किलबील किलबील पक्षी बोलती...

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jul 2019 - 8:17 am

"सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे, हा दागीना मिरवायचा की मोडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे"
फळ्यावर हा सुविचार लिहून डोंगरे सर थाम्बले. फळ्यावरच्या त्या अक्षरांकडे पुन्हा एकदा पाहिलं. ओल्या फडक्याने पुसलेल्या काळ्याकुळकुलीत फळ्यावर ती पांढर्‍या खडूने काढलेली अक्षरे टिप्पूर चाम्दण्यासारखी दिसत होती.
अक्षरे पहात असताना त्यांना का कोण जाणे रफीचे " फलक पे जितने सितारे है वो भी शरमाये…" हे गाणे आठवले. या फळ्यालाही फलक म्हणतो, आणि त्या आकाशालाही फलक असेच म्हणतो. गंमत आहे ना? "अक्षर " म्हणजे कधीही न क्षरणारे….नष्ट न होणारे… आकाशातल्या त्या तारकासुद्धा अक्षरच असतात की त्या अर्थाने. या विलक्षण योगायोगाची त्याम्ना गम्मत वाटली.
फळ्यावरच्या त्या अक्षराना लाल हिरव्या रंगीत खडूने थोडी जाडी द्यावी हा विचार त्यानी मनातून झटकून टाकला. इतक्या छान अक्षराम्ना ती बॉर्डर विद्रूप करणारी ठरली असती. त्या फल्यावरच्या अक्षरांखाली काहिही लिहीणे आता नकोसे वाटायला लागले. पण त्या फळ्यावर इतकी मोकळी जागा सोडली तर दुसरे कोणीतरी येवून त्याखाली नक्की लिहीतील याची खात्री होती. थोडावेळ विचार करत त्याम्नी पुन्हा पांढरा खडू उचलला. फळ्यावर रिकाम्या असलेल्या जागेत इंग्रजी एस आकाराची एक रेष काढली. ती अपूर्ण वाटली म्हणून त्या एस च्या वरच्या वळणाला लागून त्यांनी एक वर्तुळ काढले. त्या वर्तुळात दोन ठिपके . त्या दोन ठिपक्यांखाली थोडे अंतर ठेवून एक लहान रेषा काढली . "अरे हे काय.... हा तर गालावर हात ठेवून बसलेला चेहेरा दिसतोय….. गोल मटक वर्तुळाकार चेहेरा . ठिपक्यासारखे दोन डोळे आणि आडव्या रेषेची जिवणी. ओळखीचा वाटतोय. खूप. त्यांनी त्या चेहेर्‍याकडे नीट पाहिले. शरयू मंत्री? स्वप्ना चित्रे? दिव्या कामत?.... दिप्या सलाग्रे ? चंदू? नीना मॅडम…. शंकर शिपाई … कुसूलकर बाई देवळे साहेब?.... ओळख लागतेय पण साम्गता येत नाही. डोंगरे सरांना मजा वाटली. एक वर्तुळ , दोन ठिपके आणि एक आडवी रेष या भांडवलावर आपण ओळखीची व्यक्ती शोधतोय, हे तर कोणत्याही चेहेर्‍याचे वर्णन, होऊ शकते. आणि कितीतरी चेहेरे एक्सारखे असतातच की. डोक्यावर हॅट नसलेला चार्ली चॅपलीन आणि कॅप नसलेला हिटलर हे दोन्ही चेहेरे सारखेच.
क्षणभर त्याफळ्यावरच्या चेहेर्‍याला एखादे नाक काढून त्याखाली जीवाणीच्या वरती मिशीची बारीक रेषा रेखाटावे असे वाटून गेले. पण मग ते तसे रेखाटले तर त्या चित्रात आत्ता दिसणारी शरयू , स्वप्ना, दिप्या , शंकर शिपाई , कुसूलकर बाई , ही सगळी मंडळी गायब होतील आणि फक्त चॅपलीन आणि हिटलर उरतील. ते दोघेही अधिराज्य करणारे. एकाने मनावर केले, दुसर्‍याने देशावर . एकाने लोकांच्या मनाचा नकाशा बदलला , दुसर्‍याने जगाचा. ते दोघे एकत्र आले तर पिस्तुलातुन हसवणार्‍या गोळ्या बाहेर पडतील किंवा मग हसवणाच्या छळछावण्या सुरू होतील.
हा नक्की चेहेरा कुणाचा? मुलाचा की मुलीचा? पण हे कळणार कसे? मुलगा की मुलगी हे गर्भाचं लिंग निदान करणारे सोनोग्राफी यंत्र अस्ते ना तसं एखादं यंत्र असायला हवं होतं , चित्र काढायच्या अगोदरच चित्र मुलाचं की मुलीचे हे साम्गणारं. मग बहुतेकांनी मुलींचीच चित्रं ठेवली असती. लोकांना गोड मुलींची चित्रं बघायला आवडतात.
तसाही काय फरक असतो बाळांच्या चेहेर्‍यात ? बिटीबीटी पहाणारे चौकस डोळे , अपरं नाक, रेशमी जावळ , इवलेसे चिमुकले हात, त्या हातावर मागे सायीसारखा फुगवटा….
फळ्यावर चित्र न काढताही डोंगरे सरांना तो सायीचा मखमली मऊसूत स्पर्ष जाणवला, रेशमी जावळावरच्या वेखंडाच्या पावडरचा हवा हवासा गंध आला.
मागे एकदा असेच झाले होते. ऑईल कलरने चित्र रंगवले होते. कसल्याशा राज्यारोहणाच्या समारंभाचे. रंगवताना सिंहासनावर बसलेल्या राजाचे करारी डोळे, शेजारी बसलेल्या राणीचे आनंदी डोळे, युवराजाचंए उत्सूक डोळे, हे वेगवेगळॅ दाखवायचे होते, आलेल्य प्रजाजनांचे , प्रादेशी पाहुण्यांचे गर्दीतले चेहेरे वेगळे दाखवायचे होते. जवळजवळ आठ बाय दहा चा भला मोठा कॅनवास होता, आपण अगोदर चारकोल ने कच्चे स्केच काढून मग थेट रंगवायलाच घेलं होत्म ते. राजसिंहासनामागचा भव्य मखमली पडदा त्यावर पडलेल्या चुण्या त्याचा तो मखमाले स्पर्ष हात लावून पहावासा वाटत होता. गर्दीतल्या प्रत्येक चेहेरा बोलका होता, प्रत्येक चेहेर्‍यावरचे वेगवेगळे भाव जाणवत होते.
सनई चौघडा वाजवणार्‍या वादकांचे हावभाव पाहूनच त्यातील लय सूर ताल ऐकू येत होते.
रंगसंगती , रंगाच्या छटा यांचा अप्रतीम खेळ अनुभवायला येत होता,
प्रदर्शनात जेंवा चित्र लावले होते तेंव्हा आपण ते पहायला येणार्‍या लोकांचे चेहेरे पहायचो. चित्रातली गर्दी आणि ते पहायला येणारी गर्दी यांचे चेहेरे अक्षरशः प्रतिबींब व्हायचे.
गायतोंडे आल एहोते चित्र पहायला. ते एकटक चित्र पहात होते जवळजवल पंधरा मिनीटे, चित्र पाहून झाल्यावर त्यानी आपल्या पाठीवर थाप मारली , घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. फार काही बोलले नाहीत पण म्हणाले आज मी चित्र कानांनी ऐकली. सनै चौघड्याचे आवाज, राज्याभिषेकाचे मंत्रघोष , गर्दीतली दबकी कुजबूज, सगळं ऐकू आलं रे, बोलकी चित्रे काढतोस.म्हणत खूप वेळ आपला हात हातात घेवून काही न बोलता त्यावर नुसते थोपटत राहीले.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

23 Jul 2019 - 8:33 am | मुक्त विहारि

कथा जोरदार होणार....

मालविका's picture

23 Jul 2019 - 9:42 am | मालविका

सुंदर सुरवात !