मी आणि माझा न्यूनगंड

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
26 Nov 2020 - 10:17 pm

जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते.

कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले.

माझे आयुष्य नेमके किती असेल, मी आयुष्यात काय मिळवले पाहिजे हा पहिला प्रश्न.. आजूबाजूला बघता बघता हे लक्षात आले के आयुष्य फारच क्षणभंगुर आहे, कोणत्याही क्षणी तुमचा ग्रंथ आटोपु शकतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला न्यूनगंड.. माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही.

मग पुढे काय? मला तर माझ्या कंफोर्ट झोन मध्ये राहायचे आहे.
मग मी काय केले पाहिजे?
अश्या वेळेस बुद्ध मदतीला आला. तो म्हणतो जगातल्या सगळ्या समस्यांचे मूळ अपेक्षांमध्ये आहे. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला मान सन्मान, गाडी बायको मुले मिळाली पाहिजेत, नव्हे तर माझ्या मनाप्रमाणे मिळाली पाहिजेत. जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षाभंग आहे आणि मग दुःख आहे किंवा कंफोर्ट झोन मधून बाहेर पडणे आहे.

मग याला पर्याय काय? अपेक्षा नसतील तर मग काम होणार कसे? वासना नसतील तर जग चालणार कसे? मग गीता आली सांगायला -

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन
मा कर्मफल हेतुर्भु मा ते संगोस्तु अकर्मणि

मा ते संगोस्तु अकर्मणि, म्हणजे मला हवे ते फळ मिळणार नसेल तर मग मी कार्य करायचेच नाही का? नाही, जगायचे असेल तर कर्म झालेच पाहिजे , पण ते ग्रेटर गुड साठी करा. तसं हे झिरपायला कठीण आहे , किंबहुना गीतेतील काही श्लोक जर नुसते एकेकटे अभ्यासले तरी संपूर्ण ज्ञान होईल. पण अर्थात मला काही ते ज्ञान झाले नाही, आणि सुरू झाला अकर्मकडे एक प्रवास. काही वेळा मी जिंकतो, काही वेळा अकर्म जिंकते. काही वेळा गीता जिंकते, काही वेळा अहंकार जिंकतो. काग येतो एक न्यूनगंड.

कारण तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही..

पुढचा टप्पा येतो तो वेगळेच प्रश्न घेऊन येतो. गीता म्हणते,

समम् पश्यन हि सर्वत्र, समवस्थितमीश्वरम
न हिनस्ति आत्मना आत्मानं ततो याति परां गतिम
म्हणजे जो सर्वत्र सम बुद्धीने पाहतो, किंवा सर्वत्र ईश्वरच पाहतो, तो कधीच स्वतःचा स्वतःच घात करत नाही, आणि तो मुक्त होतो..
आता स्वतःच स्वतःचा घात म्हणजे काय? मी कॉलेजला असताना रॅगिंग ला घाबरत असे, एक दिवस विचार आला, रॅगिंग करणारी मुले म्हणजे देखील मीच, आणि रॅगिंग होणारा म्हणजे देखील मीच, मग कोणी कोणाला घाबरायचे? झालं माझी भीती पळाली..

म्हणजे असे मला वाटले.. जेव्हा रॅगिंग व्हायची वेळ आली तेव्हा मात्र मी गजो मिथ्याचा आधार घेऊन घाबरलो होतो.. पण त्यातून हे कळलं की केवळ पुस्तकी पांडित्य उपयोगाचं नाही.
परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.

सत्याचा एव्हढा मोठा डोंगर चढायचा, आणि वाटेतले सगळे मोह टाळायचे म्हणजे तितके सोपे काम नाही, रोज काहीतरी मोह समोर येतो आणि तो जाणवून देतो की बाबारे अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अहंकाराचा वारा अजून लागतंच आहे, क्रोधावर ताबा अजूनही येतं नाहीच आहे, आणि मोठेपणा तर मिळाला तर हवाच आहे.

पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही.

माझा न्यूनगंड कधी जाईल माहीत नाही, कदाचित त्या न्यूनगंडातच माझा आनंद लपलेला आहे?

तुमचा आनंद कशात आहे?

(कदाचित क्रमशः)

संस्कृतीधर्मप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

27 Nov 2020 - 8:31 am | अथांग आकाश

त्रोटक पण विचारप्रवर्तक लेख!
.

कुमार१'s picture

27 Nov 2020 - 8:33 am | कुमार१

विचारप्रवर्तक लेख!

धन्यवाद अथांग आकाश आणि कुमार सर, तुमची एखादी प्रतिक्रिया खूप समाधान देऊन जाते.

उपयोजक's picture

27 Nov 2020 - 9:07 am | उपयोजक

तरी तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही..

या वाक्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल का?
http://www.misalpav.com/node/47156

रंगीला रतन's picture

27 Nov 2020 - 2:06 pm | रंगीला रतन

मला पण फार काही नाही समजले :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Nov 2020 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार

पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही.

या करता तुम्हाला साष्टांग नमस्कार

हे मुक्तक वाचताना काही ओळी सहस स्फुरल्या त्या जशा आठवतात तशा इथेच लिहितो

जाणीवांच्या जाणीवेने जाणीवेला जाणले
नेणीवांच्या नेणीवेने नेणीवेला नेणीले
आत्मभान कधीकधी मज आत्मभानी उलगडे
ही अवस्था व्यक्त करण्य शब्द माझे तोकडे

पैजारबुवा,

मस्त आहे!! जी अवस्था विकल्प संपल्यावर मिळते तिचे वर्णन बुद्धीने कसे करणार?

उपयोजक's picture

27 Nov 2020 - 9:24 am | उपयोजक

माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही.

ही मनाप्रमाणे जगता न येण्याची शक्यता तल्लख बुद्धीद्वारे कमी करता येऊ शकेल असे वाटते.फक्त दोन लोकांची उदाहरणे देतो.

https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/hindi/wealth/personal-f...

https://www.google.com/amp/s/www.esakal.com/desh/vijay-mallya-and-pinky-...

https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/magazines/panache/what-...

बघा.तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

मराठी_माणूस's picture

27 Nov 2020 - 10:17 am | मराठी_माणूस

वरील वाक्य असे हवे होते का "तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे (बॅंंकाना हजारो कोटींना बुडवुन)त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

आनन्दा's picture

27 Nov 2020 - 7:02 pm | आनन्दा

सारा अजून काड्या

टर्मीनेटर's picture

27 Nov 2020 - 9:45 am | टर्मीनेटर

तुमचा आनंद कशात आहे?

उत्तर: जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यात!

न्यूनगंडाला माझ्या विचारांत/आयुष्यात कुठेच स्थान नाही तरी त्याचे प्रातिनिधिक स्वरूप दर्शवणारा लघुलेख आवडला 👍

इथे ज्याला न्यूनगंड म्हटले आहे ते वस्तुतः आपल्या छोटेपणाची / खुजेपणाची जाणीव आहे..
त्याला जर कोणी न्यूनगंड म्हणणार असेल, तर हो मला आहे न्यूनगंड, असे मला म्हणायचे आहे.

Bhakti's picture

27 Nov 2020 - 10:34 am | Bhakti

जगायचे असेल तर कर्म झालेच पाहिजे , पण ते ग्रेटर गुड साठी करा.. Correct

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 11:49 am | सुबोध खरे

मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा कर्मण्येवाधिकारस्ते चा खरा अर्थ मला सापडला.

म्हणजे आपण काम केले नाही तर कुणी तरी काम करतंच

आणि त्याने ते नाही केलं तर त्याच्च्या फळाबाबत आपण कशाला चिंता करायची?

आणि काम झाले नाही म्हणजेच निष्काम कर्मयोग झाला असे मानून मी आनंदी राहत असे.

याच्यामुळे माझे वरिष्ठ मला वेगळे काम देण्याचा प्रयत्न करत असत. पण मुळात मी माझेच काम करत नसे तेंव्हा वेगळे काही करण्याचा काही संबंधच नव्हता.

बाकी ACR ( वार्षिक गोपनीय अहवाल) सारख्या मिथ्या गोष्टींना मी कधीच घाबरलो नाही.

त्यामुळे मी हठयोगी आहे असा माझा लौकिक पसरला होता आणि मला कोणतेही जबाबदारीचे काम देण्यास वरिष्ठ तयार नसत.

काम न केल्यास सरकारी नोकरीत कोणीही आपल्याला काढू शकत नाही असे लक्षात आल्यावर तर माझा आत्मविश्वास इतका वाढला होता कि न्यूनगंड म्हणजे काय हे मला माहितीच नव्हते.

एकदा सरकारी नोकरीत तुम्ही कायम झालात कि जागेसाठी कर्म करावे लागते या मूलभूत सिद्धांतालाच तडे जातात. आणि तुम्हाला काम करण्यासाठी नेमले आहे हा गैरसमज नाहीसा होतो.

काम झाले काय किंवा नाही झाले काय या बद्दल आपली वृत्ती उदासीन होऊन आपल्याला वैराग्य प्राप्त होते.

याच साठी ज्याला या संसारात विरक्ती (कामाबद्दल) आणि आसक्ती ( पगार, बढती आणि वेतन वृद्धी) या दोन्हीचा अनुभव घ्यायचाच आहे त्याने सरकारी नोकरी जरूर करावी.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Nov 2020 - 1:17 pm | प्रकाश घाटपांडे

हॅ हॅ

हे जरी दरवेळी तेच ते असले तरी त्यातून नव्या सदस्यांना आपल्या लक्षणीय जीवनपटाचा ओझरता आलेख पाहायला मिळतो असे आम्हास वाटते. असे असूनही या वेळी मात्र आपण `मी बोटीवर होतो तेंव्हा वारा वहात होता ' हे आपले आवडते गाणे म्हणायचे टाळून लोकांचा वेळ वाचवला, तरीही यात लपलेला आपला चाणाक्षपणा आमच्या लक्षात आलाच. असे कायम नाविन्यशून्य प्रतिसाद लिहीतांना आपला हुरुप कायम राहतो हे एक `रटाळ आणि रुटीन आयुष्य सुद्धा' किती मजेत जगता येते हे आपण लोकांना दाखवण्यासाठी करत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यात सुद्धा आपली चिकाटीच दिसते असे नम्रपणे नमूद करतो.

लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन असते हे आपले मूलभूत गृहितकच चूक आहे.

तसा तुमच्या बेसिक मध्येच लोच्या आहे हे तुम्ही वारंवार दाखवून देत असताच पण ते असो

There is never a dull moment in army
because
there is always someone thinking about something for you to do

कारण आमच्या प्रतिसादात तर तसे काहीच दिसत नाही. खरे तर जे नाही ते दिसणे याला केमिकल लोच्या झाला आहे असे म्हणतात असे मानसशास्त्र सांगते. आपल्यालाही प्रतिसाद पुन्हा वाचलात तर आपला नक्की काय लोच्या झाला आहे ते कळेल असे वाटते.

आनन्दा's picture

27 Nov 2020 - 7:06 pm | आनन्दा

असं नाही काही..
सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच..

त्या कर्माचेच फळ होते ते!!

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 7:52 pm | सुबोध खरे

सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच.

छे हो

प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मस्टर वर सही करणे हे कधीच करायला लागले नाही

आणि पगार आपोआप बँकेत जमा होतअसल्यामुळे पगार पत्रावर सही करण्याची गरजही नव्हती.

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 8:10 pm | सुबोध खरे

असे म्हणतात कि

सरकारी नोकरीत काम करणार्यांना काम मिळते.

आणि जे काम करत नाहीत त्यांना फक्त पगार मिळतो.

आणि बऱ्याच वेळेस बढती सुद्धा.

शा वि कु's picture

27 Nov 2020 - 8:01 pm | शा वि कु

भारी

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2020 - 12:40 pm | चौथा कोनाडा

शेम टू शेम ....
आता पर्यंत गेलेल्या आयुष्यात आमचाही आनंद न्युनगंडातच आहे असं दिसतंय ....
रीच डॅड, पुअर डॅड वाचताना आपण पुअर डॅड प्रकारातीलच आहोत हे पानोपानी जाणवत होतं !

सॅगी's picture

27 Nov 2020 - 2:20 pm | सॅगी

हा लेख समजला नाही याचा न्युनगंड आला तर काय करावे बरे?

आनन्दा's picture

27 Nov 2020 - 7:08 pm | आनन्दा
सॅगी's picture

27 Nov 2020 - 8:15 pm | सॅगी

...पेक्षा इलाज भयंकर होईल हो साहेब...

विजुभाऊ's picture

27 Nov 2020 - 2:37 pm | विजुभाऊ

परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.

संजय राउत कितव्या पायरीवर उभे आहेत म्हणायचे?
की ते स्वतःच राउतगीता सांगत आहेत उद्धवाला

सिरुसेरि's picture

27 Nov 2020 - 6:59 pm | सिरुसेरि

सध्याच्या क्रिकेट फीवरमुळे , आधी या लेखाचे शीर्षक "मी आणि माझा न्युझीलंड" असे वाचले .

आनन्दा's picture

27 Nov 2020 - 7:07 pm | आनन्दा

नशीब,

जाऊदे.. अश्लील अश्लील म्हणून ओरडतील लोक!

सतिश गावडे's picture

27 Nov 2020 - 8:41 pm | सतिश गावडे

वा, मानवी जीवनातील मर्यांदांचा, विविध शक्यतांचा स्विकार करुन आनंदात जगण्याचा प्रयत्न कसा करावा हे अगदी नेमकेपणाने मांडलंय.