कागदाचे झाड
प्रिय जिब्रान खलील,
माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही.
प्रिय जिब्रान खलील,
माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही.
हाच लेख पूर्वी टाकला होता पण तो कुठे गेला कळेना, म्हणून आपल्यासाठी पुन्हा
उद्धव काळ
खूप लोक उद्धवराव आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना करतात
पण
मला उद्धवरावांचे नेतृत्त्व बाळासाहेबांपेक्षा उजवे वाटते.
बाळासाहेबांची सेना मूळात तेव्हाच्या सत्ताधार्यांच्या आज्ञेवरून स्थापन झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सत्ताधारी पक्ष लोकलज्जेस्तव जी कामे स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी कुणीतरी मदतीला हवे होते.
'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर.
त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न.
इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल.
आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं.
घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत.
तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात.
मला आलेला अनुभव -२
नमस्कार,
आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज.
मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते.
त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला.
नितीन बनतो डॉक्टर ----- ( या काल्पनीक लेखातील घटनाकाळ हा १९८५च्या आसपासचा धरला आहे . )
आंबेवाडीतल्या आपल्या रुममधे आज सकाळी संजु , सोनाची दुक्कल टपकलेली पाहुन नितीन थोडा चकीतच झाला . या दोघांचेही चेहरे त्याला जरा उदासवाणे वाटले . पण लगेच स्व:ताला सावरुन त्याने हसत या बच्चे कंपनीचे स्वागत केले .
"अरे वा . अलभ्य लाभ . आज सकाळीच शेरलॉक होम्स आणी वॅटसन यांची जोडगोळी या पामराकडे कशी काय उगवली ? "
इंदिराबाई
काँग्रेस पक्षातली सचोटी नेहरु आणि लालबहादूर शास्त्री यांच्यापर्यंत टिकून होती. इंदिरा गांधींच्या काळात त्याला ओहोटी लागली. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर सुरू झाला. इंदिराबाईंनी पक्षातल्याही अनेक जणांचा राजकीय खातमा केला. पक्षाने ठरवलेला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हरवून आपला उमेदवार निवडून आणण्याची कामगिरीही बाईंनी करून दाखवली.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)