लाज - स्पर्धेबाहेरची श श क
दिवसभराच्या दगदगी नंतर राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा.
आजची धुंद रात्र काही वेगळीच होती. हवेत रातराणीचा मदमत्त गंध पसरला होता.
चालता चालता राजेसाहेब फुललेल्या रातराणीच्या जाळीजवळ जरासे रेंगाळले.
कोपर्यावरच्या झुडूपामागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राजेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ".
झुडूपामागच्या बाकड्यावर एका युगूल दिसले. चेहरे ओळखीचे वाटले. प्रधानजी आणि राणीसाहेब.
क्षणभर तिघेही दचकले. राणीसाहेबानी चेहेर्यावर घुंगट ओढून घेतला.