गाभा:
नमस्कार!!!
रॉयल एन्फिल्ड या विषयावर कोणाला माहिती असल्यास सांगणे. मी सुद्धा रॉयल एन्फिल्ड विकत घेण्याचं ठरवला आहे. तरी क्लासिक ३५०, standard ३५० किंवा thunderbird ३५० यामध्ये चांगला पर्याय सुचवावा.
दैनंदिन वापरासाठी आणि tours साठी कोणते मॉडेल्स योग्य आहेत? एकंदरीच रॉयल एन्फिल्डला लागणारा maintenance, handling या बद्दल काही अनुभव असल्यास सांगावेत हि विनंती.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
26 Oct 2013 - 11:14 pm | मुक्त विहारि
फक्त ते जरा पेट्रोलचे बघा....
26 Oct 2013 - 11:48 pm | धर्मराजमुटके
भारतीय माणूस जेव्हा गाडी घेतो तेव्हा तो मायलेज किती मिळतो याचा विचार करतो. तो जरी पैसा बचत आणि बजेटला महत्त्व देत असला तरी अप्रत्य़क्षपणे तेल बचत मोहिमेला मोठा पाठींबा देत असतो.
मला परवडते मग मी हार्ले डेवीडसन देखील घेईन पण वेगाने संपत जाणार्या तेलसाठ्यांचे काय ? म्हणून जास्तीत जास्त मायलेज देणार्या गाड्या वापराव्यात असे माझे मत. अर्थात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. (नाहितरी सल्ले हे फाट्यावर मारण्यासाठीच असतात.) मी तर असे म्ह्णेल की अशा प्रकारच्या गाड्यांच्या उत्पादकांना मायलेज वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे / नियम बनवावेत.
27 Oct 2013 - 12:10 am | जिन्क्स
मी गेली ४ वर्षे रॉयल एन्फिल्ड वापरत आहे. दैनंदिन वापर तर आहेच, पण त्याच बरोबर वेळ मिळेल तशा कारगील - लडाख, ट्रान्स सह्याद्री अशा लांबच्या फेर्या देखील झाल्या आहेत. रॉयल एन्फिल्ड चालवण्यात जे सूख आहे ते शब्दात सांगता यायच नाही. ४ वर्षे - ६०००० की मी चालवुन ही अजिबात कंटाळा आलेला नाही.
प्रोस् :
१) नवीन twin-spark एंजीन. ६०००० की मी नंतरही ४५ की मी प्रती लिटर.
२) शहरात ही आरामात चालवता येयिल असे डिसाइन. रहदारीत ही अतिशय सहजतेने चालते (वजन जास्त अस्ल्यामुळे रहदारीत सतत पाय टेकवायची गरज भासत नाही)
३) तरुण पिढीला अकर्शित करेल असे डिसाइन्स (नाहितर पुर्वी रॉयल एन्फिल्ड एकतर पोलिसांकडे तरी असायच्या नाहितर चोरांकडे ).
कॉन्स :
१) थोडाफार खर्चिक मामला आहे.
२) प्रत्येक ३००० की मी नंतर servicing करावीच लागते (प्रत्येकवेळी oil बदलावे लागते. ३५० सी सी च्या गाडी मधे साधारण पणे ३ लिटर oil बसते. ६५० रु प्रती लिटर आहे oil)
३) इतर वहानांना येणार नाही अशा अडचणी रॉयल एन्फिल्ड सोबत येतात. क्लच केबल तुटणे, oil गळणे, अवघड जागीच bolt सतत ढिल्ला होणे इ. इ.
27 Oct 2013 - 12:24 am | माकड
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
29 Oct 2013 - 5:32 pm | टवाळ कार्टा
४५??? नक्की???
27 Oct 2013 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा
calling मनराव महाराज लेह-लडाखकर! :)
27 Oct 2013 - 12:54 am | शैलेन्द्र
रॉयल एन्फिल्ड घ्यायची ठरवलीय तर आता तीच घ्या, इतर काहीही घेतलत तर रस्त्याने एखादी एन्फील्ड गेली की काळजात कळ उठेल..
27 Oct 2013 - 1:05 am | प्रसाद गोडबोले
माझा सल्ला : अजुन थोडी कळ काढा , रॉयल एन्फिल्ड ने नवीन मॉडेल लॉन्च केलय ते कस वाटतय त्यावरुन ठरवा
https://www.youtube.com/watch?v=Fu2YHvi81Wk
28 Oct 2013 - 2:35 pm | llपुण्याचे पेशवेll
हापिसात यूट्यूब ब्लॉक्ड आहे. कोणते आहे नवीन मॉडेल ते जरा सांगा बरे. मी पण बघतो.
28 Oct 2013 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले
http://royalenfield.com/continentalgt/
हे युरोपात लॉन्च झालय , भारतात यायला अजुन किमान ५-६ महिने लागतील ...
परसनली मला हे फार म्हणजे खुप म्हणजे लैच आवडलय मॉडेल !! पण हे नक्कीच दीड लाखाच्या वर असणार ... परत एकदा बजेट मुळे लोच्या :(
अवांतर : "जोवर मिडल स्टॅन्डवर लावता येत नाही तोवर एन्फिल्ड घ्यायची नाही " अशी घरातुन सक्त ताकीद असल्याने नजिकच्या काळात रॉयल एन्फिड चालवायचा योग नाही आमच्या नशिबात :(
28 Oct 2013 - 3:54 pm | कपिलमुनी
अशी अपेक्षीत किंमत आहे असा कळला आहे..
30 Oct 2013 - 3:32 pm | शिद
काही मजा नाही राव…जुन्या येजदी ला रंग दिल्यासारखी वाटतेय.
31 Oct 2013 - 10:15 am | llपुण्याचे पेशवेll
मिड स्टॅडवर लावणं खूप सोपे आहे. स्टँडच्या बाजूला लावलेल्या दांडीवर जवळ जवळ उभेच रहायचे. मग लागते बरोबर.
कॉन्टीनेंटल जीटी(कॅफे जीटी) आहे का ते मॉडेल?
31 Oct 2013 - 8:41 pm | विजुभाऊ
स्टँडच्या बाजूला लावलेल्या दांडीवर जवळ जवळ उभेच रहायचे. मग लागते बरोबर.
पेशवे त्यासाठी वजनदार व्यक्तीमत्व लागतं
2 Nov 2013 - 5:56 pm | आनंद पाटील
ख्या ख्या ख्या
12 Nov 2013 - 12:20 pm | देवांग
इतर काहीही घेतलत तर रस्त्याने एखादी एन्फील्ड गेली की काळजात कळ उठेल.. Fully agree :)
27 Oct 2013 - 1:56 pm | लोटीया_पठाण
रॉयल एन्फिल्डला पर्याय म्हणून अवेंजर सारख्या बाईक चा पण विचार करून पहा.
बुलेट बुक केल्यानंतर पहावी लागणारी वाट अन तिच्यावर करावा लागणारा खर्च हे सर्व ध्यानात घेतल्यास अवेंजर हा त्या मानाने किफायतशीर पर्याय आहे.
27 Oct 2013 - 1:56 pm | लोटीया_पठाण
रॉयल एन्फिल्डला पर्याय म्हणून अवेंजर सारख्या बाईक चा पण विचार करून पहा.
बुलेट बुक केल्यानंतर पहावी लागणारी वाट अन तिच्यावर करावा लागणारा खर्च हे सर्व ध्यानात घेतल्यास अवेंजर हा त्या मानाने किफायतशीर पर्याय आहे.
27 Oct 2013 - 2:27 pm | सुधीर मुतालीक
अहो, असे शौक करताना चर्चा करायची नसते. डायरेक्ट हात घालायचा ! घेऊन टाका !! बुलेट सारखी किक नाई मिळत कशात ! माझी ५०० सीसी आहे. धम्माल येते राव.
27 Oct 2013 - 5:36 pm | शैलेन्द्र
बरोबर.. बुलेट ही श्रद्धा, धर्म व नशा आहे.. विश्लेषणाची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे..
27 Oct 2013 - 11:02 pm | आसिफ
मी गेली चार वर्षे रॉयल एन्फिल्ड बुलेट वापरत आहे. ( १९९० मेड ). या चार वर्षात आलेले अनुभव खूप काही सांगून जातात.
काही कटू( क्लच/ब्रेक केबल तुटणे , ऑईल लिक, गाडी तील पेट्रोल संपल्यावर उडणारी त्रेधा तिरपीट , महागडे स्पेअर पार्टस ,बुलेट चे काम करणारे कमी लोक त्यांचे भरमसाठ दर, आणि बरेच काही )
हे सर्व कटू अनुभव जुन्या मॉडेल्स च्या बाबतीत होते, नवीन मॉडेल्स साठी अधिक आकर्षक , वजनाने हलकी, वापरायला सोपी (डाव्या बाजूला गियर ), चांगली फ्युएल एफ़िशिएन्सी , कलर ऑप्शनस या सर्व जमेच्या बाजू आहेत.
आणि चांगले अनुभव म्हणाल तर . . मेलोडी खाओ खुद जान जाओ .
हे वाचा
आसिफ ,
There is only one thing bigger than Bullet.. The pride of owning one !!
27 Oct 2013 - 11:49 pm | भटक्य आणि उनाड
ही वापरा आणी मजा करा...
28 Oct 2013 - 11:00 am | मदनबाण
काय दिवस आले आहेत.... माकड सुद्धा रॉयल एन्फिल्ड ची चौकशी करायला लागले आहे ! ;)
असो... पेट्रोलचे दर लक्षात ठेवुन आणि मायलेज काय मिळते याचा विचार करुन हवी ती निवड करावी.
जाता जाता :- हिंदुस्थानात अजुन श्वास घेण्यासाठी लागणार्या हवेवर टॅक्स कसा बसवला गेला नाही ? असा प्रश्न हल्ली मला भेडसावु लागला आहे.
28 Oct 2013 - 1:24 pm | कपिलमुनी
क्लासिक ३५०, standard ३५० किंवा thunderbird ३५० आणि ईलेक्ट्रा ..
सर्वांच इंजिन सेम आहे ..फरक आहे तो वजन , आणि स्टायलिंग मधे ..
standard ३५० ला डिस्क नाही , बटण स्टार्ट नाही..
क्लासिक ची उंची बरीच कमी आहे .. स्प्लिट सीट आहे .
ईलेक्ट्राची उंची चांगली आहे ..तुम्ही ६ फूट असाल तर ही जास्त कंफर्टेबल वाटते..
थंडरबर्ड ही क्रूजर प्रकारामधली बाईक आहे ..सध्याचे नवीन मॉडेल मधे बरेच चांगले चेंज केले आहेत ..
maintenance, handling :
जिन्क्स यांनी बरेच पॉईंट कव्हर केले आहेत ..
सध्याच्या गाड्या बॅटरी ओरीएंटेड फार आहेत ..त्यामुळे वायरींग , बॅटरी चा खर्च जास्त आहे ..
चेन सॉकेट ..चेन ल्युब न वापरल्यास ते खराब होते ..
स्पेयर पार्ट महाग आहेत ..
बाकी
सायलेन्सर बदलता येतो ( ९०% बदलतातच) हॉर्न बदलतात.
त्याचाही खर्च आहे..
बाकी ..
चलाओ तो जानो !!
28 Oct 2013 - 2:17 pm | सार्थबोध
आमच्या मित्राची आहे हि गाडी
काही मुद्दे:- किक मारताना काळजी घ्यावी उलट दाब येउन गुढगा दुखावू शकतो. चालवताना मस्त वाटते पण गाडी बंद पडली कि ढकलणे अशक्य आणि किमती गाडी रस्त्यात सोडून कुणी दुरुस्तीसाठी शोधणे धोक्याचे . गाडीच्या चाकाबरोबर ढकलणारा पण पंचर होतो. पहिले फुकट सर्विसिंग सोडले तर नंतरचे सर्विसिंगचा खर्च जास्त वाटतो. बाकी इंधन तर पिते गाडी…
28 Oct 2013 - 2:39 pm | llपुण्याचे पेशवेll
थोड्या अजून प्रतिक्रियांनंतर मझे मत व्यक्त करीन.
29 Oct 2013 - 11:21 am | माकड
धन्यवाद!!!
@मदनबाण - हल्ली पेट्रोल चे दर लक्ष्यात घेत असल्या चौकश्या फक्त माकडच करू शकतात!
29 Oct 2013 - 11:24 am | मुक्त विहारि
गाडी घ्या, मग आम्हाला त्याचे पेढे द्या आणि मग धन्यवाद म्हणा..
29 Oct 2013 - 11:45 am | मदनबाण
हल्ली पेट्रोल चे दर लक्ष्यात घेत असल्या चौकश्या फक्त माकडच करू शकतात!
हा.हा.हा... ;)
29 Oct 2013 - 11:59 am | रोहन अजय संसारे
राव रोयाल घ्याची ठरवले आहेत तर आता मागे बघू नक. या सारखी गाडी नाही जगात. सुख मणजे की हे हि गाडी सांगून जाते.
आणि खर्चाचे मानल तर थोडा जास्त आहे पण रोयाल घेणारा याचा विचार करत नाही एवडे खरे
29 Oct 2013 - 12:22 pm | मनराव
रॉयल गाडी घेण्यासाठी अशी चौकशी नसती करायची..........जी आवडते ति डायरेक्ट घेऊन टाकायची असते........
खर्चाची तयारी ठेवा म्हणजे झालं.............
हत्ती पाळला कि त्याच्या खाण्या पिण्या कडे बघावच लागतं
29 Oct 2013 - 1:17 pm | अभिजा
चौदा वर्ष बुलेट चालवली आहे.
कंपनीने नवीन बुलेट अगदी पांचट करून टाकली आहे. झणझणीत मिसळीत दही घातल्यासारखी!
फायरिंगची वाट लावली आहे. बुलेट म्हटले म्हणजे ४०च्या स्पीडला फायरिंग गब्बरसिंगचे हसणे हवे. न पेक्षा हीरो होंडा काय वाईट!?
घेणार असाल तर स्टॅंडर्ड ३५० घ्या. ही सर्वकालीन उत्तम बुलेट आहे.
थोडी अभिरुचीसंपन्न चकाचक ठेवली आणि व्यवस्थित कॅरी केली (म्हणजे चालवण्याची स्टाईल, बुलेट चालवताना परिधान करायची वेश/केशभूषा इ.) तर हार्लीडेव्हिडसन हिच्यासमोर मोलकरीण वाटावी इतके दार्शनिक मूल्य बुलेटमध्ये आहे.
बुलेट ही केवळ सोय नसून एक ध्यास आहे.
रोल्सरॉईसच घ्यायची तर मग पेट्रोल/मेंटेनन्सचा खर्च वगैरे क्षुद्र गोष्टींचा विचार करू नये.
हॅप्पी बुलेटिंग! :-)
29 Oct 2013 - 1:36 pm | जिन्क्स
जुन्या बुलेट मधे ४०च्या स्पीडला गब्बरसिंगच्या हसण्याचा आवाज नक्किच यायचा. पण तोच स्पीड तुम्ही ६०-८० ल नेला की भुकंप होतोय की काय (vibrations) असा भास व्ह्याचा.तुम्ही रॉयल एन्फिल्ड कशासठी घेत अहात हे आधी ठरवा. बुलेट चा आवाज हा रॉयल एन्फिल्ड चा एकमेव strong point नाही. ३५०सीसी मधे २०बीएचपी एवढी ताकद देनारी दुचाकी भारतिय बाजारात रॉयल एन्फिल्ड ही एकमेव आहे. शहरात वापरनार असाल classic 350 ही चांगली आहे. खूप दूरच्या सफरींवर जानार असाल तर thunderbird सर्वोत्तम आहे. thunderbird चे एर्गोनोमिक्स हे माझ्या द्रुश्टिनी तिचा सर्वात चांगला गुण आहे. एका दिवसात १२-१४ तास चालवुनही तुम्हाला पाठ दुखी, मान दुखी असले त्रास होनार नाहित.
29 Oct 2013 - 1:36 pm | कपिलमुनी
डिस्क ब्रेक आणि बटण स्टार्ट नाही..
सध्याचे स्पीड पहता डिस्क ब्रेक आणि बॅक किक चा इस्शु असेल तर बटण स्टार्ट बरी पडते ..
29 Oct 2013 - 1:43 pm | गवि
"हाय कंबख्त तूने पीही नही" हे लॉजिक बिनतोड आहे.. सांगली कोल्हापूर भागात शुभ्र पायजमा सदरा किंवा धोतर जाकिटातले ऊस शेतकरी, तसेच पीएसआय लोक एकदम ऐटीत बुलेट घेऊन भकभकत जाताना पाहिले आहेत.
रुबाबदार आहे ही बाईक.. शंकाच नाही..
पण.. पण .. मी काय म्हणतो.. म्हणजे शांतपणे विचार करा बरं का.. की साडेतीनशे किंवा पाचशे सीसी इतक्या आकाराचा सिलिंडर एका बाईकला कशापायी? शिवाय प्रचंड बोजड आणि कान फाडणारा आवाज करणारं धूड घेऊन गावात एकवेळ ठीक पण शहरभागात फिरणं म्हणजे नसता बोजा असं नाही वाटत का..?
त्यापेक्षा हलकी, पंक्चर झाली तरी स्वतःच्या वजनाखाली टायरच्या चिरफळ्या न उडवणारी, बंद पडली तर मालकाची पुरती ऐट उतरवून त्याला कुत्र्याप्रमाणे हातभर जीभ काढून धापा टाकायला न लावणारी, कमी स्पीडवर चालवायला लागली की बद्धकोष्ठतेचा फील न देणारी अशी दीडेकशे सीसीची फ्युएल एफिशियंट बाईक का कमी वाटावी?
बाकी काय ते शान वगैरे सर्व व्यक्तीवर असतं.. शानदार व्यक्ती रस्त्याने चालत गेली तरी शानदारच वाटते.. त्यासाठी पांढरा, सॉरी, काळा हत्ती कशाला बाळगायला हवा.. ??
शिवाय बुलेटवर दळणाची पिशवी ठेवायला फार्फार अडचण होते, पण ते एक असो.. ;)
-(संसारी) गवि
29 Oct 2013 - 2:29 pm | सुहासदवन
+१
29 Oct 2013 - 2:45 pm | कपिलमुनी
आवड आपली आपली दुसरा काय !!
ऑफ रोडींग करायला ..लाँग टूर वर जायला एवढी आरामदायी गाडी दुसरी नाही..
बाकी शहराबद्दल तुमच्याशी सहमत ..
जारे कोपर्यावरून दुध घेउन ये म्हणला की, स्कूटर, मोपेड बरी वाटते ..
29 Oct 2013 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले
कसं आहे बुलेट च्या बाबतीत प्रॅक्टीकॅलिटीपेक्क्षाही क्रेझीनेस हाच ड्रायव्हंग फोर्स ठरतो .
बुलेट ही 'राखायची' गाडी आहे , स्पेयर म्हणुन एक मोपेड 'ठेवावीच' अगदी अंगवस्त्र महावस्त्र इतका फरक आहे दोहोत ...अर्थात दोन्हीही हवेच ;)
2 Nov 2013 - 2:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही पुण्याचे वाटते !!! मुंबैला लोक कोपर्यापर्यंत चालत जातात ;-)
12 Nov 2013 - 12:28 pm | देवांग
एकच नंबर … :)
30 Oct 2013 - 2:59 pm | चिप्लुन्कर
पावरबाज प्रतिसाद गवी साहेब
29 Oct 2013 - 2:40 pm | बाबा पाटील
आमच्या पुणे जिल्ह्याच्या पुर्व भागात उस बागाईतदारांच एक गाव आहे,निवडनुकीच्यापुवी गावातले सगळे परवानाधारक बंदुकावाले २०-२५ बुलेट घेउन तालुक्याच्या पोलिस स्टेशनला धोतर फेटा घालुन बंदुका जमा करायला येतात .साला खरच बघण्यासारखा नजारा असतो,तालुक्याची आख्खी पेठ येड्यासारखी ही मिरवनुक बघत असते.
29 Oct 2013 - 8:30 pm | सुबोध खरे
ग वि शि सहमत
एक तर आमच्या सारखा किरकोळ माणूस बुलेटवर बसला तर मी बुलेट चालवतोय का बुलेट मला चालवते हा प्रश्न पडतो. वर ते एवढे धूड घेऊन लांबच्या प्रवासाला गेलात तर एकतर पाठ हादरते आणि हाताला झिणझिण्या येतात. (तरी बरं आता ब्रेक उजवीकडे आला आहे). दोन चार वेळा मित्रांची चालवून पाहिली. शिवाय दर रविवारी काहीतरी खाट खूट करत बसायची कटकट कोण करणार?
तुम्ही एक तर त्या पंथाचे/ संप्रदायाचे(CULT) चाकर असता किंवा नसता. म्हणजे बुलेट आवडते तरी किंवा नावडते तरी.
मी दुसर्या प्रकारात मोडतो. माचो दिसण्यासाठी बुलेटच्या आधाराची गरज कधीच पडली नाही.
माझ्याकडे होंडा युनिकोर्न साडे सहा वर्षापासून आहे.(त्याअगोदर हिरो होंडा होती १ ७ वर्षे आणि १.५ लाख कि मी चालवून फुकून टाकली) अजून तरी त्यावर कोणताही खर्च नाही. बैटरि सुद्धा साडे सहा वर्षात बदललेली नाही.मी कोणतीही सर्व्हीसिंग करून घेत नाही. इंजिनाचे तेल काळे झाले तर बदलतो. हवा, पेट्रोल वेळच्या वेळी भरतो आणि सुखेनैव चालवतो. वाटेल तितके अंतर चालवतो. इंजिनचा थरथराट नाही कि होर्न सोडून वाजणाऱ्या इतर सुट्या भागांचा आवाज नाही. कुठे तेल गळत नाही कि किक मारावी लागत नाही. मी इतक्या वर्षात फक्त दोन वेळा किक मारली आहे ती सुद्धा किक चालते कि नाही ते पाहण्यासाठी. ब्रेक मारला कि गाडी जागच्या जागी उभी राहते.
शक्ती(पॉवर) हवी असेल तर के ती एम ड्युक ३९० घ्या ४ ३ हॉर्स पॉवर विथ ए बी एस(anti Lock braking system) वीस नि बावीस हॉर्स पॉवरची गणिते करू नका. http://www.ktm.com/naked-bike/390-duke-eu/highlights.html#.Um_NWHDz_IY
तात्पर्य काय?
बुलेट विकत घ्यायची असेल तर घ्या. (निष्फळ) चर्चा करू नका. एक तर तुम्हाला ती आवडेल किंवा नाही आवडणार.
30 Oct 2013 - 3:11 pm | बॅटमॅन
बुलेटचं माहिती नाही पण युनिकॉर्नबद्दल सहमत.
(युनिकॉर्नप्रेमी युनिधारक) बॅटमॅन.
30 Oct 2013 - 3:15 pm | जिन्क्स
बहुदा गवी आणि खरे साहेब हे दोघेही "मीड लाइफ क्राइसिस" चे शिकार झाले आहेत.
पाठ हादरते आणि हाताला झिणझिण्या येतात
मी बुलेट चालवतोय का बुलेट मला चालवते हा प्रश्न
शहरभागात फिरणं म्हणजे नसता बोजा
दळणाची पिशवी ठेवायला फार्फार अडचण होते
ही सगळी त्याचीच तर लक्शणे आहेत ...
हळुच आणि हलकेच घ्या ;)
30 Oct 2013 - 6:51 pm | सुबोध खरे
म्हटलेच आहे एक तर बुलेट तुम्हाला आवडते किंवा नाही आवडत. ज्यांना आवडते ते तिची तरफदारी करणारच.
म्हैस दुध किती देते विचारले तर तर दुधाचे काय पाहताय? तिचे चारित्र्य पहा.
असे आहे.
ह. घ्या.
31 Oct 2013 - 12:51 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत. २०-१५ वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्या बाबांचा एक बुद्धीजिवी मित्र उंची ६ फूट व वजन ६०-६५ किलो मात्र असा, बुलेटवरून पुण्यातून युनिव्हर्सिटी रस्त्याने जात होता. तेव्हा पुण्यात बुलेट कमी असल्याने शक्यतो बुलेट मालक लोकांना माहीत असे. तिथल्या एका पेट्रोलपंपवाल्याने सदर बुलेटच्या मालकाला (म्हणजे मित्राच्या भावाला ) फोन करून सांगितले "अहो आत्ता तुमची बुलेट पंपावरून गेली आणि कोणीतरी बुलेटवरून फडकत चालला होता. "
30 Oct 2013 - 3:23 pm | विजुभाऊ
माझी स्प्लेंडर गेली दहा वर्षे उत्तम सर्व्हीस देतेय.
दोन तीन महिने वापरात नसेल तरीही पहिल्या कीकला स्टार्ट होते. मेन्टेन्स वगैरे फारसा नाही. बॅटरी एकदा बदलली.
ती सुद्धा फार दिवस वापरात नसल्यामुळे. स्प्लेम्डर घेतल्यापासुन पाठीला त्रास होणे बम्द झाले.
बुलेटची तुलना स्प्लेंडरशी करत नाही.पण मला सांगा दुचाकी घेवून तुम्ही १०० पेक्षा जास्त वेगाने किती वेळा चालवता?
मला बुलेट आवडते. तो एक षौक आहे. पण प्रॅक्टकली बघायला गेलो तर त्यात धोके अधीक दिसतात. एखादा किरकोळ अॅक्सीडेन्ट झाला तर बुलेट चालवणाराचा पाय नक्की प्लास्टर मधे जातो
30 Oct 2013 - 3:33 pm | बॅटमॅन
विजुभौ ते पुलावर गाडीशी अपघात झाल्यावरचे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज थांबलेत की आहेत अजूनही ;) =))
30 Oct 2013 - 3:59 pm | विजुभाऊ
ते आवाज बुलेट चे नव्हते रे . लुना चे होते.
30 Oct 2013 - 4:27 pm | बॅटमॅन
अर्र हो की, आयमाय स्वारी.
(बुलेटच्या चर्चा वाचून स्प्लेण्डर आणि लुना यात गफललेला) बॅटमॅन.
30 Oct 2013 - 4:29 pm | शिद
ब्रम्हेची होती का लुना?
30 Oct 2013 - 4:37 pm | बॅटमॅन
अंमळ गल्लत करताहात शिद साहेब. दोन्हीही लुना महानच आहेत, पण एक म्हणजे मोटरकारलाही धडक देऊन पुलाखाली पाडू शकणारी तर एक ४००० रुपये (१९८३ सालचे) देऊन वर पोरीला लिफ्ट देऊन आपले दिल दरिया तर.......समंदर असल्याचे दाखविणारी.
मूळ लुना
विजुभौंची त्यावरून स्फुरलेली सायकल
हे वाचा अन पहा काय ते =))
30 Oct 2013 - 4:12 pm | आदिजोशी
अत्यंत बोजड, जुनाट टेक्नॉलॉजी, काहीच्या काही महाग, तुलनेने अत्यंत भिकार इंजिनिअरींग, प्रत्येक विकांताला गॅरेजची वारी. शाईन मारायला उत्तम गाडी. सांभाळायला पांढरा हत्ती. हत्ती इतकाच आहार. चाल पण हत्तीसारखी संथ आणि डुलत डुलत. 350 CC च्या इंजिनची पावर 20 BHP असली तरी गाडीचे वजन १९० किलो असल्याने पिक-अपची बोंब, लुना पण ओव्हरटेक करते सिग्नलला.
बुलेट घेऊन पस्तावलेल्या काही मित्रांशी ओळख करून देतो, त्यांच्याशी बोला. तरीही खाज असेल तर घ्या.
आणि दिड लाख घालायचेच असतील तर RD 350 घ्या. गुगल करा, बुलेटचा पोकळ माज उतरेल.
30 Oct 2013 - 4:39 pm | कपिलमुनी
ही बुलेटची बहीण आहे ... स्पेयर पार्ट च्या नावाने बोंब असते ..
30 Oct 2013 - 5:02 pm | टवाळ कार्टा
बाप गाडी आहे RD350
30 Oct 2013 - 5:43 pm | आदिजोशी
RD 350 च्या आजूबाजूला उभी राहू शकेल अशी एकही बाईक आजही भारतात नाही. बाकी सगळ्या पानी कम चाय आहेत. स्पेअर पार्टचा लोचा आहेच. पण त्या वरही उपाय आहेतच. आणि RD 350 चालवण्यात मिळणारं सॅटिसफॅक्शन खरं खुरं आहे. बुलेट सारखं इमॅजिनरी नाही.
30 Oct 2013 - 7:14 pm | मालोजीराव
स्प्लेंडर,सीबीझी,सीबीआर २५० ,रॉयल एन्फिल्ड, आरडी, वर्देंची(क्रुझर) …चालवल्यात
स्प्लेंडर - टिकाऊ, भरपूर मायलेज, वाट्टेल तितक्या वापरासाठी बनवली जणू अशी , कळकट मळकट कामाला बळकट प्रकारातील
सीबीझी - एकेकाळची सोल्लिड क्रेझ असलेली बाईक तरी रोजच्या वापरला उत्तम , स्टायलिशपण (हीच वापरतोय)
सीबीआर २५० - जबरी पिकप तेव्हडीच सुरक्षितसुद्धा (इतर सर्वांच्या तुलनेत ABS असल्याने), क्लासी , मायलेज एकदम कमी
रॉयल एन्फिल्ड - रुबाबदार , कमी स्पीडने चालवण्यातच जास्त मजा , जुनं मॉडेल होतं त्यामुळे त्रास जास्त झाला (पार्टस,ठराविक प्रॉब्लेम वारंवार येतात)
मित्र मजेनी म्हणायचे "तुझी गाडी पंक्चर झाली तर तू कोण मी ओळखत नाही" :)
पण तेच मित्र पोरी फिरवण्यासाठी हीच गाडी मागून न्यायचे
आरडी- २-३ वेळाच चालवली असेल पण हिचा स्पीड कुठे जाऊन थांबतो काहीच अंदाज येत नाही…अफाट पॉवर , +१ टू आदी
वर्देंची - मॉडीफ़ैड आहे त्यामुळे प्रचंड महागडी , लोकांच्या नजर खेचून घेणारी अर्थात शायनिंग साठीच असलेली
प्रत्येक गाडीची आपलीआपली वैशिष्ठे आहेत त्यामुळे तुलना गैरलागू होते
(आरडी आणि रॉयल एन्फिल्ड ची तुलना होते बर्याचदा त्यात बरेच रॉयल वाले आरडीला प्लस देतात :) )
30 Oct 2013 - 8:17 pm | आदिजोशी
बरेच रॉयल वाले आरडीला प्लस देतात
खरंय. कारण आपल्या बाळ्या असला तरी दुसर्याच्या कार्ट्याला जास्त मार्क आहेत हे सत्य कबूल करावंच लागतं.
31 Oct 2013 - 1:15 pm | llपुण्याचे पेशवेll
आरडी सध्या आहे का प्रॉडक्शन मधे? कितीला बसते? भारतात मिळते का? नवीन आरडी आणि जुनी आरडी यात काही फरक आहे का?
31 Oct 2013 - 3:25 pm | कपिलमुनी
http://www.bikes4sale.in/buy.php?st=Maharashtra&cp=Yamaha&ml=RD%20350
जुन्या दुचाकींच्या किंमतीचा अंदाज येण्यासाठी वरील दुव्यावर क्क्लिक करा
31 Oct 2013 - 4:28 pm | चिगो
च्यामारी.. अँटीक पीस म्हणून जास्त किंमत आहे का काय? १९८०च्या दशकातल्या बाईकची किंमत लाखोंमध्ये?
असो. "शौक बडी चीज है" म्हणतात ब्वॉ..
31 Oct 2013 - 5:04 pm | llपुण्याचे पेशवेll
आत्ताच विकीवर वाचले की हीच आरडी भारतात राजदूत म्हणून विकली जात असे. अर्थात आरडी म्हणून पण वेगळी मॉडेले दिसत आहेत. पण चामारी या जुन्या अॅव्हरेज न देणार्या आरडी २.५ लाखाच्या घरात जात असतील तर एन्फील्ड १.३५ लाख म्हण्जे स्वस्तच म्हणायची.
31 Oct 2013 - 5:59 pm | आदिजोशी
आर.डी. म्हणजे राजदून नव्हे. राजदूत ही बाईक स्वतःच्या नावाने विकत असे यामाहा कडून लायसंस घेऊन. ही आरडी जेव्हा लाँच झाली तेव्हा ७०० सिसिच्या बाईक्सना रेस मधे धूळ चारल्याने जाएंट किलर म्हणून ओळखली जात होती.
स्पेसिफिकेशन्स बघा म्हणजे किंमत इतकी का ते कळेल. आणि अॅव्हरेज वरून किंमत काढायची असेल सिडी १०० जगातली सगळ्यात महाग बाईक असायला हवी होती.
31 Oct 2013 - 5:27 pm | टवाळ कार्टा
येक डाव चालवुन बघाच...च्यामारी दुसर्या सगळ्या गाड्या झक मारतात
31 Oct 2013 - 9:37 am | नानबा
स्मार्ट असाल तर चुकूनही घेऊ नकात. पदरी मनस्ताप, खिशाला सतत पडणारं भोक आणि त्रास यापलीकडे हे डबडं दुसरं काहीही देऊ शकत नाही. किंबहुना त्याची लायकीच तेवढी आहे.
बुलेट चालवणार्यांचा तिला defend करण्याचा मुद्दा काय तर म्हणे अशी masculine आणि तगडी गाडी दुसरी नाही. आणि काय तर म्हणे संपूर्ण लोखंडी आणि वजनी आहे. त्यात काय सुख मिळतं त्यांनाच ठाऊक. तेजायला पण बाजूने गेली तर कानठळ्या बसवणार्या आवाजाने शिव्या नक्कीच मिळतात.
दुसरा बुलेटचा भयंकर ताप म्हणजे कंपनं. १५०-२०० किमी सलग चालवून थांबलात की तळहात बधीर झालेले असतात.
तेव्हा, त्या मार्गी न जाणे उत्तम. तरीही घेण्याची इच्छा असली, तर "होऊदेत खर्च"... :D
31 Oct 2013 - 9:43 am | सुबोध खरे
प्रथम तुला या वयात मिड लाइफ क्रायसिस झाला कि काय? म्हणे "तळहात बधीर झालेले असतात".
31 Oct 2013 - 10:50 am | नानबा
हे डबडं चालवून थांबलं की पुढचा काही वेळ हात बधीरच झालेले असतात. नुसत्या झिणझिण्या येत राहतात. All thanks to the miserable riding experience of Royal Enfield...
31 Oct 2013 - 4:56 pm | मनराव
अहो साहेबा...... तुम्ही नक्कि कोणती गाडी चालवली.....
(दिवसभरात ७०० किमि RE चालवलेला) मनराव.....
31 Oct 2013 - 5:18 pm | मालोजीराव
सत्तरीची एनफिल्ड असावी, एनफिल्ड चा बुलेट हा १९४८ पासून सुरु झालेला जगातील सर्वात जास्त वेळ प्रोडक्शन मध्ये असलेला मोटारसायकल ब्रांड आहे _/\_
31 Oct 2013 - 7:28 pm | जिन्क्स
तळहात बधीर व्हायची इतर ही बरीच कारणं असू शकतात...
http://www.mayoclinic.com/health/numbness-in-hands/MY00509
31 Oct 2013 - 4:54 pm | चिगो
"होऊदेत खर्च"... अहाहा !! महाराष्ट्राबाहेर रहात असल्याने ह्या असल्या जबराट बॅनर्सला लै मिस करतो राव..
31 Oct 2013 - 3:56 pm | जय - गणेश
पित असाल तर एकदा २-३ पेग झ्याल्यावर विचार करा.
एकावे जनाचे करावे मनाचे.
31 Oct 2013 - 4:33 pm | अन्तु बर्वा
मी गेल्या ५ वर्षांपासून बुलेट वापरतोय.
पहिल्यांदाच एक गोष्ट स्पष्ट करतो की अस्सल बुलेट प्रेमीसाठी बुलेट म्हणजे जुनी standard ३ ५ ०. लोखंडी इंजिन असणारी. तीच बुलेट. बाकी सगळ्या नुसत्या बाइक. नवीन रॉयल एन्फिल्ड तर होपलेस आहेत.
आता खालचं आर्टिकल वाचा. एवढ्या चांगल्या शब्दात दुसरा कोणी सांगू नाही शकणार बुलेट काय आहे ते!
What’s bigger than the Bullet? - Swami Ashwinananda Friday, November 07, 2003
Seemingly innocent question, teenaged boy on a bicycle, small dusty village on NH 45. And considering I was on an RE 500, I smiled confidently and replied ‘nothing else in the country’! Little did I know I was being set up to be knocked down. The young chap had been strolling around my bike as I enjoyed the customary ‘chai’ at a local tea shop, his casual air of disinterest thinly concealing the gleam of admiration in his eyes. My answer was met with a disdainful smirk. ‘I saw a foreigner on a Yamaha last week. That was much bigger. He told me they’re going to make it in India. 1200 cc, and it was sooo (he stretched his arms out as far as they would go) big. When I'm old enough, that’s what I’m going to ride’. He gave my bike one last look out of the corner of his eye, then pedaled away nonchalantly on his creaky bicycle. Many kilometers down the road, and alone with my thoughts on the highway, I pondered his question. It was the classic mental pivot. Both ridiculously simplistic and unbelievably deep at the same time.
‘What’s bigger than the Bullet?’
In the old days, people bought a Bullet not because of displacement, size or weight, but for very different reasons. It was the ‘Raja Gadi’. The choice of real men. At least that was the picture Bullet advertising painted then, and a vivid and colourful picture it was, best viewed with the ‘Bullet meri jaan’ jingle playing in your head.
Then about 15 years ago, the Jap Bike wars started. First there were the hundreds, then later the one-tens, the one-fifties, the one-seventy-fives… each claiming to deliver more power and ‘better mileage’, if that’s even possible at the same time, than the other. Buzz boxes abounded, tiddlers screamed manically on every street, and on another road far from where these marketing, R&D and advertising wars were being fought, the Grand Daddy of them all chugged steadily towards the brink of oblivion.
Recently though, there seems to be have been a revival of sorts, at first glance, rather heartening to a die-hard British motorcycle enthusiast like me. It seems as though more people are waking up from their Jap drone-induced stupor, and noticing that there was always a bike that was ‘bigger’ than the plastic clad Jappos available in the country.
Suddenly, one sees many young, macho, iron pumping, testosterone charged, leather clad gentlemen on Bullets. Not just the new-fangled ones, but some even on bikes a tad older than they are. Heartened by this turn of events, I accosted one recently, and asked him why he had chosen to ride a Bullet. My eager curiosity was met by a flat and fake-accented answer. ‘Who wants to buy a 180 cc when there’s a 535 cc available maan. It’s the biggest bike in India!’
I smiled thinly, shook his hand, and walked away thinking to myself ‘maybe the Bullet did manage to stop before it got all the way to oblivion. But it’s probably just standing there teetering at the brink.’
There’s a reason for my pessimism. Viewed from the cubic capacity perspective, the BHP perspective, the wheelbase and weight perspective, the ‘sheer size’ perspective or the advertising budget perspective, there will soon be many, many contenders to the position of Biggest Motorcycle in India. Which means that our testosterone-charged gentleman would buy one of them the moment it shows up on the market (attractively priced I might add). Just as soon, I presume, as he’d use an opportunity to take his shirt off and flex his tattooed muscles.
People today seem to be buying the Bullet for reasons like machismo (pun unintended), attitude, power and freedom. All the wrong reasons if you ask me. Because they’re all easily re-created, duplicated, and maybe even outdone by competition. Just like the 100cc Japs stopped the Bullet in its tracks 15 years ago, we’ll soon have 250, 350 and maybe even 750 and 1200cc Japs shooting the Bullet down again with weapons like cubic capacity, cruiser styling, fatter tyres, more chrome, and more jeans-leather-and-scantily-clad-women advertising --- all of which are in vogue now.
So what is it that will keep the Bullet competitive through the waves of onslaught from bikes that cater to the changing fancies of fickle Indian motorcyclists? What does the Bullet have going for it that no other manufacturer can hope to match no matter how much money he spends on research, development, space-age materials and nubile models?
I think the answer can be summed up in one word. Character.
To me, the Bullet stands for simplicity. A design that worked well not because it changed to incorporate every new discovery at NASA, but because the folks that designed it 50 years ago got everything right the first time. And then didn’t try to fix things that weren’t broke. It’s a bike that has built a reputation for being reliable, simple to work with, comfortable to be with, and lasts a whole lifetime… which is definitely a whole lifetime longer than the Japs, who outdate their throwaway models before one has even paid the second EMI. The most interesting thing is that over the years, this unglamorous but truly solid reputation has rubbed off on people that ride the Bullet too. The result, when one looks closely, is a bond between an individual and his Bullet, where one is but the mirror of the other.
To some folks like me who’ve wanted a Bullet since we were kids, it was the persona of these people that inspired the choice of a motorcycle more than the intrinsic value of the motorcycle itself. They were simple people, responsible people, strong people (not just in body) and they were people you could trust and rely on. I for one just bought into the quiet pride, solidity and soft spoken yet powerful image of Bullet riders I saw as a child, only to realize much later that these were the qualities of the bike itself.
In this day where people are realizing it’s better to step back from technology and glamour sometimes and fly subsonic rather than supersonic, I hope that people soon learn to appreciate and aspire to own the Bullet for what it is. A piece of machinery that has lived, served, rewarded and stood by its owners long enough to develop a character of its own. A motorcycle that has reached that point in evolution where its value cannot be measured in cubic centimeters, kilometres per hour or pounds per square inch. And a brand that speaks volumes for its owner for a lifetime… always saying just the same old good things.
If I had encountered my cyclist friend on the way back, I would have stopped him on his creaky bicycle and given him the answer I should have given him in the first place.
There’s just one thing that’s bigger than the Bullet. It’s the pride of owning one.
================================================== ================================================== ===
Eliminator will get eliminated by a bigger, faster, Eliminator. A new Terminator will overcome the pulse of the Pulsar. The Shogun will be overshadowed by the Ronin, the RX 135 by the ZXR, and so on. But the Bullet will remain Bullet. For it is not a reality. It is a dream.
Dreams are of many types – pleasant, painful, enjoyable, scary, exciting, new, old and many more. Bullet is all this and much more! It is the closest any bike comes to being all things to all people. Being all things to all people is impossible. A theory. That is what Bullet is. A theory. And people love theories. All people love theories. Especially if they sound so good. And nobody can deny (even my 100 year old grandmother does not deny) that no other bike in the world sounds like Bullet.
31 Oct 2013 - 6:01 pm | आदिजोशी
The article above is a hollow emotional piece – The biggest and only weapon of Bullet owners. Unfortunately, they can’t discuss things like reliability, ease of maintenance, riding comfort, build quality, etc. that come naturally to other modern bikes.
They are left with the most un-arguable answer – CHARACTER. Ha ha.
The article is full of claims only a Bullet rider can make and only other Bullet riders will nod at in agreement. Insane amount of vibrations, perpetually leaking head, having to remove entire wheel assembly to fix a puncture, etc. are not the signs of ‘the folks that designed it 50 years ago got everything right the first time’. No sir. They didn’t. And even the Royal Enfield never made any efforts to improve them as the steady demand from the government kept registers ringing. (Just like the Ambassador)
And if they had got it right in the first place, so right that they did not need to change anything for 50 years, why the hell change anything now?
Why alter things that gave bullet it’s oh so great character?
And if you are so wary of using models in advertising, why the hell have Milind Soman pose on your bike in your ads?
I am sure the answer to all the above question is the same to every question thrown at a Bullet – CHARACTER.
But my dear friendly Bullet riders, Bullet is not more a Bullet. Read this : The ‘new’ bullet now has reduced thump, left side gear shift, twin sparks (Holy cow!), gas charged suspension, electronic fuel injection and the greatest killer of all ELECTRIC START! Now a bullet is as much a modern Jap bike as any other, minus the 50 year old look. The very things that gave bullet it’s so called CHARACTER are missing from the ‘new’ Bullet. What a pity, RE has itself killed the character of Bullet.
To sum it up:
Old Bullet was a pathetic bike with a character. New bullet is just a pathetic bike.
Regards,
Adi Joshi
31 Oct 2013 - 8:38 pm | सुबोध खरे
जोशी साहेब असे डायरेक्ट कुणाच्या चड्डीला हात काय घालताय?
1 Nov 2013 - 9:16 am | मदनबाण
इतकी सगळी मस्त चर्चा चालली आहे,पण अजुन Yezdi बद्धल कोणी कसे बोलले नाही ? ;)
1 Nov 2013 - 3:34 pm | llपुण्याचे पेशवेll
येझदी पण मस्तं गाडी होती. आरडी पण मस्तं गाडी होती. पण चायला आता बाजारात मिळत नाहीत ना!आणि मिळाल्या जरी तरी अवाच्या सव्वा किमतीत जुने मॉडेल घेणे तितकेसे पटत नाही. एन्फिल्डने जुने डिझाईन कायम ठेऊन नवे युसीई इंजिन दिले आहे त्याची एफिशियन्सी बरी आहे. बुलेटचा आवाज सायलेन्सर बदलला की पूर्वीसारखा येतो.
आरडी किंवा येझ्दी ही मॉडेले जरा रीव्हॅम्प करून परत का आणत नाहीत बाजारात. मस्तं चालतील. बुलेटचा सगळा माज धुवून काढतील. मध्यंतरी रॉयल एन्फिल्डची केस स्टडी वाचली होती. ही डबघाईला आलेली कंपनी आयशर ग्रुप ने विकत घेतली आणि पहीले बुलेटचे इंजिन बदलले. स्टँडर्डाईझ केले ब्रेक डावीकडे गियर उजवीकडे असे जे उलटे होते ते सुलटे केले. इंजिनमधे बदल करून जरा अद्ययावत बनवले. बाईकचे ओव्हरऑल (अँटिक) डीझाईन तसेच ठेऊन हा बदल केला आणि डबघाईला आलेली कंपनी फायद्यात आली. हल्ली क्लासिक ३५० ला १ वर्ष वेटींग आहे म्हणून म्हणे चेन्नईला नवा रोबोटीक प्लँट लावणार आहे एन्फिल्ड असे ऐकून आहे.
साला या चांगल्या गाड्या जसे आरडी, येझदी परत मिळत का नाहीत हे कळत नाही.
1 Nov 2013 - 6:45 pm | आदिजोशी
पोल्युशनच्या दिवसेंदिवस तिव्र होत जाणार्या समस्येमुळे सरकारने नियम बदलले आणि सगळ्या २ स्ट्रोक गाड्यांची निर्मीती बंद करावी लागली. RD350, Yezdi, RX 100/135/G/Z, Shogun, Samurai ह्या सगळ्या गाड्या बदललेल्या नियमांना बळी पडल्या (नियम योग्यच होते). मध्यंतरी मारुती ८०० आणि साक्षात अँबॅसेडरलाही कार्बोरेटरच्या जागी फ्युएल इंजेक्षन लावले ते ह्याच कारणामुळे.
ह्या गाड्या आता परत बनणे शक्य नाही.
1 Nov 2013 - 3:26 pm | आदिजोशी
आमचं पहिलं प्रेम यामाहा (३५०,१३५,१००) आणि दुसरं प्रेम रोडकिंग आणि जावा :)
2 Nov 2013 - 12:33 pm | प्रसाद गोडबोले
ही जर गाडी यामाहाने परत लॉन्च केली तर पल्सार स्पेलंडर शाईन केटीएम वगैरे कित्येक गाड्यांचे मार्केट बसेल .
आपण तर डोळे झाकुन गाडी घेवु ही ..
2 Nov 2013 - 1:03 pm | टवाळ कार्टा
परत लॉन्च झाली तरी ती ४ स्ट्रोक असेल :(