मांडणी

महाराष्ट्राच्या ईतिहासातील ऐतिहासिक प्रसंगांबद्दल माहिती हवी आहे.

सतिश म्हेत्रे's picture
सतिश म्हेत्रे in जनातलं, मनातलं
7 Jan 2018 - 9:08 pm

नमस्कार मंडळी,
मी National Institute of Technology Karnataka, Surathkal येथे संगणक अभियांत्रिकी शिकत आहे. आमच्या येथे दरवर्षी भारत दर्शन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्यामधून आलेले विद्यार्थी त्या त्या राज्याची कला व संस्कृती सादर करतात. येथील महाराष्ट्र मंडळ देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडते.

मांडणी

अ क्लोथलाईन.

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
1 Jan 2018 - 2:47 pm

पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी
अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर..
निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा..
नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट..
आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट,
भोकाभोकाचं बनियन..
टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट..
कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा
शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट..
चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक..
काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी
इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे,
त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे

मुक्त कवितामांडणीकवितामुक्तक

२०१८ मधील काही महत्वाच्या खगोलिय गोष्टी !

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
31 Dec 2017 - 3:48 pm

नमस्कार! उद्यापासुन नविन इंग्रजी व आंतरराष्ट्रिय वर्ष २०१८ सुरू होत आहे त्यानिमित्त काही मोजक्या २०१८ मधील खगोलिय घटना इथे थोडक्यात देत आहे.
१. जानेवारीमध्ये २ पोर्णिमा व १ चंद्रग्रहण आहेत. पहिल्या पोर्णिमेला ( २ जानेवारी, पौष पोर्णिमा ) आपण सुपरमुन बघू शकतो.सुपरमुन म्हणजे मायक्रोमुनच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा व पर्यायाने अधिक तेजस्वी चंद्र. हाच सुपरमुन परत माघ पोर्णिमेला म्हणजे ३१ जानेवारीला बघु शकतो. ऐकाच महिन्यात दुसरा सुपरमुन आला की त्याला ंब्ल्यु मुन ं असे पण म्हणतात.

मांडणीप्रकटन

कमलताल

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
29 Dec 2017 - 8:02 am

(ताल = सरोवर)

प्रिय कमलताल,

मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.

कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.

मांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियाआस्वादप्रतिभा

अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
24 Dec 2017 - 2:19 am


या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371

मांडणीप्रकटनविचार

मजूर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
23 Dec 2017 - 11:47 am

मजूर
....
'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो.

मांडणीवावरवाङ्मयकथामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानआरोग्यराहणीभूगोलदेशांतरप्रकटन

तुलना

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
4 Dec 2017 - 12:04 am

कावळा विमानावर शिटला तुच्छतेने, म्हणून विमानाच्या गर्वात कमीपणा येत नाही.
त्याचा वेग, त्याचा डौल, त्याचा झपाटा कमी होत नाही.
जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एका दमात जाण्याची कावळ्याला खाज मिटवता येऊच शकत नाही.
त्याच्या साठी समाधानाची गोष्ट म्हणजे तो दुसऱ्याच्या मनाचा ताबेदार नसतो....!

समीर...

मांडणीविचार

राजाची नियत

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 7:52 am

राजाची नियत
आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई.

धोरणमांडणीवावरकथासाहित्यिकसमाजजीवनमानअर्थव्यवहारप्रकटनविचार