह्य धरण्यासाठी विवीध धर्मसंस्थांचे (अनेकवचन आहे) अबाधितपणे ऐकायचे तर सतीप्रथा अस्पृश्यता; अर्बिट्ररीली गुन्हेगार ठरवून दगड फेकून मारणे अशा इतर अनेक बाबतीत विधान मंडळांना पावले माघारी न्यावी लागणार नाहीत ना ?

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2014 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

प्रश्न कळाला नाही ...

मग इंडिया सरकारने हिंदुंवर लादलेल्या बावळट कायद्यांचा वीट आला ....मग मी कट्टर हिंदुविरोधक झालो ....

मला तुमचं हे विधान कळलं नाही म्हणून विचारत होतो.

हिंदू धर्म वाईट नाही. कायदे बावळट आहेत, म्हणजे कायदे करणारं सरकार बावळट आहे. मग तक्रार सरकारबद्दल असेल, तर त्याग सरकारचा करायला पाहिजे. हिंदू धर्माचा का केला?

खरतर ह्या सगळ्या गोष्टी धर्माच्या डोमेन मधे येतात ,त्यात राजसत्तेने ढवळाढवळ करायची गरज नव्हती

माझ्यामते धर्माच्या डोमेनमधल्या या गोष्टींमुळे सरकारच्या डोमेनमधल्या विषयांवर प्रभाव पडत होता. उदा. हिंदु वारसा कायदा - संपत्तीवरील वारसाहक्क. त्यामुळे तो तो कायदा सरकारी डोमेनमधल्या विषयांवर भाष्य करतो.

सत्यनारायणाच्या पूजेला कथा ऐकावी का यो यो हनीसिंगचं गाणं ऐकावं हा त्या पूजा घालणार्‍याचा आणि सांगणार्‍याचा प्रश्न आहे. त्यात सरकार ढवळाढवळ करत नाही. पण उद्या कोणी पुत्रकामेष्टी यज्ञ करून त्यात नरबळी द्यायला निघालं तर तो प्रश्न सरकारच्या डोमेनमधला होतो. त्यावेळी "हा धर्माच्या डोमेनमधला प्रश्न आहे" म्हणून सरकार हात झटकू शकत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2014 - 7:28 pm | प्रसाद गोडबोले

गडबड करताय आदुबाळसाहेब ,

मग तक्रार सरकारबद्दल असेल, तर त्याग सरकारचा करायला पाहिजे. हिंदू धर्माचा का केला?

ना रहेगा बास ना बजेगी बासुरी म्हणुन ! खरं तर सरकार फक्त हिंदुंना चेपु शकतं इतरांना नाही म्हणुन धर्माचा त्याग करा ...

हिंदु वारसा कायदा - संपत्तीवरील वारसाहक्क. त्यामुळे तो तो कायदा सरकारी डोमेनमधल्या विषयांवर भाष्य करतो.

का बरं ? हिंदु त्यांच्या संपत्तीची वहिवाट लावायला सक्षम आहेत की ! त्यांन्ना निधर्मी सरकारने का शिकवावं की संपत्ती कशी वाटावी ते ?

पण उद्या कोणी पुत्रकामेष्टी यज्ञ करून त्यात नरबळी द्यायला निघालं तर तो प्रश्न सरकारच्या डोमेनमधला होतो.

इथे तुम्ही अतिषयोक्ती अलंकाराचा प्रयत्न करायचा प्रयत्न केलाय का ? कारण पुत्रकामेष्टी यज्ञात नरबळी नसतो .
तुमच्या पॉईट वरुन सांगतो , कित्येक देवस्थानांच्या आवारात पशुबळी द्यायला सरकारने मनाई केली आहे .... पण 'कुर्बानी' द्यायला कोठेही मनाई नाही ते बरें चालते !
हिंदुंना ठणकावुन सांगतात की वडिलोपार्जित संपत्तीत स्त्रीचाही अधिकार , पण इतर धर्मातल्या स्त्रीला पोटगी द्यायचा न्यायालयाने दिलेला निर्णय फाट्यावर मारतात , तिला वडीलोपार्जित संपत्तीत वाटा मिळत असण्याची शक्यता नगण्यच आहे मग !!
हिंदु मंदीरात कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही असा कायदा करतात (उदा: पंढरपुरमंदीर) पण पारसी लोकांच्या अग्यारी बाहेर स्पष्टशब्दात लिहिलेले असते की "पारशी अन झोराष्ट्रीयन व्यतिरिक्त कोणाला प्रवेश नाही" ते चालते !!

