_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 9:41 am

पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.

(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)

तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.

आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.

१. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा. खात्यात सबसिडी पेक्षा जास्तं वेगानं मार्क्स जमा होतील ह्याची खात्री बाळगा.
२. नवर्‍याला नं आवडणार्‍य गोष्टी करा, नवरा एकतर दुर्लक्ष करेल. तुमच्याशी वाद घालुन हरेल आणि तरीही तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्या खात्यात थोडे का होईना मार्क्स जमा होतील.
३. नवर्‍याला जे काही अपेक्षित आहे ते तुम्ही केलेत. व्वा!! तुम्ही एक अत्यंत समजुतदार आणि दुर्मिळ (फोर लिफ क्लोव्हर पेक्षा दुर्मिळ) पद्धतीची बायको आहात. तुमचा नवरा अगदी अगदी क्लाउड नंबर ९ वर असेल आणि अर्ध्या वचनात राहिल (शिवाय बरेचं मार्क्स मिळतील हेही खरं)

(कंसात तुम्हाला मिळणारे अथवा कमी होणारे मार्क्स दिले आहेत.)

घरातले नियम

- तुम्ही रात्री झोपण्यासाठी बिछाने घातलेत (+१०० आणि वरुन, अगं दिवसभर दगदग करतेस. उगीचं कश्याला त्रास घेतलास. मी घातल्या असत्या नं गाद्या. आणि रसिक नवरा असेल तर....लिहिणार नै कल्पनाशक्ती वापरा ;) )
- तुम्ही बिछाने तर घातलेत, परंतु चादरींना साजेश्या उश्या ठेवायला विसरलात (+१००, अगं होतं असं कधीकधी. मला ना त्या उशी पेक्षा ना कुशीमधे जास्तं छान झोप लागते इति रसिक नवरोबा ;) )
- बिछान्यावरची चादर चुरगळलेली आहे (+१०० झोपेत चुरगाळणारचं होती. आत्ता चुरगाळली. तु झोप निवांत)

- तुम्ही बाजारात नवर्‍याला हवी आहे ती वस्तू आणायला निघालात (+५००, क्रेडीट कार्ड हवं का? येता येता एखादी हवी ती मस्तं साडी, ड्रेस वगैरे घेउन ये हे वरुन)
- अगदी भर पावसात (+० वेडीयेस का गं तु? उद्या जा)
- तरीही बायको हट्टानी बाजारात गेली, येता येता बियरही घेउन आली (+५०००, अश्शी बायको मिळायला भाग्य लागतं. माझं गेल्या जन्मीचं पुण्य म्हणुन तुझ्याशी गाठ पडली. ;) )

- रात्री काहीतरी शंकास्पद आवाज आला म्हणून झोपेतून उठून तो आवाज कोठून आला ते बघायला निघालात (+१०० दिवसभराच्या दगदगीनंतर बरे तुला आवाज ऐकु येतात गं असले. व्वा. अफाट आहेत हो तुझे सेन्सेस)
- काहीही शंकास्पद आढळले नाही (+१००, बघं तु होतीस म्हणुन किमान कळलं तरी काही संशयास्पद नव्हतं ते)
- काहीतरी शंकास्पद वाटले म्हणून अर्धवट झोपेत तुम्ही काठीने ‘ते काहीतरी’ झोडपले (+५००, कस्ली शुरवीर आहे माझी बायको. ई.ई.)
- ‘ते काहीतरी’ नवर्‍याचा आवडता कुत्रा आहे (+१००, बरं केलंसं रट्टा ठेउन दिलास तो, माझ्या कोडकौतुकांनी नाहितरी लाडोबाच्चं (इथल्या लाडोबाशी ह्या लाडोबाचा सं बं धं णाही) झाला होता.

सोशल गँदरींगमधले नियम

- संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) )
- थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)
- त्या परिचिताचे नाव ‘टीना’ आहे (+५००, टीना काय रिना काय. तुझ्यापेक्षा भारी थोडीचं आहे. भारी हा शब्द वजन आणि गुण अश्या दोन्ही अर्थाने वापरला असल्यानी बायकोची रिअ‍ॅक्शन काय होईल ह्याचा भरवसा देउ शकत नाही)
- टीना एका नाईट क्लब मध्ये डान्सर आहे (+१०००, तुझ्या कॉलेजच्या मैत्रिणींचं एखादं एकदिवसीय गेट टुगेदर आपल्याकडेचं का करतं नाहीस हा एक स्ट्रॅटेजिक प्रश्ण)

नवर्‍याच्या वाढदिवसाचे नियम
(सुचना - बायका वाढदिवस विसरतं नाहीत शक्यतो असा स्वानुभव आहे तस्मात पास. तरीही विसरलात तरी काही हरकत नाही. नवरा तुमचा वाढदिवस विसरेल तेव्हा हे बॅलन्स आउट होउन जाईल.)

- नवर्‍याला सर्वात आधी, प्रेजेंट आणि एखादा बर्थडे किस (कुठे हे विचारु नये) देऊन विश केलं (+१००, काय गुणाची गं बायडी माझी ती)
- नवर्‍याला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलात (+१०० ह्याच्चं हॉटेलमधे यायचं असं मला वाटतं होतं गं माझ्या वाढदिवसाला)
- ज्या हॉटेलमध्ये बार नाही अश्या हॉटेलमध्ये नेलेत (+१००, रसिक नवरा असेल तर, तु बरोबर असताना दारुची गरजचं काय असं म्हणेल)
- समजा हॉटेलमध्ये बार आहे (+५०० बायको, तब्बेत बरी आहे का गं? एवढा विचार माझ्या आवडीनिवडींचा?????)
- हॉटेलमध्ये बारबाला देखील आहे (+० बायको, तब्बेत बरी आहे का गं? एवढा विचार माझ्या आवडीनिवडींचा?????)
- त्याच्याबरोबर तुम्ही आयटम नंबर वर डान्स केलात (+१०० क्रेडीट कार्ड घ्यायचं का गं बायको तुला एखादं???)

आत्तापर्यंतच्या पॉझिटीव्ह रेपो ला इथुन ग्रहण लागायला सुरुवात होते

सिनेमाला घेऊन जायचे नियम

- नवर्‍याला तुम्ही सिनेमाला नेलेत (+२००, रसिक माझी बायडी ती. चक्कं मला पिक्चरला घेउन आली.)
- त्याच्या आवडीच्या हिरोईनच्या सिनेमाला नेलेत (+५००, कॉर्नर सीट असेल तर एक शब्दही बोलु नका ;) )
- त्याच्या अगदी ना-पसंत हिरो-हिरोईनच्या सिनेमाला नेलेत (-८००, पहिला निगेटीव्ह पॉईंट स्कोअर केलात)
- तुमच्या आवडीच्या सिनेमाला नेलेत (+५० तुझी आवड ती माझी आवड. थोड्या वेळानी कसा काय कोण जाणे घोरायचा आवाज येउ शकेल)
- त्या सिनेमाचे नाव "डरना मना है" असे होते (+० महंमद घोरींचा वारसा परत चालु करेल तो)
- तुम्ही त्याला ‘तो अ‍ॅक्शन सिनेमा आहे’ असे खोटेच सांगितले होते आणि तो प्रत्यक्षात फॅमिली ड्रामा निघाला (-५००० आजपर्यंत केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींवर बायकोने पाणी फिरवलं आहे.

खरेदीला जायचे नियम
- नवर्‍याला साडी खरेदीला नेलेतं आणि चक्कं पहिल्या दुकानात फार त्रास नं देता साडी घेतलीत (+२०००)
- नवर्‍याला साडी खरेदीला नेलतं आणि ५०० दुकानं फिरुन एक हातरुमालाचं बंडल आणि दोन कोथिंबीरीच्या गड्ड्या घेउन आलात तर (-२०००)
- चलं आज तुला मस्तं पैकी टी-शर्ट घेउ (+२००० बायको, क्काय भारीयेस गं तु)
- ए तुझ्या बिअर बेलीला बसणारे का तो टी-शर्ट (-२०००)

नवर्‍याच्या शरीरसौष्ठवाचे नियम
- तुम्ही नवर्‍यासाठी फिगर मेंटेन करताय (+५०००)
- नवर्‍याला शेपमधे ठेवायला भाग पाडताय (-१००)

संवादाचे नियम
- त्याने विचारले, “मी जाड दिसतोय?” (+१००० तुमचं उत्तर काहीही असलं तरी. हो म्हणालात तर तुलाचं गं माझी काळजी बायको असं उत्तर. नाही म्हणालात तर तुझ्या स्वयपाकामुळे मी बारीक आहे असं उत्तर)
- तुम्ही उत्तर देताना आढेवेढे घेतलेत (+१०० रसिक नवरा असेल तर "सांग कधी कळणार तुला" वगैरे गाणं म्हणु शकेल)
- तुम्ही विचारलेत, “कोठे? आणि किती वाजता येणार. (-४००, एक विकांत मि़ळतो, जरा मोकळा सोड की. नाहितर आठवडाभर तुझाचं असतो ना)

