✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कागदाचे झाड

श
शिव कन्या यांनी
Sat, 10/21/2017 - 08:59  ·  लेख
लेख
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले.... हे लिहिते फूल माझ्या नशिबात का,असेही विचारले असेल तिने देवाला! पण आईच ती.... त्यात फ्रेंच आणि अरेबिकची उत्तम जाण असलेली! गरिबीने भंजाळली क्षणभर, पण आतले जाणतेपण असतेच! बऱ्याच दिवसांनी तिने कुठून तरी कसेबसे दोनचार कागद अन एक पेन्सिल तुझ्या हातात ठेवली.तू हरखून गेलास. दुसऱ्या दिवशी आईने विचारले, बघू काय लिहिलेस? तू तिचा हात धरून तिला घरापाठच्या अंगणात घेऊन गेलास. दोनचार खड्डे खणून, त्यात ते कागद तूपेरले होतेस. आई जरा वैतागली. तर तू तिला निष्पापपणे सांगितलेस, ‘आई, तू दिलेले कागद जमिनीत पेरलेत. पुढच्या मौसमात या कागदांची झाडं होतील. त्यांना कागदच कागद लागतील. मग तुला कुणाकडे कागद मागावे लागणार नाहीत!’ तुझा कोवळा हात तिच्या खरबरीत हातावर किती तरी वेळ फिरत राहिला. तिचा जीव तुझ्यासाठी पेरती माती झाला. तुझी आठवण येते खलील... हातात काहीच नसते, तेव्हा तुझा निष्पाप, कोवळा स्पर्श दिलासा देतो. तू आहेस अजूनही! तुझी, शिवकन्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
कला
वाङ्मय
मुक्तक
भाषा
साहित्यिक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
1769 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

सुंदर लिहीलय

डॉ श्रीहास
Sat, 10/21/2017 - 11:33 नवीन
....... थेट भिडलं
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा