दसरा आणी श्रीखंड
आला दसरा............
दसरा आणी श्रीखंड
आला दसरा............
दसरा आणी श्रीखंड
खूप छान व हॅण्डसम दिसतेस -बघत राहावेसे वाटते -प्रिया म्हणाली
काहीतरी काय- साधा माणूस आहे -सरळ साधा संवेदना क्षम मनाचा तो म्हणाला
म्हणून तर मला आवडतोस -प्रिया
पण तुला माझी पर्वा नाही -प्रिया
असं का बोलतेस ?
तू ज्या ब्यांकेत काम करतोस तिथल्या क्लायंट्स ची लिस्ट माहिती मला हवी होती
माझासाठी ते फार महत्वाचे आहे -माझं प्रमोशन -पगार वाढ सार त्यावर अवलंबून आहे -प्रिया
त्या बदल्यात आपण लग्न करणार अशी तुझी ऑफर आहे -तो
काहीतरी बोलू नकोस -ऑफर मला आली आहे -माहिती त्या बदल्यात प्रमोशन -पगार वाढ -
मोठा मासा आणि छोटा मासा ..
भाग २
तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू.
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.
तो: हॅलो.
ती: हं बोला.
तो: काय गं, झोप झाली का?
ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.
तो: हं.
ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.
तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का?
ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअॅप केले आहे ना?
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :-
http://www.misalpav.com/node/45320
आमार कोलकाता - भाग २
तुम्ही कशाला जाताय, मीच आणते ना. यांनाही बरोबर नेते म्हणजे बोलणंही होईल" मी बाबाच्या बहाण्याचा धागा पकडते. मलाही तसं घरात अवघडल्यासारखं झालंय. बाहेर पळावसं वाततंय. पण या शिर्यालाही सोडायचं नाहिय्ये. " चालेल ना हो तुम्हाला" माझ्या त्या प्रश्नावर परिक्षेत एकवीस अपेक्षीत मधला घोकून घोकून पाठ करुन ठेवलेला प्रश्नच पेपरात आल्यावर व्हावा तसा आनंद शिर्याच्या चेहेर्यावर गणपतीत लाईटच्या माळा चमकाव्यात तसा चमचमला.
त्यालाही तेच हवे असावे.
डिंग डाँग…" बेलचा आवाज आला. वाजले वाटते पाच. इतकी पक्की वेळ पाळणारा शिर्या ग्रेटच म्हणायला हवा. मी कानोसा घेते. " या या या" बाबाचा आवाज " घर सापडायला काही त्रास तर झाला नाही ना" हे वाक्य मी म्हणायचं ठरवलं होतं. बाबा का म्हणतोय! प्रोजेक्ट कॉऑर्डिनेशन नीट व्हायला हवं." विनायकराव नाही आले" बाबा कोणाला तरी विचारतोय.
"नाही त्यांना अचानक...…" एक मस्त हरीश भीमाणी सारखा घनगंभीर आवाज उत्तर देतो. पोटात गुदगुल्या होतात या आवाजाने.
मागील दुवा: http://misalpav.com/node/45328
ठाकठोक
---------
मी तसा ओके आहे .
फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही.
पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते .
मला त्रास द्यायला. छळायला.
यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं.