धोरण

BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
30 Apr 2015 - 5:15 pm

आमचे गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असून BSNL शिवाय कोणतीही इंटरनेट सर्विस उपलब्ध नाही . मोबाईलसाठी 2G वोडाफोन GPRS वरुन नेट वापरतो . परंतु तिचा स्पीड 30-50 केबीपीएस पेक्षा जास्त नसतो. BSNL चे ५०० केबीपीएस ब्रॉडब्रॅंड ५५०/- रूपयामध्ये अमर्यादित प्लान आहे. पण इथे १०० केबीपीएस तरी मिळेल अशी आशा आहे.

त्यातच आता बीएसएनएल ने रात्री ९.०० ते सकाळी ७.०० वाजे पर्यन्त माहाराष्ट्र व मुंबई साठी अमर्यादित फ्री कॉलिंग ची सुविधा दिल्याने बीएसएनएल कनेक्शन घ्यावे असे वाटत आहे .

आपला काय अनुभव आहे ? BSNL लॅंडलाइन व ब्रॉडब्रॅंड कनेक्शन घ्यावे का?

आयुर्वेद

मयुर आपटे's picture
मयुर आपटे in काथ्याकूट
30 Apr 2015 - 3:33 pm

!! श्री गणेशाय नमः !!
मित्रहो उशिरा फायदे मिळतात म्हणून जास्त लोक आयुर्वेदिक उपचारानकडे वळत नाहीत !!
काही दुखले, खुपले त्वरित आराम हवा म्हणून आपण अलिओप्याथी चे उपचार घेतो, काही महिन्यान पूर्वी माझेही विचार असेच होते शिवाय उपचार स्वस्तात व्हायचे.... आयुर्वेदिक म्हणजे उपचार थोडे खर्चिक असे मनात ठसले होते !!
पण,
माझा मुलगा ह्याला बड चेरी नामक आजार आहे, अन अलिओप्याथी मध्ये कुठलाही औषधीय उपचार नाही, सर्व उपचार आहेत ते शस्त्रक्रियेचे आहेत.... अन त्यातूनही जीवाची शास्वती नाही......

भूतदया!! Human Rights!

स्पंदना's picture
स्पंदना in काथ्याकूट
28 Apr 2015 - 6:46 am

गेले महिना-दिड महिना या गोष्टीवर लिहावे म्हणते आहे. पण जो प्रश्न पडलाय; तो नक्की कसा विचारावा ते कळत नाही आहे. भरीत भर म्हणजे वाद घालणे हा आमुचा प्रांत नाही, पण मला जो प्रश्न पडलाय तो काथ्याकुटातच येउ शकतो.
तर मंडळी बाली नाईन हे प्रकरण ऑस्ट्रेलियात अतिशय गाजते आहे. त्या बद्द्लची माहिती मी वर लिंक मध्ये दिली आहे.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 9:41 am

पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.

(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)

तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.

आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

नाऱ्या नाऱ्या

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
16 Apr 2015 - 11:04 am

नाऱ्या नाऱ्या चल्लस खय?
मालवणाची माका इल्ली सय.

नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक?
गरज पडलीहा निल्या नित्याक.

नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला?
तुजे तोंडात शिरो पडो मेल्या.

नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला?
गप बस मारे , काम कर वायला.

अभय-काव्यधोरणइतिहासबालकथाकविता

भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
12 Apr 2015 - 10:30 am

आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने ह्या कन्सल्टेटीव्ह पेपर अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत.

रोगप्रतिबंधात्मक उपाय २

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
9 Apr 2015 - 1:27 pm

रोगप्रतिबंधात्मक उपाय

व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते.

रोगप्रतिबंधात्मक उपाय

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
8 Apr 2015 - 12:48 am

जीवन सदैव आनंदात घालवणे प्रत्येकाला प्रिय असते व प्रत्येकजण त्यासाठी सदैव धडपडत असतो.
परंतु कुटुंबातील एखाद्या जवळील व्यक्तीला जर अचानक काही आजार जडला किंवा आजारपणामुळे महिनोंमहिने त्रास सुरु असेल तर कुटुंबातील सर्वांच्या आनंदावर विरजण पडते.

अंजिराचा चिक आणि औषधोपचार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
27 Mar 2015 - 4:41 am

आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी.