साहित्यिक

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.

लेखनप्रकार: 

निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण

सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो. या अंगाने मी कबीरांच्या भजनांचा विचार केला नव्हता.

लेखनप्रकार: 

‪निर्गुणी भजने‬ (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी

सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

वाट पहात आहे.....

त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
बसेन ते झाड माझे,
शिटेन ती फांदी माझी,
असले त्याचे आक्रमण नाही!

घरटोघरटी माझी पिले
माझ्याच पिढ्या, माझेच वंश
असली माणुसकी त्याची नाही!

मैत्री कधी कुणाशी केली नाही,
पण बुडत्या मुंगीसाठी
पान टाकायचे विसरला नाही!

चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि
तोऱ्याने मान फिरवणे नाही!
पंखांचे मिटणे केवळ सुंदर
जणू मौनाचे शिल्प पुरातन!

पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
युगायुगांची पौर्णिमा उजळावी
इतके त्याचे पंख सतेज!

'चार नगरांतले माझे विश्व' - जयंत विष्णु नारळीकर

(मी कधी कोणत्या पुस्तकाचे समीक्षण लिहिले नाही आहे. हा पहिलाच प्रयत्न आहे. आजच हे पुस्तक वाचून संपवले. ते मला खूप भावले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटले, म्हणुन लिहायचा प्रयत्न करतेय. पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. मी मला जितकं झेपेल तितकंच लिहू शकेन. बघा जमलंय का?)

एखादे पुस्तक एकदा वाचले की पुरेसे ठरते तर एखादे पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक वाचावेसे वाटते.

लेखनविषय:: 

गोनिदा...................

उद्या १ जुन.......गोनिदा जाउन अठरा वर्ष होतिलं. १ जुन १९९८ ला पुण्यात ते अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं करुन मोठ्या प्रवासाला निघुन गेले...कायामचे! आज जर अप्पा ( गोनिदांना) असते, अर्थातच ते आजही आपल्यातच आहेत...आठवनींच्या रूपात, त्यांच्या लिखाणाच्या रूपात, पण जर हयात असले असते तर येत्या ८ जुलैला १०० वर्षांचे झाले असते..असो. आज सहजच त्यांची आठवण आली आणि लिहीता झालो. अप्पांच्या अठराव्या स्म्रुतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याबद्दल अगदी अल्प अशा आठवणी सांगणारा हा लेख त्यांनाच अर्पण....

==========================================================================================

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

...वरना इक और कलंदर होता

अगदी नेहमीसारखाच दिवस होता. नेहमीसारखाच प्रवास; नेहमीच्याच दोन ठिकाणांमधला. घर ते कामाचं ठिकाण. तोच ट्रॅफिक, तेच सगळं. पण कधीकधी अशी एखादी छोटीशी गोष्ट, तीही नेहमीचीच, अगदी नव्याने समोर येते आणि बाकी सगळ्या नेहमीच्या गोष्टींवर हळुवार फुंकर मारून जाते. आणि दीर्घकाळ मग तो गारवा पुरतो.

तर, गाडीतल्या स्टिरिओवर हरिहरनची एक ग़ज़ल लागली. तसा ग़ज़ल हा मुळातच हळुवार विषय आणि त्यात ग़ुलाम अली, मेहदी हसन, किंवा तसे नव्या पिढीचे हरिहरन असतील तर मग आवाजाबररोबर शब्दांचा अर्थही अ‍ॅम्प्लिफाय होऊन तुमच्यापर्यंत येतो.

लेखनप्रकार: 

< < < < मजबूरी हय > > > >

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.

ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!

समरस व्हावे ऐसे

थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा

शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता

मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे

परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण

- डॉ. सुधीर रा. देवरे

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

Pages