सनकी भाग १०
शिवीन आणि रिचा आज लवकरच घरी गेले. शिवीनने रिचाला तिच्या घरी सोडले व तो घरी गेला. त्याच्या आईने हाताला पट्टी पाहून काय झाले म्हणून विचारले.शिवीनने आईला सगळा वृत्तांत सांगीतला. शिवीनची आई काळजीत पडली. तिने रिचा कशी आहे? तिला तर जास्त लागले नाही ना? मग तू हॉस्पिटलमध्ये का नाही गेलास?डॉक्टरला बोलावू का? पोलीसात तक्रार केली का?अशा अनेक प्रश्नाचा शिवीनवर भडिमार केला. शिवीनने तिला खुर्चीत बसवले व काळजी करण्याचे काही कारण नाही असे म्हणून तिची समजून काढली.हो पोलीसात तक्रार केली आहे. पण गाडीला नंबर प्लेट नव्हती त्या मुळे काही उपयोग नाही झाला.अस त्याने सांगीतले.