खुंटीवरच्या कविता
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन तो बराच वेळ बसला
भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटला
उठून मग त्याने हातात वाटी वस्तरा घेतला
ब्रश नसल्याने हातानेच तोंडाला साबण फासला
आरशात बघून जेव्हा त्याने वस्तरा फिरवला
कवीमहाशयांच्या मनात काव्यबीज संचारला
उत्तररात्रीच्या उन्मत्त धुक्यात मग तो लिहीतच राहिला
रात्रभर जागून लेखणीला जीवाच्या आकांताने छळतच राहिला
सकाळी घोटभर दूध पिऊन पुन्हा पाने फाडतच राहिला
संध्याकाळी पेन बदलून नव्या वह्या काढतच राहिला.
दिवसांमागून दिवस गेले, पुनव जाऊन आवस आली
कविमहाशयांची म्हैस, एकदा नव्हे दोनदा व्याली