अखेर ऑस्करला लिओ भेटलाच

shawshanky's picture
shawshanky in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 12:43 am

आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे …
कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण ….
अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात
लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही
अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !! अधिक कौतुक वाटले ते त्याने केलेल्या मनोगताचे ….
उद्योगपती आणि त्यामागे धावणारे जागतिक नेतृत्व आणि त्याला साथ देणारा मानव हे निसर्गाचा जो बळी घेत आहे, त्याचा विचार करण्याचे अत्यंत समर्पक शब्दात लिओनार्डो ने केलेले विवेचन,सगळ अगदी जुळून आले … एका मागून एक उत्कृष्ट चित्रपट देऊन
अखेर चिकाटीने त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलेच … आणि ६ वेळा नॉमिनेशन मिळून अखेर ऑस्कर ला लिओ भेटलाच, आयुष्यभर मिरवायला …

कलानाट्यसमाजमौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

लिओनार्दो ला अ‍ॅकेडेमी पारितोषिक मिळाल्यामुळे फार आनंद झाला आहे. त्यात तो पर्यावरणवादी असल्यामुळे तर आणखीनच छान वाटले!

shawshanky's picture

1 Mar 2016 - 6:43 pm | shawshanky

सत्यवचन !!!

पैसा's picture

4 Mar 2016 - 10:36 am | पैसा

सहमत

मुक्त विहारि's picture

1 Mar 2016 - 9:57 am | मुक्त विहारि

+१

स्वामी संकेतानंद's picture

1 Mar 2016 - 10:42 am | स्वामी संकेतानंद

इतनी शिद्दत से तुम्हें पाने की कोशिश की है
की इंटरनेट के हर बन्दे ने तुम मिलने की साजिश की है

असेच काहीसे झाले. पब्लिक प्रेशर बाबा, पब्लिक प्रेशर!
आता लियो फालतू एक्शन पटात काम करायला मोकळा.
reddit वर एक म्हणाला, डिकैप्रियो आता डनकैप्रियो होईल, ज्याप्रकारे डी नीरो डन नीरो झाला होता त्याचप्रकारे!! तसे होऊ नये ही सदिच्छा!

shawshanky's picture

1 Mar 2016 - 9:28 pm | shawshanky

+१

भाऊंचे भाऊ's picture

6 Mar 2016 - 3:02 pm | भाऊंचे भाऊ

लिओ हां बरीच वर्षे टीनेज सेंसेशन इमेज मधून बाहर पडायला धडपडला आहे. आणि त्याने मेहनतीने ते साध्य केले आहे.

ज्याची खरी सुरुवात ब्लड डायमंड ने झाली. त्याला शरीरयष्टी नसताना रफ टफ व्यक्तिरेखेचा रोल साकारताना बघणे रोचक होते. तीच बाब शटर आयलंड मधे त्याला सैनिकाच्या वेषात बघताना जानवली. निव्वळ भावमुद्रेतुन त्याने युध्दातील सैनिकाचे प्रसंग जीवंत केले होते त्यामुळे हो आता ऑस्कर मुळे जर तो फालतू(?) मारधाड्पट स्विकारायला मोकळा होत असेल तरआपण त्याचे स्वागतच करुया

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2016 - 11:49 am | प्राची अश्विनी

लिओला कुणी विचारले, भारतातील असहिष्णुतेबद्ल तुझे काय मत आहे?
लिओ घाबरून म्हणाला, नाही, मी माझे ओस्कर परत करणार नाही.
(कस्काय वरून)

अन्नू's picture

1 Mar 2016 - 12:27 pm | अन्नू

=)) =))
काल सगळ्या नेटवर लिओचीच चर्चा होती.
https://www.facebook.com/redfmindia/videos/1028653750533223/

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 6:57 pm | एक एकटा एकटाच

आपला आवडता हिरो आहे तो......

सुमीत भातखंडे's picture

1 Mar 2016 - 8:48 pm | सुमीत भातखंडे

अखेर ऑस्करला लिओ भेटलाच
+१

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 9:08 pm | उगा काहितरीच

खुप आधीच मिळायला हवा होता !

विकास's picture

1 Mar 2016 - 9:36 pm | विकास

एक बोलके चित्र आणि चांगला संदेश...

Leonardo - Sachin

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 11:22 pm | उगा काहितरीच

या २२ वर्षांच्या प्रवासातही यांना भरपूर काही मिळतच होतं की राव ! (पैसा, प्रतिष्ठा , प्रसिद्धी , लहानमोठे अचिव्हमेंट्स)

विकास's picture

1 Mar 2016 - 11:25 pm | विकास

हे स्वप्नपुर्तीसाठी म्हणले आहे. :)

मंदार कात्रे's picture

2 Mar 2016 - 8:52 am | मंदार कात्रे

fb

शा वि कु's picture

4 Mar 2016 - 8:53 am | शा वि कु

आता नोलनचा नंबर

जव्हेरगंज's picture

4 Mar 2016 - 9:34 am | जव्हेरगंज

म्हणजे TITANIC मध्ये मिळाले नव्हते की काय?
त्यातला अभिनयही जबरा होता !

shawshanky's picture

4 Mar 2016 - 8:16 pm | shawshanky

घ्या आत्ता।।

टायटॅनिकला अकरा ऑस्कर मिळाले होते, पण सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले नव्हते.

भंकस बाबा's picture

4 Mar 2016 - 10:00 pm | भंकस बाबा

रेवेनेन्ट सिनेमाच जबरदस्त आहे. लियोचा अभिनय तर त्याहून जबरदस्त. जेव्हा हां चित्रपट पाहिला तेव्हाच वाटले होते हां चित्रपट खळबळ माजवणार!
माझा आवडता टॉम हैंक्स कमी पडला.

भाऊंचे भाऊ's picture

5 Mar 2016 - 12:43 pm | भाऊंचे भाऊ

एका मागून एक उत्कृष्ट चित्रपट देऊन
अखेर चिकाटीने त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलेच … आणि ६ वेळा
नॉमिनेशन मिळून अखेर ऑस्कर ला लिओ भेटलाच,

येस्स...!