दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
23 Oct 2013 - 12:04 am

दुबई सफरनामा भाग - 7

शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क

1
Figure 1 Late President of the United Arab Emirates (UAE), HH Sheikh Zayed bin Sultan Al Nahyan’s Mosque
अबुधाबीच्या आमच्या ट्रिपचे महत्वाचे हे आकर्षण होते. ही जगातील सर्वोत्तम प्रचंड म्हणून गाजलेली मशीद. या मशीदीत महिलांना व अन्य धर्मियांना प्रवेश हे ही या मशीदीचे आणखी वैशिष्ठ्य म्हणता येईल. त्यासाठी आमच्यातील स्त्रियांनी काळे बुरखे चढवले व त्या सिद्ध झाल्या.
2
Figure 2 परदे में रहने दो...
पुरूषांना प्रसाधनाकडे जरूर जा म्हणून सांगण्यात आले म्हणून आम्ही तळघरातील प्रचंड प्रसाधनगृहाला भेट दिली त्यावेळी हात कोपराकडून पंजाकडे बसून धुवायला सोईचे व्हावे म्हणून केलेली जलनिस्सारणाची सोय भावली. शिवाय अनेक अंशातील आरशांनी सजलेला एक भाग आपल्या शरीरयष्टीला विविधांगानी न्याहाळायला सोईचा वाटला. अल्लाहची 99 नावे कोरलेली पाहिली. 9 टनी झुंबराने लक्ष वेधले. भिंतीवरील नक्षीकामाचा अद्वितीय नमुना न्याहाळला. संपूर्ण जागेला आच्छादणारे कालीन (कार्पेट) पायाला मऊ मऊ लागते होते. ताजमहालाची आठवण करून देणारे मॉन्यूमेंट पाहून आनंद झाला. मानवी हातांतून किती व काय काय कलाकारी निर्माण होऊ शकते याचे उदाहरण म्हणून याकडे पहाताना, त्या सौदर्याचा आस्वाद निरपेक्ष बुद्धीने घेताना, काही अतिताई मुर्ख माझ्या धर्मांच्या प्रतिकांशिवाय जगात काही ठेवायचे नाही अशा कोत्या अविचाराने प्रेरित होऊन हातोडीने ते नष्ट करू पाहतात या विरोधाभासाची प्रकर्षाने आठवण झाली.
एक गोष्ट जरा आखरली. प्रवेशद्वाराशी घामाने व वापरून खराब दिसणारी चित्रविचित्र पादत्राणे ठेवायचे स्टँड, जणू मोहक बाळाला नजर न लागावी म्हणून काजळाची तीट लावून काहीसे वैगुण्य दर्शवत होते की काय़?

3
Figure 3 प्रवेशद्वारातील पादत्राणांचे कप्पेदार स्टँड

4
Figure 4 पायधुणी
5
Figure 5 आरसेमहालाचे प्रसाधन
6
Figure 6 99 नावे अल्लाची
7
Figure 7 स्तंभावरील कोरीव काम
8
Figure 8 उंच मिनार
9
Figure 9 गोलघुमट
10
Figure 10 हजार खांबी चौसोपा
11
Figure 11 भिंतीवरील नक्काशी
12
Figure 12 रत्न मढित 9 टनी शँडेलियर
असे करता करता आमचा परतीचा दिवस उजाडला. दुपारी 12 पर्यंत खोल्या मोकळ्याकरून दिल्याने काही काळ खरेदीत व काही वेळ लॉबीत रेंगाळत काढून मग आम्ही विमानतळावर पोहोचलो.
13
Figure 3 अलकासह चाललो परतून

व्हिसा व पासपोर्टवर ठप्पेठुप्पे मारायचे काम उरकून विमानाची वाट पाहेतोवर अनुभवलेली एक एक दृष्ये मनात तरळली. सुखद सफरीचा परतीचा प्रवास आटोपल्यावर मुंबईतील भुरभुरणारे हवामान व चिकचिकणारा घाम भारताची आठवण देऊन गेला. विस्कळीत वाहनांच्या गर्दीमधून वाट काढत टॅक्सी पुण्याला परतली तोवर झुंजुमंजु 5.30 झाले होते. मग लागलेल्या झोपेत मी अरबींवेषात पुन्हा दुबईला विहार करून आलो, तेंव्हा पुढील सफरनामा लिहायला सुरसुरी आली.
मित्रांनो, आपल्याला कसा वाटला सफरनामा सवडीने पण जरूर कळवावा.

शशिकांत ओक.
मो.- 9881901049. shashioak@gmail.com

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

23 Oct 2013 - 3:42 am | बॅटमॅन

वाव!!! एक नंबर आवडल्या गेली आहे ही मशीद.

मुक्त विहारि's picture

23 Oct 2013 - 8:20 am | मुक्त विहारि

झक्कास...

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 11:13 am | उद्दाम

छान

अनिरुद्ध प's picture

23 Oct 2013 - 12:22 pm | अनिरुद्ध प

लेख आणि प्रकाशचित्रे उत्तम आवडली.

कुसुमावती's picture

23 Oct 2013 - 12:44 pm | कुसुमावती

प्रकाशचित्रे अणि लेख दोन्ही उत्तम

बापु देवकर's picture

23 Oct 2013 - 12:51 pm | बापु देवकर

छान छान

अग्निकोल्हा's picture

23 Oct 2013 - 2:27 pm | अग्निकोल्हा

.

मदनबाण's picture

23 Oct 2013 - 4:20 pm | मदनबाण

छान...

प्रचेतस's picture

23 Oct 2013 - 4:41 pm | प्रचेतस

मस्त.
पण फोटो जरा मोठे टाका की.

शशिकांत ओक's picture

23 Oct 2013 - 7:36 pm | शशिकांत ओक

वल्ली व अन्य मित्रांनो,
काही फोटो उदा 6,7,8,9 कॅमेरा उभा धरून काढलेले आहेत ते मोठे केले तर ब्लर होतात. असे जाणवते. मला या मधील खास ज्ञात नाही. चुकत माकत जे जमेल तसे सादर करतो.
आपण व अन अन्य मित्रांनी फोटो आकार कसा बदलावा ते सांगून जाते.

शशिकांत ओक's picture

23 Oct 2013 - 7:49 pm | शशिकांत ओक

वल्ली अन्य मित्रांनो,
उभ्या कॅमेऱयाने काढलेले फोटो क्र 6,7,8,9 आता मोठ्ठे करायला काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केलेत तर पुढील वेळी ते अमलात आणता येईल. मी त्यांचा साईझ वाढवला तर ते ब्लर होतात असे दिसते. मला याबाबतचे शिक्षण नसल्याने काही काळ बटणांशी चाळेकरून जे पदरात पडेल ते प्रस्तूत करायला मिळते तंसे टाकावे लागतात.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Oct 2013 - 6:08 am | अत्रुप्त आत्मा

झकास! :)

अमेय६३७७'s picture

26 Oct 2013 - 7:54 am | अमेय६३७७

मस्तच