सनकी भाग ३

Primary tabs

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
11 Jan 2020 - 8:08 am

शिवीन ठाकूर म्हणजे एक खूप मोठं नाव होत. शिवीन आणि काया दोन ध्रुवच जणू.शिवीन एक मोठ्या बापाचा मुलगा मुंबईतील सगळ्यात मोठया फॅशन हाऊसचा मालक व नावाजलेल्या फॅशन डिझायनरचा मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव कुणाल ठाकूर त्यांना केटी म्हणून फॅशनच्या दुनियेत ओळखले जायचे. फॅशन हाऊसचे नाव के.टी. फॅशन हाऊस असे होते.

शिवीन हा हॅपी गो लकी तरुण होता. शिवीन रंगाने गोरा, उभट चेहरा, सरळ नाक, उंची सहा फूट ,कमावलेले पिळदार शरीर असा हसरा व उमदा तरुण.काया व शिवीनने एकाच कॉलेज मधून फॅशन डिझाईनरची डिग्री घेतली होती.कॉलेज मध्ये असताना शिवीनच्या मागे अनेक मुली असायच्या एक तर दिसायला हँडसम व त्यातून पैसेवाला त्यामुळे तो सतत मुलींच्या गराड्यात असायचा. तो ही हे सगळं एंजॉय करायचा.रात्र-रात्र पार्ट्या करण, रोज नवीन मुलींबरोबर डेटवर जाणे हे त्याचं नॉर्मल लाईफ होत.पण तो हुशार ही तितकाच होता.फॅशन डिझायनिंग हे त्याचं पॅशन होत.

त्याला अमेरिकेत पी.जी (पोस्ट ग्रॅजवेट) करायचे होते. त्यानुसार तो डिग्री नंतर अमेरिकेला गेला होता व त्या नंतर आता त्याची एंगेजमेंटची बातमी आली होती.

●●●●●

कायाच असं म्हणणं होतं की शिवीन व तिचे अफेर होते. कॉलेज मध्ये असताना शिवीनने तिला प्रपोज केले व तिची व शिवीनची लव लाईफ सुरू झालेली. पुढे तो अमेरिकेला गेला तरी शिवीन तिला भेटायला अमेरिकेहून अधून -मधून येत राहिला. त्याच्या व तिच्या प्रेमाने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. कायाने जेंव्हा त्याच्या मागे तुझ्या घरी घेऊन चल ; लग्न कधी करायचे? अशी भुणभुण लागली तेव्हा , तो कायाला भेटायला येई ना सा झाला. तिचा फोनही गेल्या दोन वर्षांपूर्वी घेणं त्याने बंद केलं. शिवीनने प्रेमाचं नाटक करून तिला फसवलं आहे.

असं काया सतत सुधीरला सांगत असे.

●●●●

सुधीरने कायाला शांत केले. शांताबाई कायाची कामवाली तिला फोन करून बोलावले. ती सगळा पसारा आवरू लागली. तिच्यासाठी हे नवीन नव्हत. कायाच काही तरी बिनसले की ती घरात अशी तोड-फोड अधून-मधून करत असे. पण आज काही तरी मोठं झालय याचा अंदाज शांताबाईने बांधला. मोठ्या लोकांची मोठी काम अस म्हणून ती कामाला लागली.

सुधीर कायाला बेडरूम मध्ये घेऊन गेला व म्हणाला,

सुधीर , “ आज काया दि तू ऑफिसमध्ये नाही आलीस तरी चालेल आपण फॉरेन डिलिगेस्ट बरोबरची मिटिंग पोस्टपोन करू.”

काया,“ नाही मी तयार होतोय तू पंधरा मिनिटे थांब आत्ता आले , वर्क इस फर्स्ट !” अस म्हणून तिने डोळे पुसले एक मोठा निःस्वास सोडला व ती सुधीर काय म्हणतोय हे न ऐकताच बाथरूममध्ये गेली ही.

सुधीर बेडरूमच्या सोप्यावर बसून राहिला. बाहेर शांताबाई पसारा उचल होती. काया तयार होऊन आली. सुधीर तिला पाहतच राहिला. ही तिच काया होती का जी माघाशी रडत होती. कारण आता तिच्या चेहर्‍यावर रडल्याची कोणतीच खून नव्हती म्हणजे माणूस रडला किंवा त्याचा मूड खराब असला की त्याचा चेहरा पडलेला असतो पण कायाचा चेहरा तर प्रफुल्लित होता. जसे काही झालेच नाही. सुधीर मनातच म्हणाला म्हणूनच हिला सनकी म्हणतात का?

काया मस्त तयार झाली होती. गुलाबी रंगाचा छान गुडघ्या पर्यंतचा वनपीस घातला होता तिने. लाईट मेकअप आणि मोकळे केस पण लोकांसाठी रंगीबेरंगी कपडे डिझाइन करणारी काया स्वतः मात्र गुलाबी रंगच व त्याच्या वेगवेगळ्या शेड्स वापरत असे. जणू तिने स्वतः ला गुलाबी रंगात जायबंदी करून घेतले होते. सुधीरला हा प्रश्न कायम पडायचा की काया दुसरा रंग का वापरत नाही? पण तिला हा प्रश्न विचारायचे धाडस त्याला कधी झाले नाही.

शांताबाईला कायाने सगळी काम सांगितली होती.तिला काम झाल्यावर चावी घेऊन जायला सांगीतले कारण कायाच्या घरच्या चावीचे तीन सेट होते एक कायाकडे असे,एक सुधीरकडे व एक शांताबाईकडे असे.ते ऑफिसमध्ये पोहचले तर मिटिंगसाठी फॉरेन डेलीगस्ट(प्रतिनिधी) पोहचत आहेत दहा मिनिटात असे कळले. काया व सुधीर आप-आपल्या कॅबिनमध्ये गेले.

सुधीर दोन मिनिटांतच पळतच कायाच्या कॅबिनमध्ये नॉक करताच घुसला; काया लॅपटॉप उघडतच होती तोच तिला सुधीर असा आत घुसलेला दिसला ती त्याला ओरडणार तेवढ्यातच सुधीर बोलू लागला.

सुधीर ,“ sorry दि पण खूप अर्जंट आहे. माझं जरा शांतपणाने ऐक!”

काया ,“ बोल एवढे काय अर्जंट आहे? ” ती नाराजीने म्हणाली.

सुधीर,“ तुला तर माहीत आहे आपण एक खबऱ्या नेमला आहे; जो फॅशन इंडस्ट्री मधील सगळ्या खबरी आपल्याला देत असतो तर त्याने आत्ताच फोन करून, केटी फॅशन हाऊस बद्दल एक खूप महत्त्वाची खबर दिली आहे. ” तो मोठ्या उत्साहाने बोलत होता.

काया ,“ अशी काय बातमी आहे की तू आपण ऑफिसमध्ये आहे हे विसरून मला दि म्हणालास ; तुला माहीत आहे मला ऑफिसमध्ये नाती आणायला नाही आवडत.” काया जरा रागानेच बोलली.सुधीरला त्याची चूक लक्षात आली. तो खाली मान घालून बोलू लागला.

सुधीर ,“ sorry मॅम; पण मला खूप महत्त्वाचं बोलायचे आहे.”

काया,“ its ok ,बोल! ”

सुधीर, “ केटी फॅशन हाऊस सध्या डबघाईला आले आहे. कुणाल ठाकूर खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे. अर्थात शिवीन ठाकूर वर सध्या बिजनेस सावरण्याची जबाबदारी आहे. म्हणूनच तर त्याने रिचा सरनाईकशी एंगेजमेंटचा घाट घातला आहे कारण रिचाचे बाबा त्याला थोडी आर्थिक मदत करू शकतील असे ही रिचा त्याच्या फॅशन हाऊसची पार्टनर आहे. रिचाचे बाबा शिवीनला फाईनान्स पुरवणार आहेत. स्वतः च्या फॅशन हाऊसला या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याला मोठी ओर्डर हवी व तो वेस्टर्न फॅशन हाऊस या फॉरेन ब्रॅण्डची ओर्डर घेण्यासाठी प्रयत्न करतोय.” अस तो श्वास ही न घेता बोलत होता. त्यामुळे सुधीरला दम लागला. कायाने त्याच्या हातात टेबलावरचा पाण्याचा ग्लास दिला व ती विचारपूर्वक बोलू लागली.

काया,“ वेस्टर्न फॅशन हाऊस म्हणजे जे आपल्या बरोबर काम करण्यास उत्सुक आहेत व आत्ताच तर आपली मिटिंग आहे त्यांच्या बरोबर!” काया एक्साटेड होऊन म्हणाली .

सुधीर,“ हो मॅम आत्ता शिवीन आपल्या चांगलाच कचाट्यात सापडेल!” तो हसत म्हणाला.

काया,“ यसsss आता शिवीनला मा‍झ्या पासून कोणी नाही वाचवू शकत.” अस म्हणून काया हसली पण ते हसणं नॉर्मल नव्हतं तर वेगळंच होत.

नक्की कायाच्या मनात काय होत. हे हसणं शिवीनच्या आयुष्यात येऊ घातलेल्या मोठ्या वादळाची नांदी तर नव्हती?

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

11 Jan 2020 - 8:28 am | नावातकायआहे

रोचक.

शब्दांगी's picture

11 Jan 2020 - 7:46 pm | शब्दांगी

धन्यवाद