गाभा:
संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे.
सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा
"you attitude" "यू अॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 2:25 pm | आनन्दा
मी जालावर जेव्हढ वाचल, त्यावरून "वाचककेंद्रित दॄष्टीकोन / मांडणी" हा शब्द योग्य वाटतो.
11 Feb 2014 - 7:06 pm | माहितगार
आपण म्हणतातस वाचककेंद्रित दॄष्टीकोन / मांडणी हे शब्द जवळ जातात वाचकाच्या अथवा श्रोत्यास युक्त आणि भावेल अशा दृष्टीने मला काय आवडत मला काय पाहिजे माझ प्राधान्य काय हे सगळ स्वतः बद्दल बोलत राहण्या पेक्षा समोरच्या व्यक्तीच्या आवडी गरजा प्राधान्य इत्यादी लक्षात घेण्यासाठी अथवा लेक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं. पण यात परार्थ किंवा नि:स्वार्थीपणाची altruism ग्वाही नाही अथावा पुर्णत्वाने दुसर्यासाठी स्वतःला वाहून घेणे नाही. यू अॅटीट्यूड मध्ये श्रोत्यास युक्त आणि भावेल अशा पण स्वतःसही आवडतील अथवा उपयूक्त अशा गोष्टींची चर्चा करून अप्रत्यक्ष महत्व पटवून देण्याची कृती सुद्धा सम्मीलीत असू शकते. त्या दृष्टीने श्रोत्याचा दृष्टीकोण लक्षात घेतला जातो पण श्रोत्याच मन वळवण्याची क्रिया स्वतःच्या दृष्टीकोणाकडे करण्याची क्रिया अथवा स्वतःचा हेतु साधून घेण हेही असु शकत खासकरून संवाद व्यावसायिक कारणासाठी साधला जात असेल तर. ज्याला बर्याचदा आपल्याकडे गोड बोलण म्हणतात .पुर्वीच्या काळात चारूवाक असाच एक शब्द समोरच्यास गोडवाटेल असे बोलण्या बद्दल वापरला जात असे त्याची आठवण झाली.
मह्णून 'श्रोत्यास युक्त आणि भावेल असा' आणि 'श्रोता/वाचककेंद्रित' यात अर्थछटांच साम्य आणि फरक अधिक स्पष्ट करू शकणारे अजून काही पर्याय उपलब्ध होऊ शकतीलतर त्याबद्दल अजून काय काय शब्द सुचवले जातात ते पहावयास आवडेल.
12 Feb 2014 - 8:29 pm | आनन्दा
कदाचित "द्वितीयपुरुषी मांडणी" हे देखील जमू शकेल, त्यात समग्र अर्थ येत नसला, तरी शब्द अर्थवाही आहे.
13 Feb 2014 - 1:53 pm | माहितगार
श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख द्वितीयपुरुषी मांडणी असे जमू शकेल. सोबतच खाली व्याख्या आणि श्रोताभिमुख अभिवृत्ती असाही शब्द सूचवला आहे. अर्थात पारिभाषिक संज्ञा खूप क्लिष्टही वाटावयास नको म्हणून तुमचेही सुचवलेले पर्याय आवडले शिवाय तुमच्या प्रतिसादांनी विचार शक्तीस चालना मिळाली आणि या सर्व चर्चा सहभागा करता पुनश्च धन्यवाद
11 Feb 2014 - 5:54 pm | प्रभाकर पेठकर
'लोकानुनय' हा शब्द चालावा असे वाटते.
11 Feb 2014 - 7:13 pm | माहितगार
अरेवा आपला संदेश वाचे पर्यंत अनुनय आणि लोकानुनय हे शब्द चक्क माझ्या लक्षातच आले नाहीत. अनुनय आणि लोकानुनय च्या काही छटा मॅच होतात पण काही अर्थछटा अपीझ लांगूलचालन या राजकीय छटे जवळही जातात की अनुनय आणि लोकानुनय हेच शब्द सुयोग्य वाटतात
पेठकर आणि आनन्दा आपणा दोघांनाही प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
11 Feb 2014 - 9:12 pm | तिमा
लोकाभिमुख हा शब्द चालतोय का पहा.
13 Feb 2014 - 1:58 pm | माहितगार
अभिमुख शब्द चपखल वाटतो. व्यक्तीशः जराशा फरकाने म्हणजे श्रोताभिमुख हा शब्द मला अधिक आवडला म्हणून श्रोताभिमुख अभिवृत्ती अशी पारिभाषिक संज्ञा बनवण्याचा प्रयत्न केला आहे . कारण मिमांसा खाली नमुद केलिच आहे. अर्थात संज्ञा कुणास क्लिष्ट वाटल्यास आनन्दा आणि अकौंटंटने दिलेला पर्याय उपलब्ध आहेच.
आपल्या चर्चा सहभागा करता खूप खूप धन्यवाद
11 Feb 2014 - 10:50 pm | आनंदी गोपाळ
माज.
=
अॅटीट्यूड :)
12 Feb 2014 - 7:59 pm | माहितगार
मला वाटते अॅटीट्यूड दोनचार अर्थछटा आहेत.मुख्य अर्थ वृत्ती असा असावा असे वाटते वृत्ती शब्द पण अॅटीट्यूड शब्दाच्या बर्याच अर्थछटा दाखवू शकतो.आपण म्हणता तसे "अॅटीट्यूड दाखवणे" ची एक अर्थ छटा "माज दाखवणेच्या" जवळ जात असावी. भाषा प्रवाही असते हल्ली "माज आहे मला मराठी असल्याचा" अशी एक उद्घोषणा वाचण्यात येते. इथे "माज" शब्द हिंदी गर्व शब्दाच्या अर्था जवळ जातो अभिमान पेक्षा अधिक पण मराठी गर्व शब्दा पेक्षा कमी आणि अल्पसा अॅटीट्यूड च्या अर्थछटे जवळही जाणारा आहे असे वाटते.
निव्वळ "माज" या शब्दाची एक अर्थ छटा इंग्रजी Rut या शब्दाशीही मिळते. Rut चा गूगल ने दाखवलेला अर्थ a habit or pattern of behaviour that has become dull and unproductive but is hard to change. असा आहे.
माज या शब्दाची दुसर्या दोन महत्वाच्या अर्थछटा "स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना" "धन, विद्या, सत्ता इत्यादीतील प्रभुत्वामुळे चढलेला कैफ" संदर्भ मराठी शाब्दबांध
"यू अॅटीट्यूड" हि पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे यात वक्ता आणि श्रोता दोघांच्याही माज असण्या नसण्याशी खूप संबंध नाही. अर्थात ऐन संवाद साधताना "माज" मध्येच डोकावला नाही हि किमान अपेक्षा असू शकते.
एनी वे तुम्ही माज हा शब्द सुचवल्या मुळे मी ऑनलाईन डिक्शनर्या बर्या पैकी पालथ्या घातल्या आणि त्या संशोधनातून "अभिवृत्ती" हा शब्द "यू अॅटीट्यूड" मधील अॅटीट्यूडच्या जवळ जातो हे लक्षात आले. अभि या प्रत्ययामुळे अर्थछटेस एक निश्चित सकारात्मकता येते असे वाटते.
12 Feb 2014 - 10:35 pm | माहितगार
माज या शब्दाची एक अर्थछटा ताठा या मराठी शब्दाशी साम्य दाखवते तेव्हा सुद्धा अॅटीट्यूडच्या एका अर्थछटेशी मॅचकरत असावी असे वाटते.
आनंदी गोपाळ चर्चेत सहभागा बद्दलही धन्यवाद
12 Feb 2014 - 6:45 am | माहितगार
सकाळी सकाळी माझ्या संगणकाच्या खिडकीने (वोंडोज) दगा दिला ती कोसळली. मी भल्या पहाटे एकदिडतास मेहनत केलेला मजकुर पहाता पहाता नाहीसा झाला. चर्चेत खुप लौकर चांगले पर्याय आले आहेत त्यावरून मलाही उदाहरणे आणि आणखी पर्याय सुचले. पण सर्व पुन्हा लिहावे लागेल संध्याकाळपर्यंत करण्याचा प्रयत्न करतो. तो पर्यंत चर्चा अशीच चालू ठेवावी. सहभागाकरता सर्वांना धन्यवाद
मिपा संपादकांना धाग्याचे शीर्षक बदलता येते का येत असेल तर " "यू अॅटीट्यूड" म्हणजे काय ? " असे शीर्षक बदलणे बरे असेल का.
13 Feb 2014 - 10:44 am | माहितगार
You आणि attitude हे शब्द इंग्रजी भाषेत सोबत पण वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा येतात त्यामुळे "You attitude" करता गूगल सर्च केला तर नवागत व्यक्तिचा गोंधळही होऊ शकतो म्हणून "You attitude" संकल्पना विषद करण्याचा माझ्या पद्धतीने जरासा प्रयत्न करतो आहे; थोडासा व्यापक पट मांडण्याचा प्रयत्न आहे. यू अॅटीट्यूड संकल्पना जाहीरात विश्वाने जाहीरात प्रभावी कशी होईल या दृष्टीने पुढे आणली पण पुढे व्यावसायिक संवाद कौशल्ये लेखन आणि संभाषण कौशल्याच्या प्रशिक्षणासाठीही एक तंत्र म्हणूनही विकसित झाली आहे.
कोणत्याही व्यक्तीला स्वतःबद्दल बोललेल आवडत. तुम्हाला कुठेतरी जायच आहे आणि तुमचा बालवयातला मुलगा कुठेतरी झाडावर अथवा जंगलजीमवर चढून बसलेला आहे किंवा स्वतःच्याच खेळात मश्गुल आहे. एखादी गोष्ट तुम्हाला स्वतःकरता करून हवी आहे म्हटल्या नंतर कदाचित एकणार नाही. पण तेच त्याच्या आवडीची गोष्ट आहे अस सांगितल तर लगेच तयार होईल. अगदी लहान बाळही त्याच्या चिउकाऊच्या विचारात रमलेल असत त्याला भरवताना चिउकाऊच्या गोष्टी सांगत खाऊ घातल कि पटकन एकत किंवा एक घास ताईचा एक घास दादाचा म्हणूनही आई जेवण भरवते म्हणजे काय करते तर त्याच्या भूमिकेत जाते गोष्ट त्याच्या करताच करावयाची असते मात्र उद्देश मात्र आपला सफल करून घेते. हे उदाहरण लहान मुलांबद्दलच उदाहरण मानवी स्वभावास हे किती स्वाभाविक आहे हे लक्षात येण्या करता दिल. प्रत्येकवेळी लहान मुलांशी बोलतो तसेच बोलावयास हवे असे नाही मोठ्या माणसांनी परस्परांशी संवाद साधताना केवळ मला काय पाहीजे हे सांगण्या पे़क्षा समोरच्या व्यक्तीला काय हव आहे हे विचार एवढेच स्वाभाविकपणे संवाद साधले तर ?
एखादी व्यक्ती परगावहून येते तेव्हा आपण प्रवास कसा झाला इत्यादी प्रश्न विचारून विचारपुस करतो काय हव नको याच्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतो तेव्हा ते आपण किती स्वाभाविकपणे करत असतो. तेव्हा ते आपण प्रत्येक वेळी केवळ तंत्र म्हणून वापरतो का ? नाही तो आपल्या स्वभवाचा आपल्या वृत्तीत आलेल्या सकारात्मकतेचा अविष्कार असतो. समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांच्यां कामा करता अपाँईटमेंट मागते तुम्हाला स्वतःला त्यातन काही फायदा नसतानाही बर्याचदा दिलेली वेळ पाळत असता तेव्हा ते काय असत केवळ एक कौशल्य असत केवळ एक तंत्र असत का एक स्वतःत बाणवलेली सकारात्मक वृत्ती असते. आणि म्हणूनच यू अॅटीट्यूड संकल्पनेत स्कील अथवा टेकनीक शब्द न वापरता अॅटीट्यूड शब्द वापरला असेल का ?
13 Feb 2014 - 10:56 am | असंका
अम्हाला अकरावी का बारावीला हा You Attitude प्रकार अभ्यासात असेल. पत्रलेखनासंदर्भात. पत्र लिहिताना समोरच्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेवून मजकुराचा विचार करावा असा आशय असावा. तसे बघितले तर "समोरच्याचा दृष्टिकोन" असं म्ह्णता येइल का?
13 Feb 2014 - 11:37 am | माहितगार
अगदी बरोबर वर आनन्दा "वाचककेन्द्रीत दृष्टीकोण" म्हणाले मी "श्रोता केन्द्रीत दृष्टिकोण" म्हणालो आणि आपण "समोरच्याचा दृष्टिकोन" म्हणालात हे जवळपास सारखच पत्र लेखनाच तंत्रात आनन्दा सांगतात तसे "द्वितीयपुरुषी मांडणी" म्हणजे तुम्ही या अर्थाने वापरलेला आपण आणि आपण या शब्दांचा तर इंग्रजीत यू या शब्दाचा उपयोग हा या तंत्राचा अगदी अवश्यमेअ भाग आहे.
"अगदी बरोबर वर आनन्दा "वाचककेन्द्रीत दृष्टीकोण" म्हणाले" हेच वाक्य "होय क.अकौंटंट आपण म्हणता ते अगदी बरोबर वर आनन्दा "वाचककेन्द्रीत दृष्टीकोण" म्हणाले .." यात आपण हा शब्द आला की कस छान वाटत ना वाचताना.
अर्थात "समोरच्याचा दृष्टीकोण" "द्वितीयपुरुषी मांडणी" सोबतच "सकारात्मक मांडणी" हे महत्वाचे भाग आहेत. "समोरच्याचा दृष्टीकोण"मध्ये आपण अकौंटंट आहात हे माहीत असेल आणि शक्य असेल तर ते लक्षात घेतही मांडणी करणे. एका अकौंटंटशी संवाद साधताना मी जर्नल लेजर ते ऑडीट वगैरे या विषयांबद्दल लिहिन किंवा बोलेन तर समोर डॉक्टर आला तर लगेच वैद्यकीय क्षेत्राबद्दल तेही त्यांच्या दृष्टीकोणातून चर्चा करेन. मार्केटींग मध्ये याचा उपयोग त्याच क्षेत्रातले दुसरे कोण कस्टमर आहेत याची माहिती देत केला जातो. म्हणजे मी तुमच्या कडे इंश्युरन्स विकण्याकरता आलो असेल तर अजून कोण कोणत्या अकौंटंटनी माझ्याकडून इंश्युरन्स विकत घेतला हे सांगेन किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणी कुणी इन्श्युरन्स घेतला सांगेन हाही यु अॅटीट्युडचाच प्रयोग झाला .
त्या शिवाय शंका निरसन किंवा ऑब्जेक्शन हँडलींग मध्येही त्याच क्षेत्रातील उदाहरण देण चांगल जस की सॉफ्टवेअर विकणार्या व्यक्तीला सॉफ्टवेअर मध्ये टेकनीकली एखादी गोष्ट होऊच शकत नाही हे एका अकौंटंटना सांगायच आहे तर डबल एंट्री अकाऊंटींग मध्ये एखादी चुकीची एंट्री करण किती घातक आहे तसच सॉफ्टवेअरमध्येही चुकीचा तांत्रीक बदल घातक ठरू शकतो हे सांगितल्या नंतर अकाऊंटट ती अडचण चटकन लक्षात घेईल पण समजा मी बांधकाम व्यवसायातल्या सिव्हील इंजीनीयरशी बोलत असेन तर तयार झालेल्या आरसिसी स्ट्रक्चर मध्ये बदल करताना येणार्या अडचंणींची माहिती दिली कि ते त्यांच्या सहज पचनी पडेल.
प्रतिसादा करता धन्यवाद
13 Feb 2014 - 1:05 pm | माहितगार
आता पर्यंत आलेल्या प्रतिसादांवरुन श्रोता-अनुनय श्रोता-अभिमुख हे शब्द तयार करता येतील असे वाटते सोबत अनुसरण अनुवर्तन अनुकूल अनुयोग आणि अनुरंजन हे शब्द अर्थछटांच्या तुलने करता लक्षात घेता येतील असे वाटते. अनुनय या शब्दाची व्युत्पत्ती आंतरजालावर आढळली नाही परंतु अनु हा उपसर्ग संस्कृतात इतर उपयोगां सोबतच one after another या अर्थाने सुद्धा येतो नय शब्दही बर्याच अर्थांनी येतो त्यात conduct आणि behaviour यांचाही समावेश आहे. अनुनयची व्युत्पत्ती अभ्यासण्याच कारण अनुनय श्रोता-अनुनय हा शब्द यू अॅटीट्यूड करता कितीच चपखल बसतो. पण लोकानुनय किंवा प्रियकरांनी परस्परांचा केलेला अनुनय अनुसरण अनुवर्तन या प्रकारात मोडतो असे वाटते.
वर नमुद केल्या प्रमाणे संवाद साधणार्या व्यक्तीकडून अनुसरण अनुवर्तन अभिप्रेत नाहीत. अनुयोग हा हिंदी शब्द उपलब्ध आहे पण तो विनंती दर्शक म्हणून अधिक वापरला जातो. *अनुयोग = पुं० १. नम्रतापूर्वक कुछ आग्रह करते हुए किसी से कोई काम करने के लिए कहना (सोलिसिटेशन)
आणि म्हणून वर 'तिमा' यांनी सुचवलेला लोकाभिमुख मध्ये जरासा बदल करून श्रोताभिमुख हा शब्द अधिक चपखल वाटतो आहे. वर म्हटल्या प्रमाणे वृत्ती शब्दा सोबत अभि हा उपसर्ग सकारात्मकता सूचीत करतो म्हणून श्रोताभिमुख अभिवृत्ती असा शब्द प्रयोग आणि
आता पर्यंतच्या चर्चेच्या आधारावर यू अॅटीट्यूडची व्याख्या "समोरच्याचा दृष्टीकोण लक्षात घेऊन श्रोत्यास युक्त आणि भावेल अशी श्रोता अथवा वाचककेंद्रित सकारात्मक आणि द्वितीयपुरुषी संवादाच्या तंत्राचे कौशल्यपुर्वक उपयोजना करणारी श्रोताभिमूख अभिवृत्ती' अशी करता येईल का ? " ठिक वाटते का
मी सुद्धा आपल्या सर्वांसोबत प्रयत्नच करतो आहे त्यामुळे अजूनही सूचना आणि सुधारणा सुचवण्यां बाबत चर्चा करणे निश्चितपणे आवडेल
13 Feb 2014 - 1:46 pm | माहितगार
यू अॅटीट्यूड करता आता श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती हि संज्ञा वापरण्यास सुरवात करतो. अर्थात मिपा वाचक अजून काही संज्ञा सूचवू शकले तर स्वागत आहेच. श्रोताभिमुख अभिवृत्ती हि संकल्पना लेखन आणि मार्केटींगच्या क्षेत्रात कशी वापरली जाते याची संक्षीप्त माहिती आपण करून घेतली. व्यवस्थापन क्षेत्रातच हुमन रिसोर्स-मानव संसाधन अंतर्गत प्रेरणेचे तंत्र म्हणूनही श्रोताभिमुख अभिवृत्ती यू अॅटीट्यूड चे कौशल्य अत्यंत उपयूक्त ठरू शकते. व्यवस्थापनातच (तुम्ही मार्केटींग किंवा सेल्स मध्ये नसला तरीही) तुमचे डायरेक्ट कस्टमर नाहीत त्यांना सुद्धा म्हणजे तुमच्या संस्थे अंतर्गत इतर सहयोगी वरीष्ठ आणि कनीष्ठ सर्व तसेच व्हेंडॉर बँकर्स या सर्वांनाच तुम्ही कस्टमरशी संभाषण साधता तसे संभाषण साधण्याचा सल्लाही दिला जातो येथे ही मुलतः श्रोताभिमुख अभिवृत्ती अथवा यू अॅटीट्यूड अभिप्रेत असावे असे वाटते.
बर्याच व्यक्तीगत सामाजिक आणि इतर अनेकविध संघर्षांच्या मूळाशी बर्याचदा प्रत्येकजण दुसर्याची बाजू न समजून घेता स्वतःस काय हवे हेच बोलत असतो असे संघर्ष अंशतः का होईना कमी करण्या करता स्वतःच कमीत कमी गमवत दुसर्या बाजूच मन आपल्याकडे वळवण्याकरता एक चांगल सकारात्मक तंत्र म्हणून श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकते. राजकीय क्षेत्रात लोकानुनया पेक्षा श्रोताभिमुख अभिवृत्ती चे तंत्र अवगत करणे शक्य नसलेल्या गोष्टींचे वचन देण्या पेक्षा राजकीय नेत्यास स्वतःची विश्वासार्हता टिकवण्याच्या दृष्टीने उपयूक्त असू शकते.
पण जगातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा चिमुटभर मिठा सोबत घेतलेल्या चांगल्या भारतिय सांस्कृतीक इतिहासात वचन देणे आणि अतीथ्य देवोभवच्या मर्यादांना सीमा रेषा नव्हती त्या मानाने श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती तुम्हाला प्रॅक्टीकल सीमारेषेत राहून त्याच गोष्टी करू देते अर्थात यू अॅटीट्यूड काय नाही आणि त्याच्या मर्यादाही नीट पणॅ समजून घ्यावयास हव्यात.यू अॅटीट्यूड म्हणजे कोणत्याही पद्धतीने भाटगिरी चमचेगिरी लांगूलचालन लोकानुनय लोकानुरंजन इत्यादी नव्हे हे लक्षात घ्यावयास हवे. सोबतच वाचक आणि श्रोत्याच्या आवडणार्या गोष्टींना दुसर्या बाजूची व्यक्ती कुरवाळत असतेच सोबतच केवळ सकारात्मक बाबी दाखवलेले असण्याची शक्यता असते प्रत्येक संवाद वाचताना ऐकताना आपल्या स्वतःच्या सीमा रेषा स्पष्ट असाव्यात एक श्रोता म्हणून समोरची व्यक्ती कितीही गोड आणि प्रीय शब्दात सांगत असली तरी जोखीम आणि परिणामांचा सर्वंकष अभ्यास न करता कोणतीही गोष्ट स्विकारू नये. आणि गोड आणि प्रीय शब्द बोलणारी प्रत्येक व्यक्ती वाईट असते हे टोकही गाठू नये असे वाटते.
यू अॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती या विषयावर तुम्हाला काय वाटते तसेच या तंत्र कौशल्य आणि अभिवृत्ती बद्दल तुमच्याकडे काही शेअर करण्या सारखे असल्यास शंका असल्यास या धागा चर्चेच्या निमीत्ताने अजून चर्चा झाल्यास आनंदच वाटेल.
14 Feb 2014 - 10:55 am | माहितगार
श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती मध्ये समोरच्याच्या दृष्टीकोणातून त्याच्याशी संवाद साधणे अथवा विचारपूस करणे म्हणजे दुसर्यांच्या व्यक्तीगत खासगी जीवनात/प्रश्नात अवाजवी लक्ष घालणे आणि चांभार चौकशी सुद्धा अभिप्रेत नसते हेही ल़क्षात घ्यावयास हवे.