तात्या..

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
16 Jul 2019 - 8:09 pm

तात्या नगरकराला त्याच्या विक्षिप्तपणामुळे मित्र असे नव्हतेच जास्त..जे होते ते त्याच्याचसारखे आणी त्यांच्याशीही त्याचं जास्त जमायचं नाही.

बापाने दिलेल्या घरात त्याच्या सो कॉल्ड स्वकतृत्वावर त्याची आणी त्याच्या कुटुंबाची रोखठोक गुजराण होत होती .कधीही समाजात न मिसळणारा आणी सार्वजनिक कार्यात खुप जबरदस्तीमुळेच कधीतरी गुपचूप वावरणार्या तात्याला तिन गोष्टींची खुप आवड होती .

सकाळी पाच साडेपाचला उठुन व्यायामाचा घाम गाळणे,वेळ मिळेल तसे मिळेल त्याचे वाचन करणे आणी संध्याकाळी निवांतपणे एकांतात दारु ढोसणे .

सकाळी तब्येत जपण्यासाठी व्यायाम करणारा तात्या बरेचदा संध्याकाळी त्यावर मोजकाच उतारा मात्र खुप आनंदाने घ्यायचा.

त्याच्या या सवयीवर ती सोडण्याचे त्याला खुप सल्ले मिळायचे.पण ऐकेल तो तात्या कुठला ?

तात्याचं एकच तत्व होतं."तुम्ही तुमच्या मनाशी जेवढं मोकळं बोलाल तेवढं तुम्ही दुसऱ्या कुणाशीही बोलु शकत नाही . आणी मनाशी मोकळेपणाने बोलण्यासाठी पहिलं मन तर मोकळं व्हायला हवं ना ?."

तात्या विक्षिप्तच होता .मी देखील प्रयत्न केला समजावयाचा.पण तात्याचं म्हणणं मलाही पटायचं.

*तात्या*

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

28 Jul 2019 - 11:27 pm | जालिम लोशन

व्यक्ती चित्रण, आॅटो बायोग्राफी, कथा की लिहीता लिहीता अर्धवट सोडल आहे?

सतिश गावडे's picture

28 Jul 2019 - 11:35 pm | सतिश गावडे

>> तुम्ही तुमच्या मनाशी जेवढं मोकळं बोलाल तेवढं तुम्ही दुसऱ्या कुणाशीही बोलु शकत नाही

बहुतेक तुम्ही हे लेखन बरेचसे मनातल्या मनात केलेलं दिसतंय. :)

माकडतोंड्या's picture

2 Aug 2019 - 4:29 pm | माकडतोंड्या

सुंदर लेखन ! नियमित लिहित चला !

सामंत काका आठवले

नावातकायआहे's picture

2 Aug 2019 - 6:02 pm | नावातकायआहे

पुढे ? ? ? ?

जॉनविक्क's picture

2 Aug 2019 - 6:06 pm | जॉनविक्क

बरेच दिवसांनी फार खोल जाणारे वाचाला भेटल्या, आजून येऊदे. सवितावहिनींवरही सविस्तर लिखाण येउद्या.