शोध (भाग एक)
आज कथा पूर्ण झाली. एक महिना या कथेवर काम करत होतो. तसं पाहिलं तर मी पुर्ण वेळ लेखक नाही. पण मला कथा लिहायला आवडतात. लघुकथा. सुचेल तशी लिहितो आणि शनिवारी रविवार त्या व्यवस्थित संकलित करून ठेवतो लॅपटॉपवर. माझं नाव विनित सदानंद राऊत. मी पुर्ण वेळ अकाऊंटंट आहे. आज मी या कथांबद्दलच एक कथा सांगणार आहे. कथा सुचली की मी मोबाईलमध्ये टाईप करून नंतर लॅपटॉपवर कॉपी करत होतो. अशा वीस पंचवीस कथा लिहिल्या होत्या मी. पण त्या फक्त माझ्या लॅपटॉपवर होत्या.