आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - अंतिम
राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे.