searchingforlaugh उर्फ "आन्याची फाटकि पासोडी " इतका अप्रतिम मराठी ब्लॉग दुसरा असल्यास सुचवा ही विनंती.
मित्रांनो
मी तसा मराठी ब्लॉग च्या दुनीयेत नवीन च आहे. माझ्या आतापर्यंत च्या शोधात मला इतका सुंदर ब्लॉग दुसरा सापडला नाही."searchingforlaugh.blogspot.in" हा ब्लॉग आपण जरुर वाचा. आणी या सारखेच इतर काही सुंदर इतर ब्लॉग तुम्हाला माहीत असतील तर मला जरुर कळवा.
या ब्लॉग बद्द्ल मला जे आवडले ते असे की
१- या मध्ये मी कधीही बघीतलि नव्हति इतकी सुंदर व्यंगचित्रे, अतिशय दुर्मीळ अशी छायाचित्रे आहेत.जी अतिशय महान कलाकरांची आहेत.
२- या मधील विषयांचे वैविध्य अफाट आहे जसे मर्ढेकर ते साल्वादोर दाली ते तत्वज्ञान ते मस्तानी ,मस्तक गरगरुन जाइल असा विषयांचा आवाका आहे.