मौजमजा
मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....
कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी :
मी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)
मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)
भाग १
___________________________________________________
मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.
हायकु (कायकु)-२
बाप लेकीचा
अल्लड प्रश्न
साजुक उत्तर
बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर
=====
कालचक्र
हलले पान
हसली कळी
झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी
======
थोरांची ओळख (?)
आधी पाहू धर्म
मग शोधू जात
ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई. ठेवू बासनात
========
सहचरी
डोळ्यात धाक
लटका राग
झोपेतही माग ,....जागेपणी विसरल्या आठवणींचा
जिलबीचं प्रमाण किती असावं ?
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693
नमस्कार मंडळी,
मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो.
स्वयंपाक चौथर्यावर नवर्यांना प्रवेश द्यावा काय ?
अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !