कलापंढरी फ्लॉरेन्स
७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता.