समाधीवरचा गाव (एक भयकथा)
'सावरगाव' जेमतेम हजार-दीडहजार लोकसंख्या असलेल छोटस गाव. तस पाहायला गेल तर, सभोवताली असलेल जंगल आणि त्यात असणाऱ्या प्राण्याशिवाय गावाला दुसरी काही ओळख नाही. उतरत्या छपराची घरे, समोर अंगण आणि त्याभोवती ताराचे कुंपण अशी साधारण घरांची रचना. जंगलातील प्राणी घरात घुसू नये म्हणून तारेचे कुंपण हमखास घराभोवती पहायला मिळत होते. जंगलातील प्राणी कधी घरात घुसून पाळीव प्राण्याचा, लहान मुलांच्या गळ्याचा घोट घेईल याची याची शाश्वती नसायची. गाव मधोमध जंगलात असल्यासारखे होता. तिन्ही बाजूला जंगल आणि उरलेल्या एका बाजूला नदी. त्यामुळे गाव जंगलात असल्यासारखेच भासायचे. शेती हा गावातील एकमेव व्यवसाय.