Being ALONE n not LONELY!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
1 Dec 2017 - 6:00 pm

एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील. आता थोडं सोपं झालय आयुष्य. मुलं मोठी झाली आहेत. त्यांचं असं एक विश्व आहे. मात्र आपण त्या विश्वाचा एक लहानसा भाग आहोत फक्त. आपली बायको/नवरा देखील काहीसे त्यांच्या आयुष्यात रमले आहेत. हळूहळू कुठेतरी मनात एकटेपणा जाणवायला लागतो. BEING LONELY feel!

मग आपण देखील कधीतरी हळू हळू जुने मित्र-मैत्रिणी शोधायला लागतो. क्वचित्  कधीतरी होणारे फोन्स अधून-मधून व्हायला लागतात. ग्रुप्स तयार होतात. भेटी ठरायला लागतात. मुलाचं चाललेलं शिक्षण, त्यांचे आणि आपले देखील पुढील करियर प्लान्स हे विषय सुरवातीला हमखास असतात. हळूहळू आपल्याला या जुन्या मैत्रीतला मोकळेपणा आवडायला लागतो. भेटी वाढायला लागतात; आणि जुने दिवस गप्पांच्या ओघात येतात. मग चर्चा काहीशी बदलते....

"यार तू कसला झक्कास गायचास रे शाळेत. शिकत देखील होतास न? मग पुढे काय झालं?"

"सोड यार. दहावीत चांगले मार्क्स हवे होते. म्हणून मग सोडल गाण-बिण. आणि नंतर वेळच नाही मिळाला. पण तानसेन नसलो तरी आपण पक्के कानसेन आहोत हा. solid collection आहे आपल्याकडे. ये एकदा दाखवतो."

"ए तू कायम नाटकांमध्ये भाग घ्यायचीस ग. तेव्हा तर असच काहीतरी करायचं आहे अस म्हणायचीस? पुढे काहीच नाही केलंस?"

"पुढे काय करणार ग? कर्म माझ! अग ते त्या वयातले बालिश विचार होते. बी. कॉम. नंतर बँकेत लागले... आता ऑफिसर आहे. नाटक-बिटक बहुतेक नसत जमल मला. पण आता एकही चांगल नाटक सोडत नाही ह बघायचं. किमान अशी तरी हौस भागवून घेते."

"अबे तू शाळेत एम. एफ. हुसेनला लाजवेल अशी चित्र काढायचास. आता काय फक्त खर्डेघाशी?"

"यार! इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि मग राहूनच गेल हे सगळ."

हे असे विषय होतात. आणि मग कधीतरी आपल्याला वाटायला लागत खरच आपल्याला काहीतरी छंद होतेच की. मग बायकोशी/नवऱ्याशी गप्पा मारताना किंवा ऑफिसमध्ये कलीग्सशी बोलताना आपण सांगतो आपली ती लहानपणी बघितलेली स्वप्न. अशा गप्पांमध्ये कोणीतरी सहज म्हणून जातं; "अरे वेळ नाही गेली अजून. त्यात करियर नाही केलस तरी चालेल, पण छंद आहे तर आता चालू कर की." त्याक्षणी  ऐकून न ऐकल्यासारखं करत असलो तरी खोल मनात आपण देखील तो विचार करायला लागतो. नकळत कधीतरी आवडणाऱ्या छंदाचा क्लास जवळपास शोधतो आणि जमेल तसं... जमेल तेव्हा आपली हौस पुरवून घ्यायला लागतो. अलीकडे अचानक जाणवायला लागलेला एकटेपणा अचानक नाहीसा होतो. स्वतःत हरवून जायला लागतो आपण... अगदी नकळत!

.... आणि मग पुढच्यावेळी जेव्हा तेच जुने मित्र-मैत्रिणी भेटतात तेव्हा हौसेने त्यांना या नवीन venture ची माहिती देतो. एक वेगळाच आनंद असतो या परत एकदा सुरु केलेल्या छंदात. हरवून जायला लागतो आपण त्यात. 

THAT'S WHAT I CALL BEING ALONE AND NOT LONELY!!!

स्वतःत हरवून जाणं................... एकटेपणात नाही!!!

मग? तुमचा काय छंद आहे? केलीय का सुरवात? नाही? मग कधी करणार?

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

1 Dec 2017 - 6:44 pm | मराठी कथालेखक

tv, internet, whats app यामुळे खरं तर सर्जनशील छंद मागे पडत आहेत.. वेळ नाही हे कारण तितकंस खरं वाटत नाही.

ज्योति अळवणी's picture

1 Dec 2017 - 9:32 pm | ज्योति अळवणी

अगदी खरं. म्हणून तर कोणीतरी जाणीव करून दिली की परत एकदा आपल्या छंदकडे वळता येतं. तेच सांगायचा प्रयत्न केलाय लेखात. Don't be lonely... Being alone n enjoying ur own company is important.

मी अजून तरी त्या वयात नाही, पण छंद आणि व्यवसाय यांची सांगड आतापासूनच घालतोय. छंदच दिशादर्शक आहेत, आणि व्यवसाय त्याला पूरकच राहू देतोय. पुढे काय होणार माहिती नाही म्हणून हे असे.

प्राची अश्विनी's picture

1 Dec 2017 - 6:52 pm | प्राची अश्विनी

छान लेख.

पद्मावति's picture

1 Dec 2017 - 10:17 pm | पद्मावति

लेख आवडला. छान लिहिलंय.

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2017 - 10:55 pm | चौथा कोनाडा

महत्वाचे आहे. प्रत्येकाला कधी ना कधी याचा विचार करावाच लागेल !
लेख आवडला. छान लिहिलंय.

भटक्य आणि उनाड's picture

1 Dec 2017 - 10:55 pm | भटक्य आणि उनाड

अगदि मनातल बोललात...

ज्योति अळवणी's picture

2 Dec 2017 - 2:59 am | ज्योति अळवणी

तुम्हा सर्वांचे मनापासून आभार

नमकिन's picture

2 Dec 2017 - 9:06 am | नमकिन

शाळा व महाविद्यालयात छंद जोपासले गेले व त्याचे पूर्णवेळ साधनेत रुपांतरीत करण्याची शक्यता दिसली तर आप्त, गुरू इ. सर्व नक्कीच प्रोत्साहीत करतील व आपल्याला बरेच कलाकार गवसतील.
छंदाचा तास असावा असे वाटते.....

श्रीकांत पवार's picture

10 Feb 2018 - 3:12 pm | श्रीकांत पवार

मराठी साहित्य वाचन मागे पडलं होतं,
आता मिपावर वाचन त्याचाच भाग,
मन हलकं होतयं

नाखु's picture

10 Feb 2018 - 7:33 pm | नाखु

आणि आवड यात बराच फरक असावा,
आपली आवड छंदात परावर्तित होईल का नाही हे कळण्याचं वय नसतं,
सचिन तेंडुलकर च्या आत्मवृत्तात स्पष्ट उल्लेख केला आहे, त्याच्या मोठ्या भावाने अजितने सचिनचं क्रिकेट वेड परिश्रमातून​ जोपासलं तरच यशस्वी होईल हे ताडलं होतं

लेख आवडला

मी तर अनेक वर्षे घरा पासुन खूपच दूर हॉस्टेल वर काढलीं ।त्या मित्रांच्या भाषे पासून ते इतर अनेक गोष्टी मी त्याच्या कडून शिकलो। त्या मित्रांचे फ़ोन, मेसेज येतात, जुन्या आठवणी निघतात। मारायच्या आधी जरूर तूला भेटींन आशा आणाभाका होतात आणि डोळ्याच्या कडा कधी पाणावतात कळत नाही।वाचून आठवणी ताज्या झाल्या।

ज्योति अळवणी's picture

22 Feb 2018 - 4:50 pm | ज्योति अळवणी

तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद