दोसतार - ३३

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Jan 2020 - 6:27 am

" एहेरे ….. शिक्षकांचे कोणी लाड करतेका? लाड लहान मुलांचे करतात" पम्याने बोलायची संधी बरोब्बर साधली. माझ्या डोळ्यापुढे प्रत्येक विद्यार्थी पुढे येवून शालाप्रमुख सरांचा गालगुच्चा घेवून जातोय असे चित्र येवून गेले.
" सांगा सांगा . अजून काही सूचना असतील तर सांगा" सोनसळे सरांची आज्ञा शिरसावंद्य मानत शिक्षक दिन कसा साजरा करायचा याची चर्चा सुरू झाली

मागील दुवा http://misalpav.com/node/45909

शिक्षक दिन साजरा करायचा तेही वेगळ्या पद्धतीने.
पण सर शिक्षक दिन का साजरा करायचा? " वैजू ची थेट प्रतिक्रीया.
५ सेप्टेंबर हा आपले राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाक्रिश्ण्नन यांचा जन्मदिवस ते एक शिक्षक होते. त्यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.
पण मग तो शाळेने का साजरा करायचा.
शाळेने म्हणजे कोणी? सोनसळे सरांच्या या प्रश्नाला कोणाकडेच उत्तर नव्हते.
आणि शाळा कशी करणार.आणि शाळा म्हणजे तरी काय आहे. इथले विद्यार्थी आणि इथले शिक्षक हे दोन्ही मिळून शाळा तयार होते. ही इमारत नसली तरीही शाळा असेल. पण विद्यार्थी नसले तर शाळा उरणार नाही. म्हणेज शिक्षक दिन हा शाळेने नाही आपण सर्व जण साजरा करणार आहोत.
खरेच की शाळा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. रविन्द्रनाथ टागोरांनी तर झाडाखाली शाळा भरवली होती.
पण शिक्षक दिनाला करायचे काय.
सर आपण एक प्रमुख पाहुणे आणू. त्यांचे भाषण ऐकु. मस्त स्वागत गाऊ."
ए नको. स्वागत गीत नको. " एल्प्याला स्वागत गीत म्हंटले की पोटात गोळा येतो. "
हो हो सर. स्वागत गीत नको. टंप्याने दुजोरा दिला.
बरोबर आहे. सर प्रमुख पाहुणे , त्यांचे भाषण स्वागत गीत हे तर नेहमीचेच आहे. त्यात आपण काहीच करत नाही. भाषण सुद्धा ते प्रमुख पाहुणेच करतात. शुभांगीचे म्हणणे खरेच होते.
सर आपण काहितरी वेगळ करुया. वैजू उत्साहाने बोलली.
सर आम्हाला त्या दिवशी सर शिक्षकांचा आदर सत्कार करायचा कार्यक्रम करायचा आहे.
हरकत नाही. पण कसा करायचा. आणि तुम्ही त्यात काय करणार सोनसळे सरांचा प्रश्न रोख आम्हाला समजला नाही.
त्या दिवशी सगळ्या शिक्षकांना चॉकलेट वाटू. ही सूचना नक्की अपीची असणार.
अरे पण समजा हं समजा. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक शिक्षकांन एक चॉकलेट दिली तर शाळेत १००० मुले आहेत. प्रत्येक शिक्षकाकडे १००० चॉकलेटे असतील. आणि पुन्हा तो प्रश्न कायमच आहे . यात तुमचा सहभाग काय. चॉकलेट तर कंपनी तयार करणार दुकानदार ती विकणार.दुकानदार तुम्ही ती स्वतःच्या हाताने घरुन बनवून आणली तर तुम्ही काहितरी केले असे होईल. ते तसे करणार का? सोनसळे सरांच्या या प्रश्नाला आमच्या कोणाकडेच काहीही उत्तर नव्हते.
असे काहितरी करा की ते तुम्ही कधी केले नसेल.
सर त्या दिवशी आम्ही सगळे अजिबात दंगा करणार नाही.
देताय खात्री?
एकमेकांशी वर्ग चालु असताना बोलणे हा सुद्धा जिथे दंगा मानला जातो तेथे ही ही खात्री कोणीच देऊन शकत नव्हते. स्वतः बद्दल सुद्धा देता येत नाही. त्यामुळे सूचना आपोआपच बाद झाली. समजा सुचना मान्य झाली असती तर काय ती कशी अमलात आणायची याचाही प्रश्न होताच.
पहा सुचतय का कोणाला?
त्या दिवशी शिक्षकांसाठी तुम्ही काय कराल?

वर्गात एकदम शांतता पसरली. थोडा वेळ. मुलींच्या कोपर्‍यातून जरा कुजबूज सुरू झाली. मग त्यांच्या बाजूला पसरत गेली. आम्हाला तर काही सुचतच नव्हते.
सर सांगू का. वैजू ने हात वर केला.
हो जरूर सांग.
वैजू काय सांगते त्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले.
सर गेल्या महिन्यात आम्ही सर्वांनी आईचा वाढदिवस साजरा केला. आई रोज सकाळी उठून चहा करते. आमच्या साठी बाबांसाठी डबे करते.स्वैपाक करते ,घर नीट ठेवणे, आमचे कपडे इस्त्री करणे वगैरे करते. आईच्या वाढदिवशी आम्ही तीला सुट्टी दिली. आईची ही सर्व कामे त्या दिवशी आम्ही करायची असे ठरवले. ताईने सर्वांनी कामे वाटून दिली. आणि ही गम्मत आम्ही आईला सांगायची नाही असे ठरवले. ती सकाळी उठली तेंव्हा बाबांनी सर्वात अगोदर ऊठून चहा केलेला होता. . सकाळचा चहा आईला बाबांच्या सारखे खुर्चीत बसून पेपर वाचत . बंड्याने आईला स्वैपाक घरात जाऊ दिले नाही. त्याने पांघरुणांच्या घड्या घातल्या. आई बाबांचा चहा होतोय तोवर ताईला मी कांदा चिरून दिला. ताईने गॅसवर शिरा केला सगळ्यांना नाष्ता म्हणून. रविवार होता म्हणून शाळेत जायची घाई नव्हती.
बंड्याने आईला म्हणाला चल देवळात जाऊया म्हणाला. कधी नव्हे ते बंड्या म्हणतोय म्हणून आई देवळात गेली. त्याने तिथे वेळ काढला. ते दोघे येताहेत तोवर ताईने आणि बाबांनी मिळून कुकर मधे वरणा साठी डाळ आणि भात करून ठेवला. मी घरातला केर काढला. कपड्यांच्या घड्या केल्या.सगळे आवरून ठेवले आई घरी आली तेंव्हा ताईच्या पोळ्या ही तयार होत्या. बाबांनी बटाट्याची भाजी करुन ठेवली होती वरणाला फोडणी द्यायचीच काय ती बाकी होती.
इतके घर नीट नेटके पाहून आईला ते खरेच वाटत नव्हते. सकाळपासून खरेच आम्ही इतक्या शहाण्यासारखे का वागतोय हेही तीला समजत नव्हते. तीला ते स्वप्नच वाटत होते. एकदा तर तीने स्वतःला चिमटा काढून आपण झोपेत नाही याची याची खात्री पण करून घेतली.
आम्ही त्या दिवशी आई जी करते ती सगळी कामे केली. आणि तीला एक दिवस आराम दिला.
त्या दिवशी आम्हाला आई काय कामे करते ते कळाले. स्वैपाक करण्यात किती मज्जा येते तेही कळाले. पसारा काय एका मिनीटात होतो. पण तोच आवरण्यात किती वेळ जातो ते कळाले.
सर आपण शिक्षक दिन असा साजरा केला तर? एक दिवस आम्ही मुलेच शिक्षक बनतो. वर्गात तास घेतो. शिपाईमामांचेही काम करतो. वैजु चे बोलणे सगळा वर्ग जिवाचे कान करुन ऐकत होता.
काय छान कल्पना होती. आम्ही सगळे शिक्षक होऊन शाळा चालवणार. वैजुच्या सूचनेचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. मस्त कल्पना होती. सगल्यांनाच आवडली. कोणी कोणता तास घ्यायचा याच्या सूचना येवू लागल्या. माधुरी गाण्याचा तास घेणार होती. आपी गणीताचा, सुधीर इंग्रजीचा, अजित इतिहासाचा, महेश भौतीक शास्त्राचा. टम्प्याने तर आपण शाळेची तास संपल्या नंतरची घंटा वाजवणार असल्याचे जाहीर केले.
शाळा सुटे पर्यंत आठवी ब चा अर्ग त्या दिवशी शाळा चालवणर असल्याचे सर्व शाळाभर झाले होते.

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

19 Jan 2020 - 5:33 pm | सुधीर कांदळकर

वाघाची गोष्ट आहे मनोरंजक पण म्हणावी तशी रंगली नाही. शाळेतल्या दिवसातला दरवर्षी येणारा शिक्षक दिन आठवला.

बाकी लेखन आवडले. धन्यवाद.

विजुभाऊ's picture

21 Jan 2020 - 11:04 pm | विजुभाऊ

_/\_