कथा

द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in जनातलं, मनातलं
6 Jan 2019 - 4:19 pm

The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe

हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍!

कथाभाषांतर

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १२

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
6 Jan 2019 - 10:55 am

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १२
( Decorate Your Love )
नववर्ष.. प्रेमाचा निरोप..

३१ डिसेंबर.. आजचा दिवस.. सारे जग आज एकवटणार.. नववर्षाच्या स्वागतासाठी.. गतवर्षाला निरोप देऊन..

तोही आज निरोपच देत होता.. तिला.. त्याच्या एकतर्फी प्रेमाला..

सारे जग आज गतवर्षातील कटू आठवणी विसरून नव्या आठवणीसाठी सज्ज होत होते..

पण त्याच्यासाठी तिच्या गतवर्षातील आठवणी ह्या गोड होत्या.. त्या तो कधीच विसरू शकत नव्हता..

पण आजचा दिवस मात्र गोड नव्हता.. कारण आज ती ऑफिस सोडून चालली होती..

कथालेख

आरंभशूर

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
2 Jan 2019 - 10:42 am

``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!``
``मग?``
``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``

मांडणीकथामुक्तकलेखअनुभवविरंगुळा

शवविच्छेदन...... भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Dec 2018 - 2:30 am

शवविच्छेदन...... भाग - १
शवविच्छेदन...... भाग - २

....ती दुपार अशीच गेली. संध्याकाळी पाटलांनी - त्या माणसाचे नाव रवि पाटील होते, त्या दोघांना हॉटेलमधे जंगी मेजवानी दिली. गंमत म्हणजे मद्यपान, जेवण झाल्यावर पाटलांनी डॉ. मानकाम्यांना हॉटेलचे बील चुकते करायला सांगितले. ते बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता. पाटील जवळजवळ झिंगले होते आणि डॉ. मानकामे बील भरायला लागल्यामुळे चडफडत दात ओठ खात होता.

कथाभाषांतर

प्रधान

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
26 Dec 2018 - 6:08 am

HR नावाचा जो काही प्रकार कोणत्याही कंपनीत असतो . त्याला डोकेदुखी सोडून दुसरं काही जमत नाही . म्हणजे , काही लोक असतात चांगले . शक्य तेवढी मदत करतात, माहिती देतात आणि पुढे काय होईल आणि काय नाही हे समजावून समोरच्याला शांत करतात. समोरचा कामगार .. (कामगार च कि . प्रोफाइल मध्ये जरी Senior Engineer असलं तरी शेवटी दिवसाच्या - आजकाल रात्र पाळीच्या रोजच्या हिशोबाने काम करणारे आम्ही कामगार ) का पेटलाय . आणि फक्त कंपनीचा फायदा न बघता त्याचाही कसा फायदा होईल हे सांगून देणारे काही दुर्मिळ प्राणी असतात काही कडे. आणि ते जिथे असतात तिथे कायम फायदाच दिसतो कंपनीचा . ..

कथालेख

३१ डिसेंबर (विज्ञान कथा)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
24 Dec 2018 - 6:26 pm

या वर्षीच्या (२०१८) "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा !!
(निमिष सोनार)

दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत -

"डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले.

कथाविरंगुळा