संस्कृती

मंगळ कार्य !

साळसकर's picture
साळसकर in काथ्याकूट
28 Feb 2014 - 12:03 am

आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?

मायमराठी

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
27 Feb 2014 - 2:00 pm

शब्द अलंकार भंडार, मधाळ अमृतवाणी
वदे सुमधुर सिद्ध ऐसी, भाषा माझी मराठी ll १ ll

वेदतुल्य मंगल प्रार्थना, आरती ईश्वराची
दंड थोपटे गर्जुनी, आरोळी हो पोवाड्याची ll २ ll

सुबक डौल लावण्याचा, शृंगारते लावणी
तरल मनीच्या भावना, भावगीती रंगती ll ३ ll

सजग करण्या जना, बोले फटका झणी
ठेचुन काढी दुष्ट रुढी, भारुड कीर्तनातुनी ll ४ ll

अभंग कवणे जागविती, सदभाव भक्ती
वर्णन करितो विश्वाचे, मुक्तछंद पक्षी ll ५ ll

संस्कृतीकविता

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:18 pm

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी विकिपीडिया प्रकल्पातील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्यापी पुरेसा अद्ययावत नाही काही माहिती शिळी सुद्धा झाली आहे आणि काही माहिती कमतरता (इन्फर्मेशन गॅप) पण आहेत.

सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
23 Feb 2014 - 7:07 pm

पृथ्वी गोल आहे हे विज्ञानानी सांगितलेल सत्य आपण बहुसंख्य भारतीय लोक बर्‍यापैकी सहजतेन स्विकारतो नाही ? पृथ्वी गोल आहे हे सत्यच आहे पण युरोपियन आणि ख्रिश्चन लोकांना हे सत्य स्विकारण एककाळी कठीण गेल हे ठिक पण आजही आमेरीकेत फ्लॅट अर्थ सोसायटी आहे ज्यांच्या मतानुसार पृथ्वी सपाटच आहे. हा विनोद नाही आजच्या काळात अत्यल्प असेल पण एका अत्याधुनिक राष्ट्रातलेही काही नागरीक का होईनात वस्तुस्थितीस नाकारतात.

वसुधैव कुटुंबकम

आयुर्हित's picture
आयुर्हित in जे न देखे रवी...
23 Feb 2014 - 3:21 am

सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे
||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family
हे पूर्ण जग आपलेच कुटुंब आहे ही शिकवण फक्त आपल्याच भारतीय संस्कृतीचे उदात्त लक्षण आहे.
जे आपल्या भारतीय परंपरेचे एक खास वैशिष्ट आहे की सर्वांना आपल्या आनंदात व सुखात सहभागी करून घेण्याची.

धोरणसंस्कृतीसुभाषितेसमाजजीवनमानतंत्रश्लोक

कल्की

निलरंजन's picture
निलरंजन in जनातलं, मनातलं
22 Feb 2014 - 3:37 pm

कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल

संस्कृतीधर्मइतिहासलेख

आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने एकुश्येचे मनोगत

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 9:02 pm

एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.

संस्कृतीभाषाविचारशुभेच्छासंदर्भ

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 12:56 pm

मित्रांनो,
1
मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे.

संस्कृतीभाषासद्भावनाअभिनंदनआस्वाद