कथा

तरल भावनेचं चित्र : मासुम

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
22 Jun 2019 - 12:07 pm

'लकडी की काठी काठी काठी का घोडा' हे गाणं न ऐकलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. लहानपणी रविवारी रंगोली मध्ये कित्येक वेळा हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा त्यातलं त्यात उर्मिला मातोंडकर आणि 'घर से निकलते हि वाला' जुगल हंसराज होता इतकंच काय ते त्या गाण्याचं कौतुक होतं आणि विषय तिथेच संपत होता.

कथाआस्वाद

दोसतार - २२

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Jun 2019 - 6:53 am

मी सकाळ समजून बराच लवकर जागा झालो होतो. आणि रात्री तीन वाजता अंघोळ केली होती. आता यापुढे झोपणे शक्यच नव्हते. गजर होईपर्यंत तरी काहीतरी करुया म्हणून इंग्रजीचे पुस्तक काढले. सरांनी सांगितलेला धडा वाचून तरी पाहूया. काही समजलंच तर चांगलंच आहे. आणि आईने विचारलं काय करतो आहेस तर सांगता येईल की अभ्यास करतोय म्हणून. ती निदान सहल तरी रद्द करणार नाही. ते ऐकून.
पुस्तक उघडले आणि वाचू लागलो.
"वन्स अपॉन अ टाईम. देअर लिव्हड अ किंग,......"

कथाविरंगुळा

एका बापाचा जन्म

चंद्र.शेखर's picture
चंद्र.शेखर in जनातलं, मनातलं
15 Jun 2019 - 9:25 pm

(मिपा आयडी घेतल्यावर प्रथमच लिखाण पोस्ट करतोय. लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे, सुचना/मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच उपयोगी ठरेल)

“मने, काय पसारा केलायसं एवढा ?” ऑफिस मधून घरी आल्या आल्या फरशीवर पडलेली खेळणी, चित्रकलेचे पेपर, रंग आणि कागदाचे असंख्य कपटे बघून नेहमीप्रमाणे माझा पारा चढला. मनू मला दाखवण्यासाठी म्हणून तिने चितारलेलं चित्र घेवून माझ्याकडे येत होती, ती माझा चेहरा बघून तिथेच थबकली. चेहरा पडला तिचा, मग मी सुद्धा ओशाळलो अनं जवळ घेतलं तिला. तिचं चित्र पहायला घेतलं खरं पण चित्रात दिसू लागला तो माझा भुतकाळ.

कथालेख

दोसतार - २१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 Jun 2019 - 5:56 pm

मागील दुवा http://misalpav.com/node/44307

मी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्‍याकडेच जास्त लक्ष्य होते.
सोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्‍यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.

कथाविरंगुळा

धूपगंध (५)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
9 Jun 2019 - 11:11 am

मागील दुवा https://misalpav.com/node/44648

डोळ्यातल्या पाण्यामुळे आबांना समोरचे धूसर दिसू लागले. समोरचे काही आता पहायचे नव्हतेच मुळी. त्याची गरजही नव्हती. डोळ्यासमोर वेगळेच जग होते. ते जग पहायला या जगातली दृष्टी गरजेची नव्हती.
आठवणी अशा एकट्या कधीच येत नाहीत. एक आली की तीचा पदर धरून दुसरी येतेच.

कथाविरंगुळा

'तेरी केहॆके लुंगा'

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
8 Jun 2019 - 4:46 pm

अन्वीता.. अन्वीता..अन्वीता '' हा बोलो वरुण''
अन्वीता आप मुझे बोहोत अच्छी लगती हो. ''अच्छे तो सभी होते है"बोलून ही चालायला लागली. परत दुसऱ्या दिवशी तेच मी वर्क शॉप मधून पळत बाहेर आणि ही मला टाळायला. आता मी मनावर घेतले होते. इज्जतीचा सवाल होता.
अन्वीता झारखंड ची. ती आणि तिची एक खास मैत्रीण सोमाणी दिल्ली ची कॅम्पस मधल्या सर्वात सुंदर मुली.पण आय टी ला होत्या दोघी.

कथाप्रकटन

धूपगंध ( ४)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
8 Jun 2019 - 9:23 am

मागील दुवा https://misalpav.com/node/44537

भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.

कथाप्रतिभा

माझा निबंध

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
24 May 2019 - 8:28 pm

प्रेरणा: जी. ए. कुलकर्णी यांची एक गोष्ट, बहुदा माझीही मोट असे काही तरी नाव असावे. एक शहरात राहणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या मुलाला शाळेत निबंध लिहावा लागतो तोही त्याने न अनुभवलेल्या जीवनासंबंधी.

कथालेख