हिंदुअंची मंदीरं ताब्यात घेतात पण इतर धर्मियांच्या प्रारथनास्थळाबद्दल बोलण्याचीही धमक नाही( अहो प्रार्थना स्थळं दुर राहिली , प्रतापगडावरचे अफजलखानाच्या थडग्या भोवतीचे सर्व बांधकाम अवैध आहे शिवाय त्याच्या कमीटीवर असलेला एक जण आयेसाय शी सल्ग्न होता तरीही त्या बांधकामाला धक्का लावण्याचे डेरींग नाही ... )

आणि सत्यनारायणाविषयी बोललात म्हणुन , अहो येता जाता सत्यनारायणावर टीका करणारे १७६० लोक भेटतील त्यांना सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाठीशी घालेल पण सॅटॅनिक वर बॅन घालण्यात मात्र सरकार पहिला नंबर पटकावेल !!

तर आहे हे असे आहे ....
च्यायला हिंदु म्हणुन जगण्याची समृध्द अडगळ वागवण्यापेक्षा हिंदुधर्ममुक्त होवुन 'पेगन' किंव्वा वैदिक होवुन राहं कैक पटीने चांगलं !!

ना रहेगा बास ना बजेगी बासुरी म्हणुन ! खरं तर सरकार फक्त हिंदुंना चेपु शकतं इतरांना नाही म्हणुन धर्माचा त्याग करा ...

हा त्रागा नसेल तर - हे अजूनही लॉजिकल कसं हे पटलं नाही. असू दे. माझाच अभ्यास कमी पडत असेल.

बाकी मान्य.

अवांतरः हिंदू लॉवरचं प्रमाण मानलं जाणारं पुस्तक "मुल्ला" नावाच्या माणसाने लिहिलं आहे!

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2014 - 10:30 pm | प्रसाद गोडबोले

त्रागा नाही ... हा लॉगिकल वे आऊट आहे ... आपण स्वतः हिंदु नाही हे डिक्लीयर केल्यावर आपल्यावर हिंदु कायदे बंधन्कारक ठरत नाहीत ... आणि तरीही समजा हिंदु कायद्यांखाली आपल्यावर काही कारवाई झाली तर लॉजिकली , आपण "हा आपल्या धर्मावर हल्ला आहे " असा स्टॅन्ड पॉईट घेवुन "प्रत्युत्तर" देवु शकतो .

आपल्याला हिंदु असण्याचे फायदेही नकोत आणि तोटेही नकोत :)

कर्रेक्ट.
रादर, फायदे हवेत, तोटे नकोत.
यालाच दांभिकता म्हणतात.

आजानुकर्ण's picture

27 Feb 2014 - 11:25 pm | आजानुकर्ण

त्रागा नाही ... हा लॉगिकल वे आऊट आहे ... आपण स्वतः हिंदु नाही हे डिक्लीयर केल्यावर आपल्यावर हिंदु कायदे बंधन्कारक ठरत नाहीत ... आणि तरीही समजा हिंदु कायद्यांखाली आपल्यावर काही कारवाई झाली तर लॉजिकली , आपण "हा आपल्या धर्मावर हल्ला आहे " असा स्टॅन्ड पॉईट घेवुन "प्रत्युत्तर" देवु शकतो .

हा हा... हे इतके सोपे नाही. असे करणारे अनेकजण तोंडघशी पडले आहेत. तुम्ही सरळसरळ मुसलमान किंवा ख्रिश्चन झाल्याशिवाय तुम्हाला हिंदुविरोधी सरकारपासून सुटका नाही. बौद्ध, जैन, शिखांपासून नास्तिकापर्यंत भारतात सगळेजण हिंदूच आहेत. दलितांना मंदिरप्रवेश द्यायला लागू नये म्हणून 'आम्ही हिंदू नाही' असे जाहीर करणाऱ्या स्वामीनारायण मंदिरवाल्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेच फटकावले होते हे कालच वाचले.

मूळ संदर्भ 'The Hindus - An Alternative History' या पुस्तकात वाचावा.

In 1966 the Indian Supreme Court was called upon to define Hinduism because the
Satsangis or followers of Swaminarayan (1780-1830) claimed that their temples did not fall
under the jurisdiction of certain legislation affecting Hindu temples. They argued that they were
not Hindus, in part because they did not worship any of the traditional Hindu gods; they
worshiped Swaminarayan, who had declared that he was the Supreme God. The court ruled
against them, citing various European definitions of Hinduism.....

विकास's picture

27 Feb 2014 - 11:42 pm | विकास

धाग्याचे काश्मीर होऊ लागलेच आहे तर अजून काही पिंका... ;) ३

मूळ संदर्भ 'The Hindus - An Alternative History' या पुस्तकात वाचावा.
या पुस्तकासंदर्भात पेंग्विन इंडीया प्रकाशन संस्थेचा देखील छापणे आणि त्याचे पल्प करणे असा प्रवास झाल्याचे आठवले.

असो. स्वामी नारायण पंथा आधी असा प्रकार रामकृष्ण मिशनने केला होता. कारण कलक्त्यात हिंदू मिशनच्या शाळांवर सरकारचे वर्चस्व होते तर इतर धर्मियांच्या शाळांवर त्यांच्या मिशन/संस्थांच्या मंडळांचेच नियंत्रण होते. म्हणून रामकृष्ण मिशनने ते एक हिंदू नसून अल्पसंख्य पंथ असल्याचे जाहीर केले. तसे त्यांचे म्हणणे जवळपास ५-६ वर्षे चालले होते पण शेवटी सुप्रिम कोर्टाने ते नाकारले. फक्त एकच झाले की हिंदू शाळांना सरकारी नियंत्रणात ठेवण्याच्या नियमातून प. बंगाल सरकारने रामकृष्ण मिशनला अपवाद ठरवून मोकळे केले. त्यामुळे त्यांच्यापुरता तो प्रश्न सुटला.

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2014 - 1:39 am | प्रसाद गोडबोले

आता हिंदु धर्म सेल्फ डिस्ट्रक्ट मोड वर आहे म्हणल्यावर ....
अहमदीया / कादियानी / सुफी टाईफ इस्लामचा पंथ जॉईन करुन कबीर किंव्वा दाराशिकोव्ह किंव्वा संत शेखमहंमद सारखे आयुष्य जगायला आपली काही हरकत नाही :)

नितिन थत्ते's picture

27 Feb 2014 - 10:36 pm | नितिन थत्ते

>>का बरं ? हिंदु त्यांच्या संपत्तीची वहिवाट लावायला सक्षम आहेत की ! त्यांन्ना निधर्मी सरकारने का शिकवावं की संपत्ती कशी वाटावी ते ?

हिंदू वारसा कायद्याने/हिंदू विवाह कायद्याने सरकार हिंदूंना (हिंदू धर्माबाहेरचं) काहीतरी वेगळं करायला लावतं असा आपला समज दिसतो. तो गैरसमज आहे हे नोंदवून मी आपले चार शब्द संपवतो.

हिंदू वारसा कायद्याने/हिंदू विवाह कायद्याने सरकार हिंदूंना (हिंदू धर्माबाहेरचं) काहीतरी वेगळं करायला लावतं असा आपला गैरसमज दिसतो.
तेच तर ! जर धर्माबाहेरचं काही होत नाहीये तर मग कायदा करायची गरज का भासली ?

आनंदी गोपाळ's picture

27 Feb 2014 - 10:53 pm | आनंदी गोपाळ

नक्की का? आपले विधान जरा तपासून पहाणार का?

धर्मराजमुटके's picture

27 Feb 2014 - 10:55 pm | धर्मराजमुटके

चुक दाखवून दिली तर आभारी होईन.

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2014 - 11:03 pm | प्रसाद गोडबोले

हिंदू वारसा कायद्याने/हिंदू विवाह कायद्याने सरकार हिंदूंना (हिंदू धर्माबाहेरचं) काहीतरी वेगळं करायला लावतं असा आपला समज दिसतो. तो गैरसमज आहे हे नोंदवून मी आपले चार शब्द संपवतो.

नितीनराव , खरंच सांगतो , माझ्या माहीती नुसार कोणत्याही हिंदु धर्मग्रंथात विवाहीत स्त्रीला वडीलोपार्जित संपत्तीत वाटा द्यावा असे सांगितलेले नाहीये .

आता हा माझा गैरसमज असेल तर कृपाया सदर धर्मग्रंथाचा आणो श्लोकाचा रेफरन्स द्यावी ही नम्र विनंती !

आजानुकर्ण's picture

27 Feb 2014 - 11:27 pm | आजानुकर्ण

हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता/ते ह्या प्रश्नाचे प्रथम उत्तर शोधावे लागेल. भारताचे संविधान हाही हिंदूंचा धर्मग्रंथ होऊ शकतो.

प्रसाद गोडबोले's picture

28 Feb 2014 - 1:44 am | प्रसाद गोडबोले

संविधान चालेल की ...फक्त त्याला एकच प्रॉब्लेम आहे की त्याला देवाचे अधिष्ठान नाही ...जे की प्रत्येक धर्मग्रंथाला आहे ...
आणि देवाच्या अधिष्ठाना शिवाय धर्म स्थापन होत असते तर कम्युनिझम हा सर्वात ग्रेट धर्म झाला असता ...... कार्लमार्क्स इस द ग्रेटेस्ट हुमन बीईंग बॉर्न ओन थिस प्लनेट :)

मूकवाचक's picture

26 Feb 2014 - 7:16 pm | मूकवाचक

कट्टर हिंदुत्वविरोधी लोकांची मतं वयोमानानुसार बदलतात का? वाढत्या वयानुसार मतं बदलत जातात याबद्दल हिंदुंत्ववाद्यांचा कुणाला हेवा वाटतो का असाही एक उपप्रश्न पडला. असो.

बॅटमॅन's picture

26 Feb 2014 - 7:19 pm | बॅटमॅन

तरुणपणी कट्टर डावी, लिब्रल, पोथीनिष्ठ, इ.इ. असलेली बरीच्च जन्ता नंतर स्टेटस-को वादी होते म्हणतात.

माहितगार's picture

26 Feb 2014 - 7:40 pm | माहितगार

हा गुणधर्म विशीष्ट बॅकग्राऊंडच्या समुहास लागू होतो का सर्वसाधारण मानवी बिहेवीअर आहे ? माझा इथे एक प्रतिसाद आहे तो पुन्हा खाली नमुद करण्याचा प्रयत्न करतो.

धर्मपालन आणि धर्मांतराची विवीध कारणे असू शकतात त्यातील काही वरील प्रतीसादात आली आहेतच.प्रलोभन,फसवणूक आणि सक्ती या तीन बाबींची शक्यता पूर्ण नाकारता येते अस नाही पण या तीनही बाबींची मर्यादा या रोजच्या जीवनातील सांस्कृतीक बाबींचे पालन हुबेहूब करून घेण्यास स्वसमर्थ नसतात.

बालवयात काही सांसकृतीक अंगांच अनुकरण सहाजिक पणे होतच असत सोबतीस काही मुल्यांच अनुपालन व्हाव म्हणून काही संस्कार पढ(घड)वलेही जातात.कुमारअवस्था ते तारूण्याचा काळ आपापल्या वैचारीक कुवती नुसार पढवल्या गेलेल्या मुल्यांच आणि अनुकरणित बांबींच व्यक्ती स्वतःशीच पुर्नमुल्यांकनही करते आणि पुढेचालून हि मुल्य आपण अनुसरत राहणार आहोत अथवा नाही याचे स्वतःशीच ठोकताळे बांधत जाते.जे आजूबाजूचे लोक करत आहेत तेच चालू ठेवले तर फारसे प्रश्न उद्द्भवत नाहीत.पण इतरांपेक्षा काही वेगळ करावयाच झाल्यास आसपासच कौटूंबिक, सामाजीक,राजकीय वातावरण प्रत्येकाच्या बबतीत पुरेस स्वातंत्र्य देतच अस नाही.कुरुंदकराम्च्या शब्दात त्यामुळेच व्यक्ती स्वातंत्र्य जन्मसिद्ध कमी आणि संस्कृती सिद्ध अधिक असत. अपेक्षीत स्वातंत्र्य भोवतालच्या संस्कृतीत नसेल तर ते सिद्ध कराव लागत प्रसंगी स्वतःच वेगळेपण जपण्या करता वैचारीक संघर्षासहीत सामाजिक अथवा राजकीय संघर्षही करावा लागतो.पण तारुण्यात इतर समाजावर कमी अवलंबून असताना संघर्ष करण जेवढ सहज असत तेवढ कौटूंबिक आर्थीक जबाबदार्‍या आणि अपेक्षा वाढतानाच्या काळात आसपासच्या समुदायाशी पुर्वी इतकच फटकून वागता येत नाही.त्यामुळे पुर्वायूष्यात बदलांबद्दल अथवा पुरोगामीत्वा बद्दल आग्रही असलेली व्यक्ती उत्तरायूष्यात आग्रह गुंडाळून ठेवताना दिसते.इथे महात्मा फुल्यांचा एका विशीष्ट समुदाया बद्दलचा उल्लेख प्रस्तुत ठरतो कि या विशीष्ट ज्ञातीचे लोक तारूण्यातच तेवढे पुरोगामी असतात.पण बहुधा हि वस्तुस्थिती सर्वच मानव समूहातील आपला लढा यशस्वी न होणार्‍या बहुतांश व्यक्तींबद्दल सारखीच लागू पडते कारण व्यक्ती पेक्षा समाज अधिक स्थितीशील असतो.

रोजच्या जीवन जगताना व्यक्तींना कोणत्या न कोणत्या पातळीवर कौटूंबिक तसेच सामाजीक सहकार्याची आणि ओळखीची गरज भासते.म्हणून अनुकरणा शिवाय पर्याय नसतो.वस्तुतः जे लोक धर्म बदलतात तेव्हा त्यांच तत्वज्ञान तेवढ बदलल जावयास हव आणि सांस्कृतीक अनुसरणाचा बहुतांश भाग पुर्बी प्रमाणे चालू ठेवण्यास काही अडचण येऊ नये पण प्रत्यक्षात होणारी गोष्ट वेगळी होते.धर्म आणि सांस्कृतीक अनुसरणाची कर्मकांडाची सांगड धर्ममार्तंड आणि समाजाकडून एवढी घालून दिली जाते कि तुम्ही संबधीत सांस्कृतीक अनुसरण नाही केल तर तुम्हाला सामाजिक ओळख नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते.ज्या व्यक्तीने स्वतःहून अनुकरणाशी बंड केल ती प्रत्येक नव्या कर्मकांडाच अनुकरण करण्यात स्वारस्य ठेवणारी असावयास नको पण स्वतःची ओळख कायम करण्यासाठी अनुकरणा शिवाय फारसा पर्याय शिल्लक रहात नसावा. प्रलोभन,फसवणूक आणि सक्ती या या तीनही बाबींची मर्यादा या रोजच्या जीवनातील सांस्कृतीक बाबींचे पालन हुबेहूब करून घेण्यास स्वसमर्थ नसली तरी नवी सामाजीक ओळख सिद्ध करण्या साठी अनुकरण केल जात. बर्‍याचदा नव्याने धर्म स्विकारणार्‍या व्यक्ती अधिक कट्टर होतात अस म्हटल जात कारण त्यांना स्वतःला नवीन समाजात सिद्ध करण्याची गरज भासत असावी.

जबरी प्रतिसाद, बह्वंशी सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2014 - 2:34 am | अत्रुप्त आत्मा

+१ टू ब्याटुक!

विकास's picture

26 Feb 2014 - 7:29 pm | विकास

हिंदुत्ववाद म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे अथवा समजले आहे ते समजले तर उत्तरे देणे सोपे जाईल.

आणि अनेकदा चर्वितचर्वण झालेला सुध्दा... पण या धाग्याच्या सोयीसाठी केवळ रुढार्थाने म्हणजे सामाजिक अथवा सांस्क्रुतिक म्हणु यात का?
तुम्ही राजकिय सोयिचे असेल तर तसेही ग्रुहीत धरायाला हरकत नाही...

अवांतर : तो रुकार (चिन्ह) कसे आणायचे बुवा?

बॅटमॅन's picture

26 Feb 2014 - 7:55 pm | बॅटमॅन

कृष्ण = kRuShNa.

ऋषि = RuShi.

विकास's picture

26 Feb 2014 - 8:22 pm | विकास

योगायोग आहे, पण ज्या माणसाने हिंदूत्ववाद हा शब्द शोधला त्याची अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. तुम्ही ज्याला सामाजीक आणि सांस्कृतिक म्हणत आहात ते धार्मिक आहे जे त्यांच्या डोक्यात नव्हते. राजकीय नक्कीच होते. त्यामुळे या विषयावर चर्चा करताना धार्मिक वळणावरून चर्चा होत असेल तर त्याचा खर्‍या हिंदूत्ववादाशी संबंध नाही असेच म्हणावे लागेल.

दुश्यन्त's picture

26 Feb 2014 - 8:03 pm | दुश्यन्त

याच्या उलट भोंगळ सेकुलरवादी नेते/ पक्ष पाहून आधी हिंदुत्ववादी नसलेला मी आता हिंदुत्ववादीच बरोबर या मताला आलो आहे.

माहितगार's picture

26 Feb 2014 - 8:18 pm | माहितगार

एकदा स्वातंत्र्य मिळवणारी पिढी संपलीकी; लोकशाहीतील मास पॉलीटीक्स वाले बहुसंख्य राजकीय नेते ह्युमन नेटवर्कींग; आणि मास पॉलीटीक्स करता नेमक्यावेळी नेमक लक्षवेधी बोलण इत्यादी कौशल्ये बाळगून असतात. वादांच्या बाबतीत लीपसर्वीसच्या पलिकडे काही देण घेण नसतं निव्वळ राजकीय सोय बघीतली जाते त्यामुळे सेक्युलर पक्षातले नेते सेक्युलर असतील; डाव्यातले डावे असतील; धार्मीक पक्षातले धर्मवादी असतील अशी वस्तुतः खात्री नसते. या पक्षात असताना इकडच लेबल त्या पक्षात असताना तीकडच लेबल. जनतेची स्मरणशक्ती अशा बातीत कमी असते का माफ करतात माहीट नाही पण राजकीय नेत्यांच्या उड्या आणि कोलांट उड्या कडे सर्वसामान्य जनता दुर्लक्षकरूनही स्विकारत जाते (किंवा क्वचीत तीरस्कार करते). पण विवेकी व्यक्तींनी या कोलांट उड्यांना किती मह्त्व द्याव ह्याचा सर्वसामान्य म्हणून आपला आपणच विचार करावा.

फारएन्ड's picture

26 Feb 2014 - 10:14 pm | फारएन्ड

परफेक्ट एकदम. असंख्य लोक विविध नेत्यांच्या तात्पुरती सोय म्हणून घेतलेल्या "अजेंड्या" ला काहीतरी तात्त्विक भूमिका समजून तो सगळा प्रोपोगंडा खराच मानू लागतात व स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करतात. यावर आपल्या विशाल कुलकर्णीची एक खत्रा कविता आठवली
http://www.maayboli.com/node/6745

माहितगार's picture

27 Feb 2014 - 1:31 pm | माहितगार

कविता सॉलीड आहे. त्यामुळेच जे न देखे रवी.. म्हणत असावेत. कवितेच्या दुव्याकारता प्रतिसादा करीता धन्यवाद.

मृगजळाचे बांधकाम's picture

27 Feb 2014 - 3:42 pm | मृगजळाचे बांधकाम

एकदम सही भाउ,

आधी तथाकथित पुरोगामी असलेली पण नंतर कट्टर हिंदूत्ववादी झालेल्यांचे काय?

प्रश्नांची उत्तरे शोधतांना काँग्रेस, कम्युनिस्ट, अलकायदा, मुस्लिम लिग यांचा का विचार करायचा नाही?

वैनतेय's picture

27 Feb 2014 - 3:51 pm | वैनतेय

पण धागा हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास हया साठी काढलाय... दुर्दैवाने विषयाला फाटे फुटलेत आणि मुळ विचारलेला प्रश्न बाजुलाच पडलाय...

मृगजळाचे बांधकाम's picture

27 Feb 2014 - 3:49 pm | मृगजळाचे बांधकाम

मी अगोदरच धर्म या संकल्पनेबद्दल साशंक होतो.धर्म अधिक समजून घेण्यासाठी खूप वाचले.रसेल वाचला,आता मी मुलीचे कान सुद्धा टोचले नाहीत

माहितगार's picture

27 Feb 2014 - 4:21 pm | माहितगार

जेव्हा राज्यशास्त्र राज्यसंस्था आणि विवीध शास्त्र शांखांचा संस्थांचा स्वतंत्र विकास नव्हता त्या काळातला सर्वव्यापी होऊ पहाणारा धर्मसंस्थांचा परीघ आधूनिक काळात बराच आक्रसला असला तरी स्थितीशील मानवी समाजाने तो अद्यापी नेटके पणाने अभ्यासलेला आहे असे म्हणणे धाडसाचे होते. त्यामुळे माझी आजही धर्म आणि संस्कृती धर्म आणि अर्थशास्त्र अशी कुठेही कशीही गल्लत होत रहाते. समुह म्हणून हा गुंता जेव्हा सुटायचा तेव्हा सुटेल. माझ्या स्वहितासाठी तो आधी माझ्या मनातन सुटावयास हवा.

Overlapping circles

ओव्हरलॅपींग सर्कल्स सौजन्य विकिमीडिया कॉमन्स

कर्णवेध हिंदू रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे. सामान्यपणे सोनाराकडून कानटोचून घेतात. सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो. मुलीचे कान टोचताना प्रथम डावा कान टोचण्याची प्रथा आहे. `देव-देवतांनो, आमच्या कानातून आम्हास परमोच्च आनंददायक गोष्टी ऐकू येऊ देत' अशा मंत्राने कर्णवेधाचे वेदामध्ये समर्थन केलेले आहे. (ऋग्वेद १.८९.८)

मुलामुलींचे कान टोचणे. कानाचा संबंध शब्दग्रहणाशी असून शब्द हा आकाशाचा गुण आहे. आकाशाची व्याप्ती अगण्य आहे. कानात शब्द गुणाने वास करणारे आकाश अमर्याद असल्यामुळे त्याची शक्तीी प्रचंड आहे. या शक्तीकस वाव न मिळाल्यास काही वेळा अनर्थही घडू शकतो. ज्याप्रमाणे चांदीची पोकळ मुर्ती तयार करताना कारागीर त्या मूर्तीच्या बुडाशी एक छोटे छिद्र मुद्दाम करुन ठेवतो. तसेच न केल्यास उष्णतेचा संपर्क घडताच ती मुर्ती फुटुन विच्छिन्न होण्याची व तुटण्याची शक्यता असते. त्याप्रमाणे कानाला छिद्र नसेल तर डोक्यात साठून राहिलेल्या कामक्रोधाचे स्फोट होतात व सहनशीलता कमी होते. अशी पूर्वापार संकल्पना आहे. म्हणून स्त्रीयांचे कान टोचून त्यात कर्णफूले घातली जातात. कारण स्त्रियांना संसारात वावरताना बरीच सहनशीलता ठेवावी लागते. तसेच त्यांना अतिक्रोधी, अतिकामुक, अतिमत्सरी बनून चालत नाही.

कान न टोचलेली व्यक्ती् जितकी कामुक, क्रोधी व व्देषी असते. तितकी कान टोचलेली व्यक्तीा असत नाही. दुसरे कारण कानाच्या पाळीमागे उपजतच असलेल्या सुक्ष्म खोलगट भागात दमा, खोकला, क्षय या रोगांच्या संबंधीत नसा असतात. तो भाग सच्छीद्र असल्यावर तो रोग बरा होण्यासाठी तथा त्या संबंधीचा त्रास अति तीव्रतेने बाधक न होण्यास मदत होते. या वरच आधारीत आजच्या काळी प्रसिध्दीस असलेली व चीनी शास्त्र म्हणून ओळखले जाणारे अक्युपंक्चर शास्त्र हे आपलेच आहे.

सेरेपी's picture

28 Feb 2014 - 6:19 am | सेरेपी

अरे बापरे. कठीणच दिसतंय एकुणात.

कान न टोचलेली व्यक्ती् जितकी कामुक, क्रोधी व व्देषी असते.

तरीच अ‍ॅडमला "ते" फळ खायची बुद्धी झाली!

चिगो's picture

1 Mar 2014 - 9:35 am | चिगो

कान न टोचलेली व्यक्ती् जितकी कामुक, क्रोधी व व्देषी असते. तितकी कान टोचलेली व्यक्तीा असत नाही.

हॅ हॅ हॅ.. मी वयाच्या सविस्साव्या वर्षी (स्वखुशीने) कान टोचून घेतले. असा काही फरक जाणवला नाही ब्वाॅ..

