वैकुंठ-सहगमन!!
डिस्क्लेमर सुरु:
(शीर्षकाबद्दल कोणाला काही आक्षेप असलाच तर अॅडव्हान्समध्ये माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)
(चू भू द्या घ्या. ह घ्या.)
डिस्क्लेमर समाप्त
प्रवेश 1 ला
डिस्क्लेमर सुरु:
(शीर्षकाबद्दल कोणाला काही आक्षेप असलाच तर अॅडव्हान्समध्ये माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)
(चू भू द्या घ्या. ह घ्या.)
डिस्क्लेमर समाप्त
प्रवेश 1 ला
एक डाव माह्या सपनात श्रीदेवी आली.
म्हने काळजी नोको करु तुले भेटनार हाये पैसेवाली.
आंग पाय धुऊन दुसर्याच दिवशी मोहीम चालु केली.
पन घराच्या बाहेर निंघाल्या बरोबर, घरचीच मांजर आडवी गेली.
बस स्टँड वर ऊभा होतो तं, आल्या जींसवाल्या.
म्या केसातुन हात फीरवला तं फिदीफिदी हासुन गेल्या.
मनात म्हनलं आपन साली कारवालीच पाहाव.
लगन करुन तिच्यासंग मंग भल्ली ऐश कराव.
अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय
"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.
"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.
आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?
प्रिय मिपाकरांनो,
ह्यावेळी दिवाळी कट्टा डोंबिवलीला करायचे नक्की झाले आहे.
वेळ रात्री ८ वा.
ठिकाण : नंदी पॅलेस
रविवार असल्याने हॉटेल मध्ये गर्दी असणारच आहे.त्यामुळे ८ नंतर जागा मिळवायला खूप त्रास होतो.मी आणि प्रथम फडणीस जागा अडवून ठेवूच.जे येणार असतील त्यांनी व्य.नी. करावा.ह्यावेळी बिल ज्याचे,त्याने द्यायचे, असे ठरले आहे. साधारण दर माणशी ५००रु. खर्च येईल.
दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)
सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.
गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.
पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.
सालाबादप्रमाणे पाच वर्षांनी निवडणुका येणार. काही जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले. काही काळजीत पडले, काही बोहल्यावर चढले, काही लाल किल्ल्यावर चढून बसले, काही टवाळ मोडात गेले, काही मवाळ मोडात गेले तर काही मौनात गेले. पण कर्णपिशाच्चाने सांगितलं कि सगळेच आपटणार म्हणून. च्यायला, सगळ्यांना कधी ना कधी चान्स मिळाला, आता कुणाला चुना लावताय या मोडात मतदार आहे. त्याला जास्त चुना लावायला गेलं तर जाळ होणार यात शंका नाही.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.
आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?
तसं म्हनाल तर आपला बारदाना लई मोट्टा है. चाळीसपंनास एकर उस है. निम्मा उस जातोय साकरकारखान्यात. निम्या उसाचं गुर्हाळं लागत्यात. द्राक्षे है. मागल्या सालाच्या मागल्या साली वायनरी फैक्ट्रीचे सत्तर टक्के शेर घेतले. द्राक्षे वायनरीत नाय तर फारेनला जात्यात. सोसायटी, ग्रामपंचायत झालंच तर पंचायत समिती आपल्याच ताब्यात है. पुढल्या सालाला झेडपीत उडी मारायची है. दोन गण आपलेच है त्यामुळे फिकीर नै. उगाच नै कै पंचक्रोशीत बाळासायेब म्हनून आपल्याला वळखतेत. काय?
मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही.
सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ?
आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?