श.श.क. झडप

सत्य धर्म's picture
सत्य धर्म in जनातलं, मनातलं
18 Feb 2019 - 9:33 pm

मनात विचारांचे काहूर घेऊन ती रानातून वाट काढत वस्तीवरच्या घरी चालली होती.
महिना झाला तरी गण्या तीचा पिच्छा काही सोडत नव्हता, त्यामुळे घरातून बाहेर निघणं तिच्या जीवावर येत होतं.
एकुलती एक मुलगी शिकावी या बापाच्या एका इच्छेसाठी सर्व भीती वाऱ्यावर सोडून ती कॉलेजला जात होती.
आज गावात "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यक्रमासाठी तालुक्याची माणसे आली होती पुरा गाव तिथंच जमला होता. स्त्री चळवळीने जोर धरला होता. सरपंचाचे भाषण ऐकतच ती चालली होती.
बामनाच्या मळ्यापाशी दबा धरून बसलेला तो एका झडपेत समोर आला आनी तिला उसात घेऊन गेला " बेटी बचाओ बेटी पढाओ" च्या जयघोषात एक किंकाळी हवेत विरून गेली.

कथालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

19 Feb 2019 - 7:50 am | तुषार काळभोर

दुर्दैव, तिचं, तिच्या गावचं, देशाचं, आपलं.

या अशा प्रकरणांची दाहकता अजून पण आपल्या लक्षात येत नाहीये खरच दुर्दैव आपल्या देशाचे.

विनिता००२'s picture

19 Feb 2019 - 10:18 am | विनिता००२

झडपेत....झेपेत म्हणायचे का??

+१

सत्य धर्म's picture

19 Feb 2019 - 9:31 pm | सत्य धर्म

झडपच म्हणायच आहे.

विजुभाऊ's picture

19 Feb 2019 - 10:27 am | विजुभाऊ

झडप हाच शब्द योग्य आणि चपखल आहे.
वाघ सावजावर झडप घालतो

विनिता००२'s picture

19 Feb 2019 - 12:28 pm | विनिता००२

मग झडपेत समोर आला असे वाक्य बरोबर वाटत नाही.

झेपेत समोर आला आणि झडप टा़कून तिला घेवून गेला असे चालेल.

सत्य धर्म's picture

19 Feb 2019 - 9:32 pm | सत्य धर्म

निश्चितच लक्षात राहील.

सत्य धर्म's picture

19 Feb 2019 - 9:33 pm | सत्य धर्म

निश्चितच लक्षात राहील.

सत्य धर्म's picture

19 Feb 2019 - 9:33 pm | सत्य धर्म

निश्चितच लक्षात राहील.

कुमार१'s picture

19 Feb 2019 - 12:51 pm | कुमार१

छान !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2019 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

राजाभाउ's picture

19 Feb 2019 - 2:42 pm | राजाभाउ

+१