आयुर्वेद

मयुर आपटे's picture
मयुर आपटे in काथ्याकूट
30 Apr 2015 - 3:33 pm
गाभा: 

!! श्री गणेशाय नमः !!
मित्रहो उशिरा फायदे मिळतात म्हणून जास्त लोक आयुर्वेदिक उपचारानकडे वळत नाहीत !!
काही दुखले, खुपले त्वरित आराम हवा म्हणून आपण अलिओप्याथी चे उपचार घेतो, काही महिन्यान पूर्वी माझेही विचार असेच होते शिवाय उपचार स्वस्तात व्हायचे.... आयुर्वेदिक म्हणजे उपचार थोडे खर्चिक असे मनात ठसले होते !!
पण,
माझा मुलगा ह्याला बड चेरी नामक आजार आहे, अन अलिओप्याथी मध्ये कुठलाही औषधीय उपचार नाही, सर्व उपचार आहेत ते शस्त्रक्रियेचे आहेत.... अन त्यातूनही जीवाची शास्वती नाही......
म्हणूनच काळजावर दगड ठेवून अन फक्त एकदाच मनाचे ऐकून मी आयुर्वेदिक वैद्यांवर विश्वास ठेवला अन त्यास त्यांची औषधे सुरु केली....
अपेक्षे प्रमाणे महाग होतीच पण जो फायदा झाला तो तुम्हा सर्वांना माहित आहेच.....
" वेळ, काळ अवश्य लागेल पण पूर्ण बरा करून दाखवीन " हे त्या वैद्यांचे शब्द आजही आठवत आहेत !!
अन ज्या ज्या रोगांवर अलिओप्याथी मध्ये उपचार नाहीत, त्या साठी आयुर्वेदाकडे पर्याय आहेत हे महत्वाचे !!
असो,
मला तर आयुर्वेदाचे महत्व उशिरा का होईना पटले आहे, अन सर्व माझ्या परिवाराला मी आयुर्वेदिक उपचारच सुरु केले आहेत ( काही अपवाद जसे मधुमेह अन त्या साठी आईला लागणारे इन्शुलीन ).
मयुर आपटे !!

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

30 Apr 2015 - 3:49 pm | कानडाऊ योगेशु

तुमचा मुलगा ह्या आजारातुन पूर्ण बरा झाला आहे असे समजतो व त्याबद्दल तुमचे व तुमच्या मुलाचे अभिनंदन !
पण लेख फार त्रोटक झाला आहे. फार वैयक्तिक होत नसेल तर आजारपणातुन तो कसा बरा झाला व ते ही आयुर्वेदामुळे हे जर विस्तृत पणे लिहिता आले तर लेख अजुन वाचनीय होऊ शकेल. विशेषत:"

वेळ, काळ अवश्य लागेल पण पूर्ण बरा करून दाखवीन " हे त्या वैद्यांचे शब्द आजही आठवत आहेत !!

ह्या उद्गाराना जस्टीफाय करण्यासाठी तरी अजुन एखादा लेख लिहिवा अशी इच्छा व्यक्त करतो.

होय लव करच विस्त्रुप्त लेख लिहिन यवर

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2015 - 4:01 pm | पिलीयन रायडर

पण जो फायदा झाला तो तुम्हा सर्वांना माहित आहेच...

नाही हो.. अजुन विस्ताराने लिहायला हवे होते.