डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.