तात्या..
तात्या नगरकराला त्याच्या विक्षिप्तपणामुळे मित्र असे नव्हतेच जास्त..जे होते ते त्याच्याचसारखे आणी त्यांच्याशीही त्याचं जास्त जमायचं नाही.
बापाने दिलेल्या घरात त्याच्या सो कॉल्ड स्वकतृत्वावर त्याची आणी त्याच्या कुटुंबाची रोखठोक गुजराण होत होती .कधीही समाजात न मिसळणारा आणी सार्वजनिक कार्यात खुप जबरदस्तीमुळेच कधीतरी गुपचूप वावरणार्या तात्याला तिन गोष्टींची खुप आवड होती .
सकाळी पाच साडेपाचला उठुन व्यायामाचा घाम गाळणे,वेळ मिळेल तसे मिळेल त्याचे वाचन करणे आणी संध्याकाळी निवांतपणे एकांतात दारु ढोसणे .