२. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स !
एकतर तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता किंवा सिद्ध ! जगात यापरता तिसरा पर्याय नाही. इन फॅक्ट, जर तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नसाल तर स्वतःला व्यक्ती मानण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यत्र-तत्र-सर्वत्र सिद्धत्वंच सारे विश्व व्यापून आहे त्यामुळे इथे बाय-डिफॉल्ट, प्रत्येक जण सिद्धच आहे पण एखादं-दुसराच स्वतःच्या सिद्धत्वाची घोषणा करतो हा जगातला सर्वात मोठा विस्मय आहे.