सनकी भाग ६
शिवीन कायाने घातलेल्या काँट्रॅक्टच्या अटी मान्य करायला तयार नव्हता. कारण त्या अटी खुपच जाचक व पूर्ण कायाच्या फायद्याच्या होत्या.
शिवीन कायाकडे पाहत बोलू लागला.
शिवीन,“ it’s very unfair to me. I can’t afford that. काय आहे हे its not joke. पहिली अट
१ कोणते ही डिजाईन तुम्ही अप्रुव केल्या शिवाय मी वर पाठवू शकणार नाही पण तुम्ही केलेले डिजाईन माझ्या अप्रुअल शिवाय पाठवणार. मला अमान्य आहे.
२ जर मी मध्येच कोणत्याही कारणास्तव प्रोजेक्ट सोडला तर मी प्रोजेक्ट मध्ये लावलेले पैसे बुडणार व तुम्हाला मी वरून दंड म्हणून 15cr द्यायचे. मला हे ही अमान्य आहे.