जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.
जसे भारताचा इतिहास अभ्यासताना ह्युएन-त्सांग या चिनी प्रवाशाच्या निरीक्षणांना महत्व देतो. अर्थात परकीय व्यक्ती सर्वच स्थानिक पैलू समजू शकते असे नाही त्यामुळे परकीय निरीक्षणांना तीही एक महत्वाची मर्यादा असते.
आपण इतिहासाकडून जरासे वर्तमानाकडे येऊ. कौतुक करून घेण सर्वांनाच आवडतं तो नैसर्गिक मानवी स्वभाव आहे. जेव्हा एखादा पाहुणा येतो जसे आपण अतिथीचे स्वागत करतो त्या प्रमाणेच तो यजमानाचे कौतुक करतो. घरचे कौतुक करतात पाहुण्यांनी कौतुक केल की अजून छान वाटत. पाहुण्याने केलेल्या कौतुकाने सुखद वाटणे या पलिकडे जाऊन अभिमान वाटणे हेही एकवेळ समजता येत. पण पाहुण्याच्या कौतुकाने अहंकाराची पायरी चढण्यापुर्वी पाहुण्याने केलेले कौतुक बर्याचदा औपचारीकतेतून आलेल कौतुक असू शकत किंवा त्या कौतुकाचे इतरही माहित नसलेले रंग असू शकतात चिमुटभर मीठ घेऊन लक्षात घेतलेल बर असत. पण बरेच लोक पाहुण्याच्या कौतुकाने हुरळून जाताना, हे वस्तुस्थितीच चिमुटभर मीठ घेण्याच विसरून जातात.
आपण वर्तमानातील घरगूती वातावरणाकडून आपण जेव्हा वर्तमानातील आंतरराष्ट्रीय संबंधांकडे येतो तेव्हा त्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले असू शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले परकीय पाहुणे लोक जेव्हा कौतुक अथवा टिका करतात तेव्हा खरेतर लगेच खरी न मानून हुरळून न जाता अथवा नाराज न होता; त्या गोष्टी चिमूटभर मीठा सोबत घेऊन तपासून पहावयास हव्यात. पण प्रत्यक्षात वर्तमान भारतात याच भान सर्वसामान्य भारतीयांनाच नव्हे तर भारतीय विश्लेषकांना आणि नेत्यांनाही असतं का याचा प्रश्न मनात उपस्थित होतो.
(ह्या विषयावर अजून लिहिण्यासारख आहे पण पुन्हा योग येईल तेव्हा, तो पर्यंत परक्या पाहुण्यांचे कौतुक (केवळ खरेच) मिळत राहो ही शुभेच्छा.)