कविता

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
10 Dec 2020 - 5:58 pm

मनमोहन कृष्ण येतो स्वप्नी
मधुर पावा मनात गुंजतो.
होते मी हि राधा वेडी.
अंगणी चाफा डोलू लागतो !!
चाफ्याच्या मधूर सुगंध लहरी ,
दरवळती दूर दूर रानी वनी
गंधाने त्या वेडा होऊन
कृष्ण येतो माझ्या स्वप्नी...!!
चाफा माझा सोनसळी
सुगंध अनुपम जगात ,
जीवा शिवाची भेट घडवतो,
राधा कृष्णाच्या रूपात !!
-वृंदा

कविता

सामान्य माणूस....

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
10 Dec 2020 - 11:11 am

सामान्य माणूस...

वर्गात लोकं म्हणती स्कॉलर,
जपतो आमची स्वच्छ कॉलर,
सहसा नशिबी नसतात डॉलर,
खिशात फक्त ओंजळभर चिल्लर...

रांगोळीत आमच्या सजते,
आकांक्षांची नक्षी,
स्वप्नांच्या झाडावर रोज,
नव्या इच्छांचे पक्षी...

मनातल्या नकाशावर,
आयुष्याची रूपरेखा,
वाळूत काढतो रेषा,
ते आम्ही पांढरपेशा...

सुख दुःखाच्या प्रसंगी,
आम्हा सोडत नाही चिंता,
डोळ्यासमोर सतत फिरतो,
महागाईचा वरवंटा..

कोणतीही असो दशा,
आम्ही सोडत नाही दिशा,
कर्तृत्वाला झळाळी देते,
आमच्या मनातली आशा..

कविता

अक्षयपात्र

अमलताश_'s picture
अमलताश_ in जनातलं, मनातलं
10 Dec 2020 - 11:00 am

स्वतःशी कणभर असताना
दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते
तेव्हा तो भेटतो.
कणभराने तृप्त होतो.
अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं .
खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा
आटत नाही.
लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो
विझतच नाही.
अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा
कृष्णसखाच लागतो.
कृष्णसखा भेटतो.
फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची
द्रौपदी व्हावं लागतं .

कविताप्रकटन

शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

जानु's picture
जानु in राजकारण
9 Dec 2020 - 10:43 pm

सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.

हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM भाग २

मालविका's picture
मालविका in भटकंती
9 Dec 2020 - 9:38 pm

२८ तारीख उजाडली. सकाळी सगळ्यांनी आपल्या आपल्या सायकली आणून आमच्याकडे लावून ठेवल्या. १० वाजता गाडी घेऊन बाबा आले. सायकल चढवून बांधून गाडी पुढे गेली. मागून आम्ही ५ जण एका गाडीत बसून निघालो. वाटेत शैलेश पेठे भेटला. खेड तालुक्यातून तो आणि पाटणे अशा दोघांनी नाव नोंदवलं होत. मग त्यालादेखील बरोबर घेऊन प्रवास सुरु झाला. चहा, वडापाव ब्रेक घेत सावंतवाडी गाठली . सायकल उतरवून चेक करून घेतल्या. थोडंफार ग्रीसिंग वगैरे करून सायकल तयार झाल्या. स्पर्धेचा आयोजक पुष्कर कशाळीकर हा देखील तिथे आला होता. त्याच्याशी ओळख झाली. थोडीफार आणखी माहिती झाली. रात्री जेवून सगळे झोपलो. सकाळी ५.

पुस्तक परिचय अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 2:35 pm

अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -

1

समापन

धोरणमांडणीविचारप्रतिसादसमीक्षा

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 2:19 pm

हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....

धोरणनृत्यसंगीतवाङ्मयबालगीतविडंबनगझलउखाणेवाक्प्रचारव्युत्पत्तीसुभाषितेविनोदआईस्क्रीमउपहाराचे पदार्थकैरीचे पदार्थग्रेव्हीपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमायक्रोवेव्हराहती जागावन डिश मीलशेतीसिंधी पाककृतीफलज्योतिषशिक्षणछायाचित्रणस्थिरचित्रप्रतिक्रियाविरंगुळा

पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 1:41 pm

भाग 3 आग्रऱ्याहून सुटका

1
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९

शिवाजी महाराज कसे निसटले ?

धोरणमांडणीप्रकटनप्रतिसादसमीक्षा

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 1:34 pm

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका

1

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र

नव्या प्रमेयाप्रमाणे -

मांडणीप्रतिसादसमीक्षा

पुस्तक परिचय भाग १ - आग्रऱ्याहून सुटका - जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 1:28 pm

शिवरायांचा आठवावा प्रताप !

शिवाजी रायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित आग्रऱ्याहून सुटका - पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.

1

मांडणीप्रकटनप्रतिक्रियासमीक्षा