.

'तेरी केहॆके लुंगा'

Primary tabs

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
8 Jun 2019 - 4:46 pm

अन्वीता.. अन्वीता..अन्वीता '' हा बोलो वरुण''
अन्वीता आप मुझे बोहोत अच्छी लगती हो. ''अच्छे तो सभी होते है"बोलून ही चालायला लागली. परत दुसऱ्या दिवशी तेच मी वर्क शॉप मधून पळत बाहेर आणि ही मला टाळायला. आता मी मनावर घेतले होते. इज्जतीचा सवाल होता.
अन्वीता झारखंड ची. ती आणि तिची एक खास मैत्रीण सोमाणी दिल्ली ची कॅम्पस मधल्या सर्वात सुंदर मुली.पण आय टी ला होत्या दोघी.
सोमाणी ला आसनसोल च्या एका व्यापारी घरातील मुलाने पटवले होते. अन्वीता मला आवडायची . अन्वीता कुमारी नावातच प्रेम होते. .. त्यात प्रथम आणि द्वितीय वर्षाचा मी अध्यक्ष ( प्रेसिडेंट) मुलांचा सपोर्ट खूप . तृतीय वर्षा आधी जी एस बनता येत नाही. काही कमिट्या वैगरे माझ्या हातात. आता हसू होऊन द्यायचे नव्हते माझे मला.
पुढच्या दिवशी सुट्टी होती. शंकरपूर बीच ला जाऊन बसलो मी दारू पित आणि काही मित्र ड्रग्स पित. मच्छी वैगरे खाऊन झाली. एका मित्राने एक प्लॅन सुचवला. तडक खरगपूर ला जाऊन अंगठी घेतली. एका आर्टिस्ट कडून अन्वीता चे चित्र काढून घेतले . मोबाईल मधील फोटो दाखवून. आणि रूम वर आलो. दुसऱ्या दिवशी ऑडिटोरियम ला लेथ मशीन संकल्पना शिकवत होते.कोणीतरी कानात सांगितले मुन्नाभाई भाभीजी का लेक्चर खतम हो गया है. पळत पळत रूम वर गेलो . चित्राची फ्रेम , अंगठी घेऊन ही लेडीज हॉस्टेल गाठायच्या आत मी तिला गाठले.
नाटकी पणाने अंगठी दिली खूप हसायला लागली "वरुण यार तुम महाराष्ट्र के मै रांची की कैसे कुछ होगा उपरसे बडे भैय्या थर्ड इयर मै" मी म्हटलं होईल सगळं नीट . तू टेंशन घेऊ नको. माझ्या घरचे पण बघतील ते लिबरल आहेत. "क्या मराठी मै बोलते जाते हो कुछ समजता नही 'तेरी भाषा' ". आता विचारात असल्यावर मातृभाषा च सर्वात जवळची असते हे काय कळणार हिला असो. हसलो फक्त.
मग खूप फिरलो . छान दिवस जात होते. बाईक किंवा जीप ने रोज फिरायचे. लेक्चर, तिच्या वेळा, क्लास , रात्रभर अभ्यास करताना 24 *7 ज्यूस वाल्याकडे मधेच उतरणे . एकंदरीत मस्त दिवस. सुट्टी दिवशी कोलकाता. अर्धा वेळ कपडे पाहण्यातच जायचा हीचा . मी आपला पुस्तक दुकानात वेळ घालवायचो. कोलकाता च्या हवेत पण प्रेम आणि काव्य आहे सध्या बकाल झालंय ते सोडा. असाच एका विकेंड नंतर कोलकाता वरून परत येत होतो खूप फोन वाजत होते . जीप मध्ये ही होती आणि रात्र पण झालेली म्हटलं असतील मित्रांचे बसले असतील कुठेतरी जाऊन हिला सोडू मग बघू.
पोचलो. मित्र पळत आले मुन्ना पुरा हॉस्टेल तुझे धुंड राहा. 414 रूम पे बुलाया है. कोई बडा आदमी आया है. मी मनात म्हटले च्यायला फेस्ट ला स्पॉन्सर करणारे तर खाली ऑफिसात थांबतात. कोण असेल हा डोक्यात विचार 10 एक जणांना सोबत घेऊन गेलो.दरवाजा वाजवला. " वरुण मोहिते कौन है?" वो ही अंदर आयेगा बाकी सब बहार. नाही म्हटले तरी जरा टरकली. आत गेलो तिथे योगेश नावाचा बाहुबली बसलेला. सोबत तगडे बॉडी गार्ड. अतिशय प्रेमाने विचारपूस केली. महाराष्ट्र कैसा मस्त है वैगरे बोलला. साहेब पुण्यात शिकलेले. मग बोलला " देखो बेटे अन्वीता मेरी बेहेन जैसी है . क्यू ऐसा करते हो ? हे करते हो बोलताना माझा गाल अगदी ओढून प्रेमात बोलल्यासारखं. उसकी शादी उसके पिताजी ने तय की है. तू पढ अच्छा कर घरपे माँ को खुश रख.. झमेले मै मत गिर. जी एस बन मै करता सपोर्ट " इत्यादी इत्यादी .
वेळा पाहून बोलायचं असतं त्यामुळे मी हो ला हो केलं . मिठी मारून आशीर्वाद घेऊन निघालो. ते तडक धाब्यावर तिकडे सगळ्या मित्रांना ही कथा सांगितली संमिश्र प्रतिसाद होते. लग्न ठरलं हे मला खोटं आहे माहीत होते पण तरी काही म्हणाले जाऊ दे ना काही म्हणाले मागे नाही हटायचे.. शेवटी पिऊन पिऊन मुन्ना जहाँ हम सब वहा ह्यावर एकवाक्यता झाली. जेवण आटोपली जाऊन अभ्यासाला बसायचे होते. त्यात मला लायब्ररी च लागायची अभ्यासाला. एक जण रुम वरचा गांजा प्यायचा सारखा वाचताना मग तो वास सहन नाही व्हायचा. निघालो तितक्यात हिचे बडे भैय्या उर्फ चंदन कुमार ह्यांचा प्रवेश झाला हॉटेलात. नेमकी गाठभेट. मी सक्त ताकीद आधीच दिली असताना 2-4 जण नशेत भाभी को नामशकार बोलना भैय्या असे बोललेच. चंदन ने माझ्याकडे पाहिले हसला आणि जा पढ अच्छे नंबर ला. इतकेच बोलला मी मान डोलावली आणि निघालो.वाटेत मित्रांना ओरडलो पण की आता काही दिवस शांत बसा.
त्या रात्री लायब्ररी मधून सकाळी 5 ला निघालो आणि बाहेरच मित्राच्या रूम वर झोपायला गेलो . कॅम्पस पलीकडे. मोबाईल चेक केला हिचा सॉरी इतकाच मेसेज होता. म्हटलं काल बद्दल असावा. मी इतका थकलोलो की रिप्लाय पण नाही केला . झोपलो लगेच. तितक्यात 6.30 आसपास जोरजोरात एक मित्र उठवायला आला . मुन्ना अन्वीता मेन गेट पे कबसे खडी है तुझे बुला रही है. कबसे उठा राहा तुझे. मी झटपट उठलो . फ्रेश होऊन निघालो .
इतक्या सकाळी हिचे काय काम असेल विचार करत चालत होतो . दिसली ती मी हसलो .अरे क्या यार निंद खराब कर दी. "वरुण सून ना एक काम था चलो ना चलते चलते बात करते" चालायला लागलो आम्ही तितक्यात 15 ते 20 जण पुढून आणि 5-7 जण मागून आले . मला घेराव घातला. ही बाजूला गेली. त्यांचा मुख्य घेराव घालणार्यांपैकी हीचा भाऊ होता चंदन. मग मला सॉरी मेसेज चा अर्थ कळला तोपर्यंत मला पूर्ण मारून काढले होते. मोठमोठ्याने ओरडत होतो मी.शर्ट फाटलेला, रक्त बंबाळ , सुजलेला चेहरा, पायाला फ्रॅक्चर . असा अर्ध्या तासानंतर मी हॉस्पिटलमध्ये होतो. मग चालू झाली आय आय टी ची रक्तरंजित कहाणी...
(क्रमशः)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

उपेक्षित's picture

8 Jun 2019 - 5:04 pm | उपेक्षित

बाब्बो शिणेमा बघतुय अस वाटायलय

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2019 - 5:17 pm | टवाळ कार्टा

बाझव्..... फुल्ल बालीवूड फिल्लंम
और आंदो

पद्मावति's picture

8 Jun 2019 - 5:18 pm | पद्मावति

बापरे...मस्तंच.
पु.भा.प्र.

जॉनविक्क's picture

8 Jun 2019 - 5:21 pm | जॉनविक्क

पुढचा chapter उद्याच टाका.

नावातकायआहे's picture

8 Jun 2019 - 5:44 pm | नावातकायआहे

पु भा प्र

पैलवान's picture

8 Jun 2019 - 6:03 pm | पैलवान

वरूणभौ. कम्प्लिट करायचं बरंका!

आनन्दा's picture

8 Jun 2019 - 6:05 pm | आनन्दा

+1

खतरनाक. लवकर येऊ द्या पुढचे भाग.

दुर्गविहारी's picture

8 Jun 2019 - 8:13 pm | दुर्गविहारी

आत्ता किस्से यायला सुरवात झाली आहे. थांबवू नका लिखाण. बरेच काही वाचायचे आहे. ;-)

ज्योति अळवणी's picture

8 Jun 2019 - 8:21 pm | ज्योति अळवणी

झक्कास सुरवात. लवकर येऊ द्या पुढचा भाग

नाखु's picture

8 Jun 2019 - 9:03 pm | नाखु

प्रचंड धाडसाचे आणि कल्पनातीत आहे.
काल्पनिक असेल तर आपल्या कल्पनाशक्तीला आणि तपशीलवार वर्णन याला सलाम.

चाकोरीबद्ध आयुष्य असलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

गवि's picture

8 Jun 2019 - 9:06 pm | गवि

बसवला टेंपोत..

पुभाप्र..

पैलवान's picture

8 Jun 2019 - 10:51 pm | पैलवान

लेख वाचताना, विशेषतः शेवटी , 'बसवला टेम्पोत'चं ओरिजिनल व्हर्जन तोंडात आलंच होतं, फक्त टंकायचं टाळलं. :)

मित्रहो's picture

8 Jun 2019 - 9:07 pm | मित्रहो

मस्त सुरुवात झाली आहे.

बराच वेळ विचार करत होतो हे कुठ वाचलय / ऐकलय " तेरी कह के लूंगा "

शेवटी आठवले गैंग्स ऑफ वासेपुर

पण बाकी सुरवात छान झाली !!!

जालिम लोशन's picture

8 Jun 2019 - 10:20 pm | जालिम लोशन

+१

गामा पैलवान's picture

9 Jun 2019 - 12:43 am | गामा पैलवान

मानाचा मुजरा, मालक! हे सगळं करून वर अभ्याससुद्धा करायचा ! धन्य आहे.
आ.न.,
-गा.पै.

लई भारी's picture

9 Jun 2019 - 8:55 am | लई भारी

खतरनाक अनुभव आहेत राव!
_/\_

मदनबाण's picture

9 Jun 2019 - 9:42 am | मदनबाण

जबरा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi

एमी's picture

9 Jun 2019 - 10:47 am | एमी

बशिवला टेम्पोत!

काल्पनिक आहे कि सत्यकथा?

वरुण मोहिते's picture

9 Jun 2019 - 10:05 pm | वरुण मोहिते

आहे हो

कारण लेखन तर वास्तव वाटले होतेच पण एव्हढ्यात हा प्रतिसाद वाचून उगा शंका तयार झाली होती :)

एमी's picture

10 Jun 2019 - 9:43 am | एमी

सुपर कूल :D :D
पु भा येऊद्या पटकन!

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 12:16 pm | टर्मीनेटर

जोरदार सुरुवात! मस्त, पुढचे भाग लवकर येउद्यात...

उस हरामी को मिटाना है हमें! गोली नही मारेंगे, केह्के लेंगे उसकी.

इति- सरदार खान :)

पाषाणभेद's picture

9 Jun 2019 - 1:13 pm | पाषाणभेद

मुन्नाभाय जहाँ हम वहा.
बोलो भाय क्या करनेका? किसको फोडनेका?
साले सब एकदम आयेले थे. एक एक करके आना मंगता था.
भाय बोले तो अपुनके सानपाडाकी गँग लेके जाने का क्या? साला उस बिहारीको ठोकते है.
बोले तो आख्खा मुंबई खरगपूर लेके जाते है जीप मे बिठाके.

बोलो भाय, जल्दी बोलो. क्रमश: नही अब्बी के अब्बी बोलो.

वडाप's picture

10 Jun 2019 - 9:20 am | वडाप

टेम्पो हुबा हाय.

जब्राट लिवलंय , खरं असलं तर सैराट पार्ट २ म्हणायला हरकत नाही ...

नि३सोलपुरकर's picture

11 Jun 2019 - 2:37 pm | नि३सोलपुरकर

" सत्यकथा" .
बाझवला.... भेन्चो , खतरनाक और आंदो

चाणक्य's picture

11 Jun 2019 - 4:32 pm | चाणक्य

पुभाटा लवकर

नावातकायआहे's picture

11 Jun 2019 - 6:56 pm | नावातकायआहे

पु भा प्र

शीर्षकाचा बोली भाषेतील अर्थ कोणी विशद करून सांगेल का?

बोलावे तैसे चालावे त्याची वंदावी पाऊले

जॉनविक्क's picture

12 Jun 2019 - 5:58 pm | जॉनविक्क

तुझी, सांगून/बोलून, घेणार.

धर्मराजमुटके's picture

14 Jun 2019 - 6:56 pm | धर्मराजमुटके

म्हणजे ? काय घेणार ?

जॉनविक्क's picture

14 Jun 2019 - 7:07 pm | जॉनविक्क

.

धर्मराजमुटके's picture

14 Jun 2019 - 7:35 pm | धर्मराजमुटके

म्हणजे मुळ लेखाचं शिर्षक "तेरी फिरकी कहके लुंगा " असे आहे तर ! फक्त "फिरकी" हा शब्द सायलेंट आहे. समजले. धन्यवाद !

जॉनविक्क's picture

14 Jun 2019 - 7:51 pm | जॉनविक्क

म्हणजे ? काय घेणार ? असे विचारून आपण माझीच फिरकी घेताय की असे मला म्हणायचे होते.

लेखकाला काय म्हणायचे आहे हे सांगायचा मला कुठे अधिकार म्हणून मी आपलं फक्त अनुवाद नोंदवला.

भीडस्त's picture

12 Jun 2019 - 6:39 pm | भीडस्त

पुढचा भाग लवकर येउद्यात

नाही तर बदडून काढणार बघा तुम्हाला

योगी९००'s picture

12 Jun 2019 - 6:50 pm | योगी९००

मस्त...पुढचा भाग लवकर येउद्यात.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Jun 2019 - 7:11 pm | हणमंतअण्णा शंकर...

दोस्ता, दोन वाक्यांत पूर्णविराम द्यायला काय जातंय?
घटनाच एवढ्या फास्ट होत्या बहुतेक. दाट लघवीला लागलेल्या अवस्थेत लिहायची सवय वाईट.

वरुण मोहिते's picture

12 Jun 2019 - 7:32 pm | वरुण मोहिते

का प्रतिसाद द्यायला ? ही फालतू भाषा दुसरीकडे वापर. कामाला येईल

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

12 Jun 2019 - 10:36 pm | हणमंतअण्णा शंकर...

मला प्रतिसाद द्यायला आमंत्रणाची गरज नाही.
असो, पुढील लेखनास शुभेच्छा.
आणि,
मिसळपाव आणि आयआयटी खरगपूरची बीचवर जाऊन ड्रग्ज पिणारी मुलं (किंवा पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणारे मुन्ने) या दोघांच्याही भाषिक भविष्याचं यथोचित भलं व्हावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना वैगरे!

देशपांडेमामा's picture

14 Jun 2019 - 2:39 pm | देशपांडेमामा

तुम्ही लिहीत रहा हो. आम्ही वाट बघतोय

देश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2019 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त लिहिलय. वाचतोय.

-दिलीप बिरुटे