मॅनेजमेंटचा गोडाचा शिरा
आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे.