जेंव्हा पासून युती बद्दल कळाले (राजकारणीय नाही ) शनिदेव आणि गुरुदेव ह्यांच्या तेंव्हा पासून कधी एकदा बघतोय आणि फोटो काढतोय असं झालं होतं . रविवारी ठरवलं आणि आमच्या कोथरूड मधील जवळच्या एका टेकडीवर आम्ही सहपरिवार दाखल झालो. ५ वाचताच पोहोचलो , पोराने इतर TP , मी बर्ड फोटोग्राफी असे उद्योग करत होतो , पण एक डोळा किंवा २ डोळे (दुर्बीण) म्हणा हवे तर आकाशात होता . आणि हळू हळू अंधार पडायला सुरुवात झाली आमच्या सारखे अजून उत्साही काही मंडळी पण होती तेवढ्यात गलका चालू झाला, दिसला दिसला गुरु दिसला. आणि मग काय आम्ही पण सरसावून बसलो सॉरी उभे राहिलो आणि ३४५ वर्षांनी आलेल्या ह्या अभूतपूर्व नैसर्गिक घटनेकडे पाहायला लागलो. आधी डोळ्यांनी , मग दुर्बिणीतून आणि मग कॅमेऱ्यातून पहिले आणि धन्य झालो. इतके सुंदर दिसत होते कि बास. माझ्या मुलगा तसा लहान असल्यनाने (५ वर्ष) त्याला उत्साह भरपूर होता ..त्याने इतकं गमतीदार वाक्य टाकले कि सगळे लोकं हसायला लागले. तो म्हणाला "बाबा मला saturn दिसत नाहीये नीट मोबाईल ची बॅटरी लाव ना :)" . असो अशा रीतीने बराच वेळ आम्ही ह्या खगोलीय घटनेला अनुभवत उभा राहिलो .
प्रतिक्रिया
23 Dec 2020 - 7:14 pm | कंजूस
म्हणजे खूप उजेड असणार. तरीही फोटो चांगला आला आहे.