सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल?
शाळेचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे फळ्यावर लिहून दाखवायचे खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल?
आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी जिप्सम वगैरे आणा, मग भुकटी खाली पाडल्यावर साच्यात काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि हात कि सफाईची आणि कृष्णपृष्ठीयश्वेतशिंतोडीकरणाची हाईट" वाटते मला!