भडकमकर मास्तर's picture

27 Feb 2014 - 5:32 pm | भडकमकर मास्तर

कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा

भडकमकर मास्तर's picture

27 Feb 2014 - 5:35 pm | भडकमकर मास्तर

कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचाकॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा
कॉलिन्ग थत्तेचाचा

मृगजळाचे बांधकाम's picture

27 Feb 2014 - 8:04 pm | मृगजळाचे बांधकाम

आपण आपल्या धर्मविषयक प्रश्नांची,शंकांची उत्तरे विविध माध्यमांतून शोधण्याचा प्रयत्न करतो,ज्यामध्ये मुख्य माध्यम असते पुस्तक.आपण जर भारतीय लेखकांचे पुस्तके वाचत असू तर त्यांच्यामध्ये धर्मविषयक टिपिकल,पारंपारिक विचार व्यक्त केलेले आढळतात,ज्यांनी आपल्या पारंपारिक धर्मविषयक समाज धारणा अजूनच धृढ होतात. अर्थात काही लेखक याला अपवाद असतील,पण या सन्दर्भात आपण परकीय लेखकांची पुस्तके वाचली तर धर्मविषयक आपल्या धारणा,समज यामध्ये प्रचंड बदल घडून येतात,उदा रसेल सारखा लेखक आपल्या धर्मविषयक संकल्पनांनांच सुरुंग लावतो,रसेल ची पुस्तके इतकी तार्किक दृष्ट्या इतकी पटतात,कि आपल्या मूळ संकल्पना पाळ्या पाचोळ्या सारख्याच उडून जातात,आणि धर्माबद्दल आपण नव्याने विचार करण्यास प्रवृत्त होतो.

सुहास..'s picture

27 Feb 2014 - 8:14 pm | सुहास..

मास्तराशी सहमत !!
कॉलिंग थत्तेचच्चा

विजुभाऊ's picture

27 Feb 2014 - 10:34 pm | विजुभाऊ

हिंदुत्ववादी म्हणजे काय हो?
भाजप हा एक हिंदुत्ववादी संघटनेचे औरस अपत्य आहे.( अर्थात ती संघटना हे पालकत्व उघडपणे मान्य करीत नाही हे वेगळे)
मी पूर्वी शाखेत जायचो याचा अर्थ मी हिंदुत्ववादी होतो असे मानले तर आता मी शाखेतील मूल्ये मान्य करतो मात्र त्यांचा आंधळा इतरधर्म विरोध अमान्य करतो.
मी न कळत्या वयात हिंदुत्ववादी होतो. आता मात्र त्या वेळची मते हास्यास्पद वाटतात. ( याचा अर्थ मी कोणत्या वादी गटात मोडतो?)
ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी अशी दोन मते मान्य केली तर मग या दोन गटात हिंदुत्ववाद कुठे उरतो?
जे लोक देवावर श्रद्धा ठेवतात ते हिंदुत्ववादी असे म्हणायचे आहे का? देव ही संकल्पनाच माननिर्मीत आहे.
सोयीनुसार राजकीय आणि धार्मीक मतांची गल्लत करणे हे सर्वच धार्मीक आणि राजकीय संघटनांची प्राथमीक गरज असते.

आयुर्हित's picture

27 Feb 2014 - 11:17 pm | आयुर्हित

मीही लहानपणापासून शाखेत जायचो. ब्राह्मणगल्लीत राहायला असल्याने इतर धर्मियांशी संबंध यायचे तसे काही कारण नव्हते.

पण (तुमच्या साठी)आश्चर्य(असेल ही कदाचित)म्हणजे ज्या शाखेत जायचो तया शाखेत काही मुसलमान बंधूही यायचे व अजूनही आम्ही शाखेसाठी/समाजासाठी/भारतदेशासाठी एकत्र काम करत असतो.

शाखेत आपल्या संस्कृतीनुसार स्वत:ला सुसंस्कारित करायलाच वेळ पुरत नाही तेथे इतरधर्म विरोध हे कधीच शिकवले गेले नाही आणि जाणारही नाही!

मृगजळाचे बांधकाम's picture

1 Mar 2014 - 7:16 pm | मृगजळाचे बांधकाम

कानाला छिद्र नसेल तर डोक्यात साठून राहिलेल्या कामक्रोधाचे स्फोट होतात,आणि सहनशीलता कमी होते,फारच विनोदी लिहिले आहे ब्वा.कानाला छिद्र ठेवायला देव का विसरला असेल बरे?