पर्वाची गोष्ट आहे
पर्वाची गोष्ट आहे
सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली
चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे
नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली
जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो
वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी
लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती
तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली
मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण
कसे दिले ?
१० ला एक
४० ला ६ दे -हि म्हणाली
५ देईन -गजरे वाला मुलगा
ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले