क्रश (शतशब्दकथा)

किल्ली's picture
किल्ली in जनातलं, मनातलं
4 Feb 2019 - 6:52 pm

पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का..
सूचनांचे स्वागत आहे :)
--------------------------------------------------------------------------------------------
छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे.
जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती.

मनातले प्रेम व्यक्त करण्याची शक्ती दे म्हणून देवाला विनवण्याकरिता मंदिरात गेला असताना तीही तिकडेच येताना दिसली.
ती शूज काढत असताना त्याचे लक्ष तिच्या पायाच्या बोटांकडे गेले.

प्रेमभंग झालेला तो सवाष्ण मुलींनी सगळे सौभाग्यालंकार घातलेच पाहिजेत असे जिथे तिथे मत मांडत फिरू लागला.
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

4 Feb 2019 - 7:03 pm | जव्हेरगंज

=))

कडक!!

आनन्दा's picture

4 Feb 2019 - 7:31 pm | आनन्दा

:)

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2019 - 8:24 pm | टवाळ कार्टा

नाय कल्ला

उगा काहितरीच's picture

5 Feb 2019 - 6:58 am | उगा काहितरीच

जोडवे दिसले त्याला तिच्या पायात. रच्याकने छान आहे कथा ;-)

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2019 - 3:03 pm | मराठी कथालेखक

जोडवे फक्त विवाहित मुलीच घालतात का ? याबद्दल माहिती नसणार्‍या वाचकांना कथा कळावी ती कशी ?
मला वाटतं शशक म्हणजे कमी शब्दात मोठा आशय मांडण्याचा प्रयत्न. पण त्यामुळे महत्वाची माहिती गाळणे असा अर्थ घेतला जावू नये असे लेखकास सुचवावेसे वाटते.
"फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट" पासून "बेली शूज" पर्यंतचे लांबलचक वर्णन कमी करुन त्या ठिकाणी आवश्यक ती माहिती पुरवायला हवी होती.

टवाळ कार्टा's picture

5 Feb 2019 - 8:54 pm | टवाळ कार्टा

आयला....मलापण हेच वाटलेले पण मंगळसुत्र न घालणारी मुलगी कम स्त्री पायात जोडवी मात्र घालेल हे लॉजिक पटले नव्हते

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Feb 2019 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सूचक आणि मस्तं !

लोथार मथायस's picture

4 Feb 2019 - 9:23 pm | लोथार मथायस

+1

पलाश's picture

4 Feb 2019 - 9:25 pm | पलाश

मस्त!. :)

भीमराव's picture

4 Feb 2019 - 9:29 pm | भीमराव

+1

शित्रेउमेश's picture

5 Feb 2019 - 8:59 am | शित्रेउमेश

भारी

ज्योति अळवणी's picture

5 Feb 2019 - 9:19 am | ज्योति अळवणी

मस्त

खिलजि's picture

5 Feb 2019 - 2:47 pm | खिलजि

मस्त

किल्ली's picture

8 Feb 2019 - 12:03 pm | किल्ली

सर्व वाचक आणि प्रतिसाद्कर्त्यान्चे आभार!!

@ मराठी कथालेखक:
सूचनेबद्दल विशेष धन्यवाद, पुढील वेळी तुमचा सल्ला लक्षात ठेवीन :)