"काय हो मास्तर, जर ११ वी १२ वी पालकांवर चित्रपट काढायचा ठरला तर नाव काय द्याल" रामदास विचारते झाले.
मुकी बिचारी कुणी हाका किंवा lambs for slaughter
आणि हो त्यात l s capital मध्ये लिहायचे नाही.
.............
"प्रभू सर मी अबक बोलतोय. रामदासांनी तुमचा नंबर दिला"
बोला.
"एक अडचण होती. माझ्या मुलीच्या बाबतीत मला तुमची मदत पाहिजे"
इथे कनेक्शन तुटले. मी नंबर लावला पण स्विच ऑफ येऊ लागला. डोक्यात काहूर उठले. मनातल्या मनात "ते" नसले तर मिळवली म्हणून गप्प राहिलो. अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला.
"माझ्या मुलीला ९४ टक्के मिळाले आहेत दहावीला"
अभिनंदन. माझ्याकडून काय मदत हवी. सायन्स मध्ये टाकणार आहात का?
"तुम्ही कसे ओळखले"?
आता सायन्स म्हटले की कुठली ना कुठली तरी मदत लागतेच.
"मुलीला abc क्लास मध्ये एडमिशन हवी आहे. कसा आहे तो क्लास?"
सर्व क्लास एकच. ह्या एक विषयात मला खेचू नका. काय मदत हवी ते सांगा. फी कमी करून पाहिजे का?
"हो"
किती कमी करून पाहिजे?
"पंचवीस हजार"
हम्म
"जे काही कमी होतील तेवढे"
कुठली ब्रांच?
"क ख ग किंवा य र ल दोन्हीपैकी कुठेही"
एका तासाने फोन करा, बघतो काय होऊ शकते ते.
.......
बरोबर एक तासाने फोन आला
"काय सर काही होईल का, जरा आर्थिक अडचण आहे."
एक काम करा. तुम्ही य र ल मध्ये जा. माझ्या नावाचा अजिबात उल्लेख करू नका.
"मग कसे काय जमणार, रामदास म्हणाले होते..."
शांत व्हा, माझे नाव न सांगता तुमचे काम होईल ह्याची व्यवस्था केली आहे. फक्त मी सांगितलेली चार वाक्ये बोला. त्या बाहेर काहीही बोलू नका.
"चालेल"
काम झाल्यावर लगेच तिथून फोन करू नका. चेहेरा निर्विकार ठेवा. जे मिळणार तो तुमचा हक्क आहे.
....
दोन तासांनी फोन आला.
"अहो सर ७५००० ने कमी झाली फी. विश्वास बसत नाही आहे. आणि १५ महिन्याची मुदत सुद्धा मिळाली. तुमचे फार मोठे उपकार झाले."
ठीक ठीक. मुलीला फोन वर माझ्याशी बोलायला लावा. त्या क्लास चा व्यवस्थित उपयोग कसा करायचा ते मार्गदर्शन करिन.
आणि चांगले मार्क मिळाले तर इंजिनियरिंग मध्ये ४ वर्ष वर्षाला ९००००/- स्कॉलरशिप मिळवून देईन.
"हे कसे शक्य आहे"?
ते माझ्यावर सोडा
"सर तुमची फी किती"
तुम्ही मालवण चे ना?
"हो"
जल्ला तुमचा त्वांड,मोडला तुमचा ......
माझी फी कसली देताय मेल्यानो, उद्या कोना परीस असाच उबा राय मंजे झाला
प्रतिक्रिया
25 Nov 2020 - 12:30 pm | महासंग्राम
मस्तच
पुलेशु
25 Nov 2020 - 1:42 pm | रंगीला रतन
लै भारी
25 Nov 2020 - 11:41 pm | सौंदाळा
मास्तर लेख मस्तच.
त्या मुलीला शुभेच्छा.
रच्याकने - सध्याचे मास्तरांचे लेख क्रिप्टिक वाटत नाहीत.