- तो त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकल्यासारखे दाखवता आहात आणि चेहर्यावर साजेसे एक्स्प्रेशन्स देखील आहेत (+५०००)
- नवरा सतत तीस मिनिट बोलु शकत नाही सबब तुम्हाला ऐकायला लागणार नाही.
- तुम्ही सतत तीस मिनिटाच्यावर, टीव्हीवर्च्या होणार मोलकरीण मी ह्या घरची किंवा नेमेची होती झागडगुंती सारख्या शिर्यलींकडे दुर्लक्ष करुन (+२३८८८८ नवरा अर्ध्या वचनात येईल)
- फुटबॉल किंवा आयपील ची मॅच बदलुन तुम्ही 'का रे छळवाद हा', 'तु तिथे ती', 'पैठणी मिनिस्टर' पैठणी मिनिस्टर वगैरे लावलतं (-इन्फिनिटी, हा मुद्दा घटस्फोटापर्यंत ताणला जाउ शकतो.)

- त्याच्या लहानपणचे फोटो तुम्ही आवडीनी पहाता आहात. (+५०००००००००००००००)
- त्याच्या गह्रच्या लोकांचे वर्णन ऐकता ऐकता भान हरपले, थोडक्यात झोपलात (+२०० दमली असेल दिवसभर)

थोडक्यात काय बहुसंख्य पणे नवरा हा प्राणी शांत आणि सज्जन असतो. त्याच्या कलानी थोडसं घेतलत तर तुमचा संसार सुखाचा होईलचं. पण तेवढं ते सिरिअल आणि शॉपिंगचे नियम पाळा भांडणं टाळा.

अस्मादिक अविवाहित असल्याने कंसातले सल्ले आपापल्या रिस्क वर वापरावेत. उलटे फटके बसल्यास मंडळ जबाबदार नाही.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

जेपी's picture

17 Apr 2015 - 10:09 am | जेपी

हम्मा..

खटपट्या's picture

17 Apr 2015 - 10:15 am | खटपट्या

चांगलंय !!!

पॉइंट ब्लँक's picture

17 Apr 2015 - 10:21 am | पॉइंट ब्लँक

जबरदस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 10:30 am | अत्रुप्त आत्मा

होणार मोलकरीण मी ह्या घरची किंवा नेमेची होती झागडगुंती http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

मित्रहो's picture

17 Apr 2015 - 10:45 am | मित्रहो

म्हणून बायकोला खूष ठेवण्याचाच गुरुमंत्र दिला. नवऱ्याला तर -५०, -५०० नी आधिक आनंद मिळतो त्याचे काय.

स्वीत स्वाति's picture

17 Apr 2015 - 10:47 am | स्वीत स्वाति

फक्त एव्हढेच बोलेन जमलय हो ...

टवाळ कार्टा's picture

17 Apr 2015 - 11:12 am | टवाळ कार्टा

इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते

*वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु's picture

17 Apr 2015 - 11:48 am | नाखु

वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण .
====================
आता मान्यवरांचे अभिप्राय:

  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 1:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण.

घरचा अभ्यास ;)

अय्या,मी असंच वागते नवर्याशी.मला सगळे +५००च देईल तो.
खुदके साथ बातां-एक तर तो मिपावर नाही.आणि कसा देत नाही मार्कं बघतेच मी ^_~

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 1:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माफ करा. अशी बायको अस्तित्वात असु शकत नाही. -_-

म्हणुन तर म्हणलो फोर लिफ क्लोव्हर.

नेत्रेश's picture

17 Apr 2015 - 12:25 pm | नेत्रेश

टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

पहिला परिच्छेद सोडता बाकी क्लिष्ट वाटल्याने वाचलं नाही. ;)

संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) )
- थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 4:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 6:38 pm | श्रीरंग_जोशी

प्रयत्न चांगला आहे परंतु मूळ लेखाच्या तुलनेत फारच मिळमिंळीत वाटत आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 6:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

विडंबनाची सवय नाही हो. ;)

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 6:44 pm | श्रीरंग_जोशी

होईल होईल...

प्रयत्न सोडू नका. :-)