डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ]
हेल्लो फूल्स...
हेल्लो फूल्स...
लाॅकडाउनमध्ये लागलेल्या छंदाने आता थोडं बाळसं धरलंय म्हणायला हरकत नाही. काही लेख आणि थोड्याफार कविता एवढी मोजकीच शिदोरी गाठीशी असताना असं म्हणणं धाडसाचंच आहे, पण मूळ मुद्दा हा की नाविन्याची ओढ बऱ्याचदा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहावेसे वाटले. (नाही, मी बाळबोध, बऱ्या, थोड्या अधिक बऱ्या कवितांबद्दल नाही सांगत, तशाही त्या आपसूकच झाल्या असतील.) अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, मुक्तछंदातील कविता, सवालजवाब, अगदी गझलेचंही तंत्र शिकून त्याही रचून झाल्या. निसर्ग, प्रेम, विरह, जीवनविषय, सामाजिक आशयही यासारखे विविध विषयही हाताळून झाले. मग हायकूकडे वळावंसं वाटलं.
काही वर्षापुर्वी मिसळपाव.कॉमवर गोव्याचा इतिहासाची सविस्तर माहिती देणारी नितांत सुंदर मालिका टिम गोवा या आय.डी.ने लिहीली होती.त्याच्या सर्व भागांची एकत्रित लिंक खाली दिलेली आहे.
आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा
या मालिकेत भाग ५ मध्ये शिवकाल आणि मराठेशाहीविषयी माहिती लिहीली आहे.त्याची लिंक खाली दिलेली आहे.
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
जावळी परिसरातील किल्ले या मालिकेतील हा अखेरचा धागा.
पोलदपूरहून खेड - चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटातून गोवा, रत्नागिरीकडे जाणार्या गाड्या रात्रंदिवस धावत असतात.पण या वर्दळीवर एक प्राचीन गड नजर रोखून बसला आहे, हे कोणाच्या गावीही नसते.
जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते.
कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले.
मजसी भेटवा....
कुणी असो सोवळा,
कुणी तो बावळा,
विठ्ठल सावळा,
सर्वांना प्रिय..
कृपेची साऊली,
उभी असे राऊळी,
ती विठू माऊली,
सर्वांना प्रिय..
क्षण जाई वाया,
निरवी "तो" माया,
ऐसा विठुराया,
सर्वांना प्रिय..
वाजवू मृदुंग,
गाउनी अभंग,
मनी पांडुरंग,
सर्वांना प्रिय..
मकरकुंडलांचा साज,
डोळाभर पाहू आज,
उभा केशीराज,
सर्वांना प्रिय..
धरूनिया हात,
करी जो सनाथ,
असा पंढरीनाथ,
सर्वांना प्रिय..
"काय हो मास्तर, जर ११ वी १२ वी पालकांवर चित्रपट काढायचा ठरला तर नाव काय द्याल" रामदास विचारते झाले.
मुकी बिचारी कुणी हाका किंवा lambs for slaughter
आणि हो त्यात l s capital मध्ये लिहायचे नाही.
.............
"प्रभू सर मी अबक बोलतोय. रामदासांनी तुमचा नंबर दिला"
बोला.
"एक अडचण होती. माझ्या मुलीच्या बाबतीत मला तुमची मदत पाहिजे"
इथे कनेक्शन तुटले. मी नंबर लावला पण स्विच ऑफ येऊ लागला. डोक्यात काहूर उठले. मनातल्या मनात "ते" नसले तर मिळवली म्हणून गप्प राहिलो. अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला.
"माझ्या मुलीला ९४ टक्के मिळाले आहेत दहावीला"
आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख मिपाकरांसाठी
----------------------------------------------------------
सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे.
लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार
कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार
संगीत - जेम्स वसंतन्
हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते.
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
सायबीन सवंगाचं काम
बिलकुल नाही पडलं
चकरभुंग्यापायी पीक
खुमसूखुमसू रडलं
घरी धन आणासाठी
करु का रे गांजा-तस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
औंदाच्या पावसापायी
भलतंच ईपरीत घडलं
कापसाचं अख्खं बोंड
बुडापासून सडलं
आता काय तुह्याच घरी
म्या करावी का चोरी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई!
यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो.